संपादने
Marathi

पाकिस्तानच्या मदर तेरेसा आणि त्यांनी अर्ध दशकापासून कुष्ठरोगाशी दिलेला लढा !

Team YS Marathi
30th Aug 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

रूथ पीफाव, ज्या पाकिस्तानच्या मदर तेरेसा म्हणून ओळखल्या जातात, पन्नास वर्षापूर्वी कुष्ठरोगाशी झुंज देताना निधन पावल्या.

जर्मनीत १९२९मध्ये जन्म झालेल्या, दुस-या महायुध्दात त्यांच्या कुटूंबाचे घर जळाले होते, युध्दातील भयावह अनुभव घेतल्यानतर त्यांंनी त्यांचे जीवित मानवतेच्या कल्याणासाठी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्या डॉक्टर झाल्या आणि त्यांनी हार्ट ऑफ मेरी ऑर्डर येथे सेवा सुरू केली.


Image: The international News

Image: The international News


सन १९६०मध्ये, रूथ त्यांच्या मिशनरीच्या कामानिमित्त भारताच्या प्रवासावर होत्या, त्या दरम्यान त्या पाकिस्तानच्या कराची येथे काही काळ वास्तव्याला होत्या. त्यावेळी योगायोगाने त्यांनी तेथे एका कुष्ठ वसाहतीला भेट दिली होती आणि तेथील दुरावस्था पाहून त्यांना धक्का बसला होता. त्या याेगायोगाच्या भेटीने त्यांचे मतपरिवर्तन झाले आणि त्यांनी पाकिस्तान आणि परिसरातील कुष्ठरोगाशी आणि त्यांच्या दुरावस्थेशी लढा देण्याचा निर्णय घेतला. पन्नास वर्षापूर्वी त्या कुष्ठ वसाहतीला भेट दिल्यानंतर काय भावना मनात आल्या त्याबाबत त्यांनी म्हटले होते की, “ खरेतर पहिला रूग्ण जो मला भेटला तो तरूण पठाण होता. त्याने त्याचे हात झाकले होते आणि दवाखान्य़ात आला होता. आणि असे दाखवत होता जसे काही त्याला झालेच नाही. जेणेकरून त्याच्या त्या हातांना पाहून तेथे कुणाला त्याची किळस यावी आणि त्याला तेथून कुत्र्यासारखे हाकलुन दिले असते”

काही वर्षांतच रूथ यांनी कराचीत संस्था स्थापन केली, मेरी ऍडीलेड कुष्ठरोग केंद्र. ज्याच्या शाखांचे अस्तित्व नंतर पाकिस्तानच्या सर्व प्रातांत निर्माण झाले. त्यांनी हजारो डॉक्टरांना कुष्ठरोगाशी लढण्याचे प्रशिक्षण दिले आणि हजारो रुग्णांचा उपचार केला. त्यांनी कुष्ठ पिडीत मुलांचा बचाव केला आणि गुहा तसेच जंगलातून शोधून त्यांना केंद्रात आणले.

१९९६मध्ये पाकिस्तानला जागतिक आरोग्य संघटनेने या रोगावर संपूर्ण नियंत्रण मिळवल्याचे प्रमाणित केले, हे शक्य झाले ते मुख्यत: डॉ रूथ पीफाव यांच्या योगदानामुळेच!


Geo News

Geo Newsत्यांच्या जीवनाच्या शेवटच्या काही वर्षात, पाकिस्तानच्या या मदर तेरेसा यांनी त्यांच्या सेवांचा विस्तार करत ट्यूबरकोलायसीसच्या रुग्णांवर देखील उपचार करण्यास सुरूवात केली होती. याशिवाय, त्यांनी लोकांच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत केली आणि पूर आणि भुकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात त्या मदतीला धावून गेल्या.

पाकिस्तानची जनता आणि मानवता यांची सेवा करताना, रुथ यांचा दोन सर्वोच्च पाकिस्तानी नागरी पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. ‘हिलाल ए इम्तियाज’ आणि ‘हिलाल ए पाकिस्तान’! पाकिस्तानच्या हवाई दलाने त्यांनी तयार केलेल्या रुग्णालयाला रूथ यांचे नाव दिले आहे. ज्यावेळी मागील सप्ताहात वयाच्या ८७व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर वृत्तात म्हटले होते की, ‘ स्व. डॉ. रूथ पिफाव यांच्या निस्वार्थ मानवतेच्या सेवेला कुणी विसरू शकणार नाही. त्यांच्या या महान व्यक्तित्वाचा ध्येयवाद ज्यात मानवेतच्या सेवेसाठीच्या त्यागाचा आदर्श घालून दिला आहे, त्यातून येणा-या काळातील या शाळेतील विद्यार्थी धडा घेतील आणि त्यांचे अनुकरण करतील.’

मानवतेवर अशाप्रकारे निस्वार्थ प्रेम करता येते, ज्याने सा-या सीमारेषा पुसून टाकल्या जावू शकतात, हे या आदरणीय महिलेने नक्कीच शिकवले आहे. की, ‘आम्ही समाजाला काय देवू शकतो’.

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags