संपादने
Marathi

स्टार्टअप्सना कर्नाटक राज्य सरकारकडून पारदर्शीपणाने सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करू : प्रियांक खारगे, माहिती आणि तंत्रज्ञान, पर्यटन मंत्री

Team YS Marathi
30th Sep 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

कर्नाटक राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटनमंत्री प्रियांक खारगे यांनी टेकस्पार्क२०१६च्या शुभारंभ प्रसंगी बोलताना देशातील सर्वाधिक पारदर्शक स्टार्टअप धोरण सरकारने हाती घेतले असून नवउद्योजकांना सर्वत्या प्रकारच्या मदत आणि सुविधा देण्याची ग्वाही दिली आहे. टेकस्पार्क२०१६चे उदघाटन करताना त्यांनी सांगितले की, बंगळुरू हे देशाचे सिलिकॉन व्हॅली समजले जाते आणि माहिती तंत्रज्ञाना प्रमाणेच पर्यटनाच्या क्षेत्रामध्येही या शहरात नव्या उद्यमींना अनेकानेक संधी आहेत.

image


युअरस्टोरीच्या संस्थापिका आणि संपादिका श्रध्दा शर्मा यांनी टेकस्पार्क२०१६च्या शुभांरभाप्रसंगी बोलताना कर्नाटकचे मंत्री प्रियांक खारगे यांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या की कर्नाटक राज्याला त्यांच्या रुपाने उमद्या मनाचा नेता मिळाल्याने स्टार्टअपच्या माध्यमातून देशाचा आणि राज्याचा विकास करताना काम करणा-या तरुणांना मोठी मदत होणार आहे.

image


प्रियांक खारगे यांनी शर्मा यांचे आभार मानले आणि कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सा-या तरुण नवउद्यमी आणि गुंतवणूकदरांचे स्वागत केले. ते म्हणाले की, कर्नाटक राज्यात स्टार्टअप इंडिया अभियानाची ख-या अर्थाने पारदर्शकतेने अंमलबजावणी केली जात आहे. इतकेच नाहीतर माहिती तंत्रज्ञान याक्षेत्राखेरीज पर्यटन आणि इतर क्षेत्रातही राज्यात स्टार्टअपला चांगल्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे नव्याने उद्यमी होताना काय अडचणी असतात त्यांची सरकारला चांगली जाणिव असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. स्टार्टअप सेल मध्ये नोंदणी केल्यानंतर आवश्यक त्या सर्वाप्रकारच्या मदतीसाठी सरकारने सहजपणाने सुविधा देऊ केल्य आहेत त्यामध्ये जमिनीपासून आवश्यक आर्थिक मदतीपर्यंतच्या सुविधा आहेत असे ते म्हणाले.

image


खारगे म्हणाले की, १७जुलै १९६२मध्ये पंडित नेहरू यांनी बंगळूरू शहराचा गौरव करताना हे शहर म्हणजे देशाच्या भविष्याचे चित्र असेल असे म्हटले होते. आज माहिती तंत्रज्ञानासह अनेक क्षेत्रात हे शहर आणि आजुबाजूच्या परिसराचा विकास होत आहे असे सांगून ते म्हणाले की, त्यात या शहराला अनेक प्रकारची नवी ओळख मिळाली आहे, त्यात भर घालत लवकरच हे शहर स्टार्टअप शहर म्हणूनही नावारुपास येईल असा आम्हाला विश्वास वाटतो. वेगाने विकसित होणा-या या शहरात माहिती तंत्रज्ञानाला चालना देण्याचा निर्णय १९९०च्या सुमारास सरकारने घेतल्यानंतर केवळ दहा पंधरा वर्षात या शहराने देशाचे सिलीकॉन व्हॅली म्हणून नवी ओळख प्रस्थापित केली आहे. आज या शहरात ३.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची उलाढाल दरवर्षी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होते. स्टार्टअपच्या विकासात अग्रेसर असलेल्या जगातील १५प्रमुख शहरात आज बंगळूरुचा क्रमांक लागत असून लवकरच ते या क्षेत्रातही अव्वल स्थान निश्चित करेल.

image


खारगे म्हणाले की नवउद्यमीता सोपी नाही, हे सांगून मी तुम्हाला नाऊमेद करणार नाही मात्र त्यात अनेक प्रकारची आव्हाने आहेत हे आपण सारेच जाणतो. अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना नव्या उद्योगाला करावा लागतो त्यातून अनेक वर्ष संघर्ष देखील करावा लागतो मात्र त्यात सुलभपणा येण्यासाठी कर्नाटक सरकारने या क्षेत्रात येणा-या तरुणांना सर्वतोपरी मदत करणारे सर्वंकष धोरण आखले आहे. त्यामुळे श्रध्दाजींनी जसे सात वर्षाचा संघर्ष केल्याचे सांगितले तसे तुम्हाला करावा लागू नये असा आमचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले.

image


खारगे यांनी सांगितले की, एका उद्यमीशी बोलताना काही चर्चा झाली त्यात त्यांनी ब-याच गोष्टी सांगितल्या त्यांना थांबवत मी विचारले की तुमच्या कडे प्लान बी काय आहे? ते म्हणाले की प्लान बी नव्हे सारी मुळाक्षरे आहेत तितक्या असंख्या कल्पना आहेत मात्र त्या राबविण्याचा प्लान बी म्हणजे बंगळूरू केवळ कर्नाटक राज्यात आहे. असे खारगे म्हणाले. या राज्यात देशाचे सर्वोत्तम स्टार्टअप धोरण तयार करण्यात आले असून त्यातून सातत्याने नवउदयमीना मदत आणि मार्गदर्शन केले जात आहे. राज्यात दरवर्षी २०हजार नव उद्योग तयार होतात त्यापैकी किमान पाच ते सहा हजार उत्पादन क्षेत्रात असतात असे सांगून ते म्हणाले की, त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी सरकारने सर्वतोपरी तयारी केली आहे. टेकस्पार्क२०१६ या युअर स्टोरीने हाती घेतलेल्या उपक्रमाचे स्वागत करताना ते म्हणाले की अश्या प्रकारच्या कार्यक्रमातून उद्यमीतेला चांगली दिशा मिळण्यास मदत होत आहे. हेन्री फोर्ड यांनी म्हटल्या प्रमाणे नव्या उद्योगातून नव्या विकासाच्या वाटा शोधण्याच्या कार्यालाच उद्यमिता असे म्हणतात असे सांगून त्यांनी या कार्यक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी उपस्थितांचे आणि आयोजक तसेच प्रायोजकांचे आभार मानले.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags