संपादने
Marathi

दिल्लीमध्ये सम-विषम योजना आणि पर्यावरणासाठी वरदान सिध्द होऊ शकतो आठव्या इयत्तेतला विद्यार्थी ‘अक्षत’!

Team YS Marathi
7th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

जसजशी एक जानेवारी तारीख जवळ येत होती, तसतसे दिल्ली आणि एनआरसी क्षेत्रात रहाणा-या आणि दिल्लीत कामानिमित्त प्रवास करणा-या प्रत्येक व्यक्तीला राज्य सरकारद्वारे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी लागू केल्या जाणा-या सम-विषम योजेनेबाबतचे समाधान शोधण्यात गुंतला होता. एकीकडे जिथे या गोष्टीच्या चिंतेत होते की, ते वेळेवर आपल्या कामाच्या ठिकाणी कसे पोहोचणार? त्याचवेळी नोएडामधील एक तेरा वर्षांचा आठव्या वर्गातील विद्यार्थी अक्षत मित्तल कार पुलिंगची एक अशी योजना अशा अनोख्या वेबसाइट(संकेतस्थळ)सोबत घेऊन समोर आला आहे ज्याचा उपयोग करून सम-विषम योजनेत दिल्लीकर सहजपणाने करु शकतात आणि आपली कार चालवू शकतात.

image


नोएडाच्या सेक्टर ४ ४मध्ये एमिटी इंटरनँशनल स्कुलच्या आठव्या वर्गातील विद्यार्थी अक्षतने एक जानेवारी २०१६पासून दिल्लीच्या रस्त्यांवर निघणा-या वाहनांना लागू केल्या जाणा-या सम-विषम योजनेपासून सुटका करण्यासाठी www.odd-even.com नामक वेबसाईट तयार केली आहे. या संकेतस्थळाच्या मदतीने कुणीही व्यक्ती आपल्या येण्या-जाण्याच्या माहितीची देवाणघेवाण करू शकते आणि सहजपणाने कार चालवू शकते. आणि त्यासोबत पर्यावरणाच्या दिशेनेही आपले अमूल्य योगदान देऊ शकते.

हे संकेतस्थळ तयार करणा-या अक्षत यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “काही दिवसांपूर्वीच जेव्हा दिल्ली सरकारने सम-विषम याोजनेची घोषणा केली त्याचवेळी त्यांना जाणवले की, त्यांच्या घरात केवळ एकच गाडी आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रवास अवघड होणार आहे. त्याचवेळी त्यांच्या मनात आले की त्यांच्यासारखे कितीतरीजण असतील ज्यांना याच समस्येचा सामना करावा लागणार असेल. या योजनेला अंमलात आणण्यासाठी लोकांच्या अडचणींचा विचार करून मी एक संकेतस्थळ तयार केले”

अक्षत यांनी तयार केलेले हे संकेतस्थळ क्रियाशील आहे आणि दिल्ली तसेच एनआरसीच्या अनेक लोकांना त्याचा फायदा झाला आहे.

image


या संकेतस्थळाच्या कार्यप्रणालीबाबत अक्षत यांनी सांगितले की, “ या ठिकाणी आपली नोंदणी करण्यासोबतच वापरकर्ते आपले नांव मोबाईल क्रमांक, आणि जर त्यांच्याजवळ आपली गाडी असेल तर तर त्याचा नोंदणी क्रमांक इत्यादी माहिती देतात. त्यानंतर आपण एकादिशेने की दोन्ही दिशेने प्रवास करणार का याचा तपशील देऊन पर्याय निवडावा लागतो, त्या नंतर ग्राहकांना ते कुठून प्रवास सुरू करणार आणि कुठे उतरणार ते देखील सांगावे लागते. त्या़नी दिलेल्या या महितीच्या आधारे अन्य लोकांच्या माहितीशी संकेतस्थळ ताळमेळ करून सहयात्री आणि त्यांचे मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती स्क्रिनवर उपलब्ध करून देते. त्यानंतर तुम्हाला पसंत असलेल्या सहप्रवाश्यांसोबत फोनवरून संपर्क करून प्रवास निश्चित करता येतो.”

अक्षत याचे म्हण णे आहे की, त्यांची ही वेबसाईट वापरण्यास खूपच सोपी आहे. त्यावर कुणालाही सहजपणाने आपले सहयात्री निवडता येतात.

या शिवाय या संकेतस्थळाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षेसाठी आपणास ज्यांच्या सोबत जायचे आहे त्यांच्या सोबत जायचे आहे त्यांच्या लैंगिकपर्यायाची देखील तुम्ही निवड करु शकता. जसे महिलांना महिला सहयात्री हवे असल्यास त्यांना तसा पर्याय निवडता येतो. अक्षत सांगतात की, आजच्या काळात विशेषत: महिलांमध्ये प्रवासात सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा ठरला आहे. त्यामुळेच या संकेतस्थळात तसा पर्याय दिला जेणेकरून कारने प्रवास करताना सहजपणे सहयात्री निवडता यावा. त्यासोबतच याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, सहयात्री निवडताना त्यांचे वय इत्यादी माहिती देखील घेता येते.

अक्षत सांगतात की, “ हे संकेतस्थळ अनेक प्रकारच्या चाचपण्या करत वापरकर्त्यांना त्यांच्याजवळ उपलब्ध जागा आणि मार्ग याबाबत एकमेकांना माहितीने जोडते आणि पर्याय निवडण्याची मुभा देते. मी जे संकेतस्थळ तयार केले आहे, ते कार्यासुचीप्रमाणे काम करते. त्यात वय,लिंग,व्यवसाय, प्रवास करण्याची वेळ याची खबरदारी घेत कारचालवण्याच्या पर्यायांचा समावेश सुचवता येतात.”

एकदा वेबसाइटला यश मिळाल्यावर अक्षत यांचा मानस आहे की, असेच एक मोबाईल ऍप तयार करावे असा आहे.

image


अक्षत पुढे सांगतो की, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सरकारला असा कठोर निर्णय घ्यावा लागला त्यामुळे रस्त्यावर चालणा-या गाड्यांची संख्या कमी होऊन निम्मी झाली आहे. अशावेळी तेवढ्याच लोकांना सहयात्री शोधून आपल्या गंतव्य ठिकाणी जाण्याचा पर्याय उपल्ब्ध झाला आहे. अक्षत पुढे सांगातात की, या संकेतस्थळाची सर्वात मोठी विशेषता ही आहे की,यात सम वाहनवाले दिवस केवळे त्याच प्रकारच्या सम क्रमांकाना उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच विषमसंख्यावाले दिवस विषम क्रमांकाना उपलब्ध करण्यात आले आहेत.”

अक्षत यांचे हे संकेतस्थळ एक ते पंधरा जानेवारीपर्यंतच प्रभावीपणाने उपयोगात येणार नाही तर दैनंदिन प्रवास करणा-यांना देखील हिचा उपयोग होणार आहे. आज अश्या प्रकारच्या अनेक संकतस्थळांनी लोकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे मात्र केवळ वयाच्या तेराव्या वर्षी असा प्रयोग यश स्वी करणारा अक्षत यांचा प्रयोग लोकप्रिय झाला आहे. सध्या लोकांना यातून एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे परंतू भविष्यात आणखी विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.

वेबसाईट www.odd-even.com

लेखक: निशांत गोयल

अनुवाद : किशोर आपटे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags