संपादने
Marathi

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, इथेनॉल, सीएनजी आधारित सार्वजनिक वाहतूक सेवेची!

Team YS Marathi
12th Jun 2017
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घोषणा केली आहे की या किनारपट्टीच्या राज्याला यापुढच्या काळात सीएनजी आधारित तसेच इथेनॉल आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दिली जाईल. केंद्र सरकारचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा हा एक प्रयत्न असेल.


image


या बाबतच्या वृत्तानुसार, पर्रिकर यांनी रस्त्याच्या किनारी झाडे लावण्याच्या कार्यक्रमात पत्रकारांना सांगितले की, “ या उपक्रमात इथेनॉल आणि सीएनजी आधारित बस चालविल्या जातील जेणेकरून तुम्हाला हवेतील कार्बनचे प्रमाण नियंत्रित करता येईल, चांगले घन कचरा व्यवस्थापन आणि इतर अनेक उपाययोजना प्रस्तावित आहेत.”

कार्बनची घनता हा देखील सध्याच्या काळात वाढत जाणा-या समस्यांपैकी एक आहे आणि जे घटक त्यात समाविष्ट असतात कालानुसार वाढत जात आहेत. मात्र त्या प्रमाणात त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न फारच कमी प्रमाणात केले जातात. औद्योगिक क्रांती पासून मानवी हालचालींनी कार्बनच्या घटकांमध्ये सातत्याने वृध्दी होताना दिसत आहे. ‘व्हॉटस यू इम्पॅक्ट’च्या मते ते आता घातक पातळीवर पोहोचले आहेत, अशा पातळीवर ज्या मागील तीन लाख वर्षात अनुभवास आल्या नाहीत. तरीही मानवी सहभाग निसर्गाच्या मानाने खूपच कमी आहे, निसर्गाचा समतोल ढळण्यास मानवी हस्तक्षेपापूर्वीच सुरूवात झाली आहे.

कार्बन घटकांचे प्रमाण वाढविण्यात भारत चवथा मोठा सहभागीदार आहे, विकीपिडीयाच्या मते, देश जगातील सहा टक्के कार्बन डायऑक्साइडची मात्रा वाढविण्यास कारणीभूत आहे, दिलेल्या माहिती नुसार, पर्यावरणाच्या रक्षणासाठी हा उपक्रम खूपच सकारात्मक आहे, ज्यातून जग आधिकाधिक पर्यावरणस्नेही होण्यास मदत होणार आहे.

पर्रिकर यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना, राज्यात एकत्रित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्वाची आहे, जी वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने समस्या बनत चालली आहे, त्याचप्रमाणे चार लाख वार्षिक पर्यटकांच्या दृष्टीने देखील.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags