संपादने
Marathi

आई वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांमुळे ‘किसन’ लहानपणीच बनले होते सगळ्यांचे ‘अण्णा’

ARVIND YADAV
23rd Aug 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

अण्णा म्हणजे मूर्तिमंत साधेपणा. त्यांचं राहणीमान, खानपान आणि इतर सर्व कार्य अगदी साधे सर्वसामान्य आहे. ते खादीचे कपडे घालतात. पांढरे धोतर आणि कुर्ता असा त्यांचा पेहराव असतो. डोक्यावर गांधी टोपी ही त्यांची विशेष ओळख आहे. अण्णा शुद्ध शाकाहारी आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचे व्यसन कधीच केले नाही. लोकांची मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.

अण्णा यांचे कोणतेही कार्य असो, त्यांच्या कार्यात त्यांच्या आई-वडिलांनी केलेले संस्कार दिसून येतात. अण्णा सांगतात की, लहानपणापासूनच त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी प्रेरित केले होते. शाळेतील शिक्षकांचा मार खाण्यापासूनच त्यांना त्यांच्या आईने वाचवलेच नाही तर त्यांना असा धडा दिला ज्यामुळे त्यांचे चरित्र महान आणि आदर्श बनले. स्वतः बोललेले खोटे लपवण्यासाठी त्यांनी आईला खोटे बोलायला लावले, त्यानंतर मात्र ते आयुष्यात कधीच खोटे बोलले नाही.

image


अण्णा यांनी सांगितले की त्यांच्या आईने लहानपणापासूनच खूप चांगली शिकवण द्यायला सुरुवात केली होती. अण्णा सांगतात, “मी जेव्हा लहान होतो तेव्हा आई नेहमी सांगायची की, कोणाचंही वाईट करायचं नाही, कधीही चोरी करायची नाही, कोणाबरोबर भांडायचं नाही, समाजासाठी काहीतरी चांगले काम करायचे.” त्यांची आई लक्ष्मीबाई यांनी अण्णा यांना लहानपणीच हे सांगितले होते की – जरी तू खूप काही करू शकला नाही तरी जेवढे जमेल तेवढे, थोडेफार तरी काहीतरी चांगले कार्य कर, नेहमी दुसऱ्याचे दुख: दूर करण्यास मदत कर.

आईच्या याच शिकवणीवरून अण्णा यांच्या बालमनावर खूप मोठा प्रभाव पडला. अण्णा यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, “ आईकडून ज्या गोष्टी मी शिकल्या त्यामुळे माझं माइंड सोशल माइंड झालं.”

अण्णा यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. गरिबीची चटके त्यांनी सोसले होते. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांची आई दुसऱ्याकडे जाऊन कामे करत असे. अण्णा सांगतात, “ माझ्या आईकडे जास्त पैसे नसायचे, ती श्रीमंत नव्हती, मात्र तिच्याकडे चारित्र्य संपन्नता होती."

अण्णांवर त्यांचे पिता बाबूराव यांचाही खूप प्रभाव होता. त्यांचे वडील दिवसरात्र मेहनत करत असल्याचे त्यांनी लहानपणापासूनच पहिले होते. अण्णा यांनी अनेक गोष्टी त्यांच्या पित्याकडून आत्मसात केल्या, त्यांचे अनुकरण केले. ते सांगतात, त्यांचे वडील खूप साधे होते, त्यांना कोणतेही व्यसन नव्हते, ते खूप प्रामाणिक होते. ते अल्पशिक्षित असले तरी संस्कारक्षम होते त्यांच्या या व्यक्तीमत्वाचा माझ्यावर खूप प्रभाव झाला. हे सांगत असताना अण्णा हेही सांगतात की, आजकाल अनेक पालक आपल्या पाल्यावर संस्कार घडावे म्हणून संस्कार केंद्रावर पाठवतात. अण्णा म्हणतात, “ पालकांना वाटते की मुलांना संस्कार केंद्रावर पाठवल्याने चांगले संस्कार होतील, मात्र हे चुकीचे आहे, मुलांना खरे संस्कार त्यांच्या मात्या-पित्याकडूनच मिळतात. प्रत्येक कुटुंब संस्कार केंद्र झाले पाहिजे.” 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा. 

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags