संपादने
Marathi

कल्पना ते अंमलबजावणी – ‘गार्टनर हाईप सायकल’नं मांडला नवतंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीचा लेखाजोखा

‘गार्टनर’ या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करणा-या आणि कंपन्यांना सल्ला देणा-या कंपनीचा ‘गार्टनर हाईप सायकल अहवाल’ आहे. हा अहवाल म्हणजे विशिष्ट तंत्रज्ञानाचे अवलंबन आणि सामाजिक उपाययोजना करण्याबाबत, तंत्रज्ञानाच्या विकसनशीलतेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी तयार केलेले ग्राफिकल सादरीकरण आहे. विशेष म्हणजे हा अहवाल नवतंत्रज्ञानाच्या उत्कांतीचा विश्लेषणात्मक लेखाजोखा मांडत कंपन्यांचा दृष्टीकोन तयार करण्याचे काम करतो.

sunil tambe
9th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

'स्पीच रेकग्निशन' म्हणजेच बोललेले अक्षरात उतरवण्यापासून ते जोडलेल्या घरांपर्यंत, आपला समाज काळाशी सुसंगत अशा परिपक्व आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या नव्या अविष्कारांचा साक्षीदार बनत आहे. संशोधनात काम करणा-या गार्टनर या कंपनीचे प्रकाशित झालेले ‘हाईप सायकल’ हे अहवाल म्हणजे नवतंत्रज्ञानाच्या जगातल्या बदलांचे एक उत्कृष्ट विहंगावलोकन आहे. नव्या उपक्रमाची सुरूवात, तंत्रज्ञान क्षेत्रात गगनाला भिडलेल्या अपेक्षा, मोठा भ्रमनिरास, ज्ञानाची घसरण ( उतार) आणि उत्पादनशक्तीला बसलेली खीळ अशा पाच टप्प्यांचा अभ्यास केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. म्हणून हा अहवाल नवतंत्रज्ञानाचा व्यापक आढावा घेतल्याचा एक उत्तम नमूना आहे.

image


काही नव्याने सुरू केलेले नाविण्यपूर्ण असे नवे उपक्रम हे उद्योगाचे रूपच पालटणारे ठरतात तर इतर काही नव्या उपक्रमांचा उद्योगांवर फार मोठा परिणाम होतो. काही नवे उपक्रम हे उद्योगांची गती वाढवणारे ठरतात तर काही किंमती, त्यांची स्वीकारार्हता आणि स्पर्धेत टिकाव धरणारे तंत्रज्ञान या घटकांनुसार उद्योगाची गती मंदावणारे सुद्धा सिद्ध होतात.

image


मोबिलिटी आणि डेटा

उद्योगाच्या विनियोगासाठी मोबाईल हे जलदगतीने प्राथमिक साधन बनत आहे. गार्टनरच्या म्हणण्यानुसार ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’(IoT) हे नेटवर्क आणि ऑपरेशनल टेक्नॉलॉजी ( (OT), हे डिजिटल उद्योगातील संधींचे प्रमुख घटक आहेत. या डिव्हाईसने किती ग्राहकांना व्यापलय आणि त्यांचा उपक्रमातील, तसेच मोबाईल अप्लीकेशनमधील वाढता रस या गोष्टी मोबाईलची आवश्यकता अधोरेखित करतात. आता 5G वायरलेस आणि विविधांगी नेटवर्किंग या मोबाईलच्या नव्यानं येऊ पाहणा-या पायाभूत सुविधांकडे बघण्याची गरज आहे.

IoT हे आयटी लँडस्केपचा हिस्सा बनत आहे आणि उद्योगांच्या म्होरक्यांनी याकडे मुळीच दुर्लक्ष करू नये. कारण आपल्याला सध्या प्राथमिक स्वरूपात केवळ ‘उपक्रमाच्या’ यंत्रणेवरच लक्ष केंद्रीत करायचे आहे असे या म्होरक्यांना वाटू शकते. या अहवालात नोंदवलेल्या निरिक्षणानुसार IoT आणि मोबिलीटी उपक्रमांमध्ये क्रमाने अधिक डेटा वळता करणार आहेत. उद्योग विश्लेषण ‘पास’(platform as a service), जे सेवेच्या रूपात विश्लेषणाच्या क्षमता आणि टूल्स पुरवते, ते सायकलचा सर्वोच्च बिंदू गाठण्याच्या जवळ पोहोचले आहे. नव तंत्रज्ञानाचे कल स्वीकारल्यामुळे अडॉप्शन कर्व्ह जलग गतीनं वाढत आहेत.

‘बिग डेटा’मध्ये रस कायम राहत असल्याचे देखील हा अहवाल नमूद करतो. शिवाय नवे तंत्रज्ञान आणि नव्या पद्धतीही या क्षेत्रात निर्माण झालेल्या आहेत. हाईप पीकच्या पलिकडे पोहोचण्याचा अर्थ यातला रस निघून गेला असं होत नाही, तर अपेक्षित परिणामापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणीवर अधिक भर दिला जातो असाच याचा अर्थ होतो.


क्लाऊड


क्लाऊड कॉम्प्यूटिंग, खासगी क्लाऊड कॉम्प्यूटिंग आणि हायब्रिड क्लाऊड हे परमोच्च टप्प्याला ओलांडून पुढे गेले आहेत. काळाशी सुसंगत राहण्यासाठी लागणा-या विकसनशीलतेचा (मॅच्युरीटीचा) अभाव आणि ही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेतली गुंतागुंत या कारणांमुळे यांपैकी काही क्लाऊड्ना मर्यादा आली आहे असा इशाराही हा अहवाल देतो. आपल्याला हवी तशीच अंमलबजावणी करण्याच्या क्लाऊड सेवा देणा-या दलालांच्या हटवादीपणाने तर कळस गाठलेला आहे

या अहवालनुसार, “ आयटीच्या इतिहासात 'क्लाऊड' ही खूपच गाजावाजा झालेली संज्ञा आहे.” कशालाही क्लाऊड ही संज्ञा चिटकवून ‘क्लाऊड’चा गैरवापर करणा-या विक्रेत्याकडून ‘क्लाऊड वाशिंग’ चा धोका असतो याकडे लक्ष वेधून उद्योगांच्या म्होरक्यांना ग्रार्टनरने सावध केले आहे. ‘क्लाऊड’ संदर्भात प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या सुरक्षा आणि गोपनीयतेबाबतच्या बातम्यांमुळे, तसेच त्याच्या निकामीपणाबद्दलच्या बातम्या वाचून वाचकांना कदाचित ‘क्लाऊड फटीग’ येत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.


सोशल मिडिया

imageकाळाच्या ओघात ‘क्लाऊड’ आणि ‘सोशल’ या आवश्यक क्षमता बनतील आणि मुख्य प्रवाहावर त्यांचा प्रभाव पाडतील अशी गार्टनरची अपेक्षा आहे. यात ‘सोशन कॅपिटल’ आणि ‘सोशल एम्प्लॉई रेकग्निशन पद्धती’चा समावेश आहे. गार्टनरच्या मतानुसार अनेक सोशल तंत्रज्ञानाचे प्रकार हे इतर डिजिटल बिझनेसासारख्या नवीन उपक्रमाच्या संरचनेचा भाग आहेत.

सोशल नेटवर्क विश्लेषणाच्या अंमलबजावणीमुळे खात्रीलायक नेटवर्किंग डेटाची अडचण काय आहे हे उघड होऊ शकलेले आहे. सोशल गेमींग, सोशल कास्टींग आणि सोशल टीव्ही सुद्धा मंदीच्या टप्प्यावर आहेत.


डिजिटल एज


डॅशबोर्ड सारख्या डिजिटल बिझनेस पद्धती हा उपक्रम सुरू करण्याच्या टप्प्याच्या पलिकडे सरकत आहेत. उदाहरणार्थ देयकं देण्य़ाच्या पद्धतींमध्ये आणि ग्राहकांसाठी तयार करण्यात येणा-या लॉयल्टी प्रोग्रॅँम्सचे वर्गीकरण आणि एकत्रिकरण करून त्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी डॅशबोर्डचा वापर केला जातो. उद्योगाचे अत्यंत महत्त्वाचे कौशल्य म्हणून मूल्यांकन, अकाऊंटींग, हाताळणी आणि माहितीचे रिपोर्टिंग अशा इन्फोनॉमिक्स’कडेही गार्टनर या अहवालात ‘लक्ष वेधण्याचे काम करतात. सध्या नवीन उपक्रम सुरू होण्याच्या बरोबर मध्यबिंदूवर आहे. पैशाला ज्या प्रकारचं मूल्य आहे, त्याच प्रकारचे माहितीचे मूल्य आणि प्रतिष्ठा डिजिटल चलनाच्या जगात इन्फोनॉमिक्सला असल्याचे स्पष्ट होते.

बाहेरचे बरोबरीचे उदयोग समूह (तत्त्वत: सहकार्याने एकत्र आलेले उद्योग बाहेरच्या उद्योगांना जागा निर्माण करतात ) आणि सोशल खरेदी टूल्स( सोशल वेबसाईटसारखी क्षमता असलेले खरेदीचे मार्ग) ही इतर साधने आणि तंत्रज्ञान पाहण्यासारखी आहेत. वैयक्तिकृत आणि पसंतीच्या उत्पादनासाठी, सेवांसाठी तसेच शॉपिंगच्या अनुभवासाठी ग्राहकाच्या इच्छेमुळे गती मिळालेले किरकोळ ‘3D प्रिंटिंग’ हा उपक्रम सुरू होण्याच्या मध्यबिंदूवर आहे


व्यायसायिक परिणाम


५७ टक्के उद्योजकांकडे त्यांच्या उद्योग धोरणासोबत एकतर एकात्मिकपणे जोडलेले किंवा संरेखित केलेले डिजिटल धोरण असल्याचे गार्टनरच्या सुरूवातीच्या २०१३च्या सीईओ सर्वेक्षणात उघड झालेले आहे. याची उपक्रमाच्या वास्तूमध्ये किंवा डिजिटल वर्कप्लेसमध्ये गरजेनुसार अंमलबजावणी करण्यात आली आहे.

गार्टनर आपले भाकित नोंदवताना म्हणतात, “ २०१६ मध्ये ‘क्लाऊड’ आणि ‘सोशल’चा वापर इतका व्यापक होणार आहे की ६० टक्के संस्था आपल्या गुंतवणूकीबाबतचे निर्णय घेत असताना हा घटक महत्त्वाचा असल्याचे मान्यच करणार नाहीत. ‘क्लाऊड’ आणि ‘सोशल’चा वापर हा विशिष्ट घटक न समजता एक अपेक्षित असा नियम समजला जाईल.”

वेबकडे झुकलेले वास्तूशास्त्र आणि सेवेच्या अर्थाने सॉफ्टवेअर या गोष्टींचा काळाशी सुसंगत असलेल्या विकसनशील तंत्रज्ञानामध्ये समावेश असेल. या अहवालात एक मनोरंजक बाब सुद्धा आहे. आणि ती म्हणजे डिजिटलायझेशनच्या आलेल्या लाटेमुळे इंटरनेट आणि ई-बिझनेसची मॉडेल्स विस्कळीत व्हायला सुरूवात झालेली आहे ही.

स्मार्ट मशीन्समुळे तंत्रज्ञानाच्या नाविण्यपूर्ण अशा नव्या उपक्रमांमध्ये मोठी व्यत्ययाची स्थिती निर्माण होईल असे भाकितही गार्टनर करतात. ‘स्मार्ट मशीन्स’ या व्यापक स्वरूपात काम करणा-या तंत्रज्ञानाचा एक नव्याने उदय पावणारा सुपर-क्लास असणार आहेत असे ही या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात असलेला कल लक्षात घेता, ग्राहक आरोग्य सेवेमध्ये अधिक सक्रिय भूमिका घेत आहेत आणि आरोग्य सेवा पुरवणा-या संस्था या ग्राहक मिळवण्याबाबत आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये अस्पष्ट आणि गुंतागुंतीच्या भूमिका घेत आहेत असे मुद्दे सुद्धा हा अहवाल अधोरेखित करतो.

CTO, CIO, CMO आणि COO अशा कंपनीच्या अधिका-यांसाठी काही धडे सुद्धा या अहवालात दिले असल्याचे वाचताना उघड होत जातात. उदाहरणार्थ, आपल्या नव्या तंत्रज्ञानासोबतच आयटीच्या वारश्यासोबतच या कंपन्यांना ‘ड्युएल-स्पीड’ किंवा बायमोडल ऑपरेशन्सची गरज भासणार आहे. आयटी क्षेत्रात कंझ्युमर मार्केटनुसार आपल्या तंत्रज्ञानात नवे बदल करणे, कर्मचा-यांची चपळता आणि झपाट्याने वाढणा-या स्मार्टफोन आणि टॅब्लेटचा स्वीकार करणे अशा कामाला हाताळणे हे CIO साठी प्राधान्याने करण्याच्या कामांपैकी एक आहे असे ही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तात्पर्य हे आहे, की गार्टनर अहवाल हा तंत्रज्ञानातील उत्क्रांतीबाबत एक दृष्टीकोन तयार करण्याचं काम करतो आणि उद्योगाचे म्होरके आणि नव्या उपक्रमाच्या प्रवर्तकांनी कशा प्रकारे त्यांच्या धोरणाचे रडार तयार करावेत, स्पर्धेत आपण नेमके कोणत्या स्थानावर असावे याबाबतच्या सूचनाही हा अहवाल करतो.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा