संपादने
Marathi

'स्टार्टअप इंडिया' कार्य़क्रमात तज्ज्ञांनी केली भारताच्या आर्थिक क्षेत्राबद्दल भविष्यवाणी

Team YS Marathi
25th Jan 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

जेव्हा भारत सरकार जनधन योजना, आधार नोंदणी आणि पेमेंट बॅंक परवान्यांसारख्या योजनांनी फायनान्शियल एक्स्लुजनची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा फायदेशीर असलेल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशभरातील स्टार्टअप्स आर्थिक समावेशकतेचा (फायनान्शियल इन्क्लुजन) विस्तार करत होते. टेकसायन्सच्या अहवालानुसार, भारतातील मोबाईल वॉलेट मार्केट २०२० सालापर्यंत ६.६ अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठणार आहे. यासाठी स्मार्टफोन्सचा वाढता वापर, मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांची वाढती संख्या, सरकारची ध्येय आणि लोकांची अनुकूल भूमिका या गोष्टींचा पाठिंबा कारणीभूत ठरणार आहे. भारतातील ५० टक्के स्मार्टफोन वापरकर्ते हे १८ ते ३० या वयोगटातील आहेत.

image


१६ जानेवारी रोजी देशाची राजधानी दिल्ली येथे झालेल्या स्टार्टअप इंडिया कार्यक्रमात फिन्टेक संलग्न क्षेत्राचे संस्थापक आणि तज्ज्ञ एकत्रित आले होते. त्यांनी आपल्या अनुभवाचे कथन या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या उद्योजकांना केले. या पॅनेलमध्ये आयस्पिरीटचे सहसंस्थापक शरद शर्मा, पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा, इको फायनान्शियल्सचे मुख्य कार्य़कारी अधिकारी अभिषेक सिन्हा, सीजीएपी डिजिटल फायनान्स प्लस (वर्ल्ड बॅंक) आणि वरिष्ठ आर्थिक तज्ज्ञ कबीर कुमार, आथरटोन कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक नितिन मेहता, एडकास्टचे संस्थापक कार्ल मेहता आणि एकस्टेपचे प्लॅटफॉर्म प्रमुख संजय जैन यांचा समावेश होता. या सत्राची सुरुवात शरद यांनी एक रंजक प्रश्न विचारुन केली तो म्हणजे, इथे उपस्थितांपैकी कोणाला भारतात अजून एक उबेर हवी आहे?

शरद शर्मा यांच्या मते, पुढील उबेर ही भारतातील आर्थिक क्षेत्रातून येणार आहे. देशातील ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे, अशा ९४२ दशलक्ष लोकांना सेवा पुरवण्याची क्षमता फिन्टेक स्टार्टअप्समध्ये आहे. यापद्धतीची पायाभूत सुविधा ही जगात कोठेही आढळणार नाही, असे ते सांगतात. तसेच आर्थिक समावेशनची क्षमता त्यात असून, हे याआधी शक्य नव्हते. सिन्हा यांच्या मते, पेमेंट क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी हिच चांगली वेळ आहे. ज्यामुळे येत्या दोन ते तीन वर्षात ३०० ते ४०० दशलक्ष नवे ग्राहक उद्गमन होऊ शकते, ज्यांच्याकडे स्मार्टफोन्स आणि आधार कार्ड आहेत. सरकार सध्या भरपूर बॅंक खाती खोलत असल्याने आपण डाटाच्या बाबतीतील गरिबीकडून श्रीमंतीकडे आलो आहोत. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने पहिल्यांदा २० पेक्षा अधिक परवाने जारी केले आहेत. भारतातील आर्थिक सेवा बाजारपेठेतील व्यत्ययाचे उदाहरण देताना कुमार विजय शेखऱ शर्मा यांची पेटीएमद्वारे सक्रिय अशी आर्थिक इकोसिस्टमची भारतात निर्मिती केल्याने प्रशंसा करतात. भारतात आर्थिक सेवांकरिता रंजक अशी बाजारपेठ का आहे, याची दोन मुख्य कारणे ते देतात. त्यापैकी एक म्हणजे, जगातील बॅंकविरहित लोकसंख्येमध्ये भारताचा सर्वाधिक वाटा आहे. याव्यतिरिक्त कल्पक धोरण निर्मितीमुळे योग्य पायाभूत सुविधा, पर्यावरण तसेच कॉर्पोरेट आणि स्टार्टअप्समध्ये सकारात्मक परिणाम दिसतात.

कार्ल मेहता यांच्या मतानुसार, लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक साधने उपलब्ध करुन देणे, हे निर्णायक ठरू शकते. आर्थिक क्षेत्रामध्ये व्यत्यय आणायची क्षमता भारतामध्ये आहे. ते सांगतात की, भारतातील आर्थिक क्षेत्र हे अमेरिकेपेक्षा अधिक चांगले आहे. कारण आपल्याकडे असा एप्लिकेशन स्तर आहे ,जो कोणालाही आकर्षित करू शकतो. सध्या जगातील सुसंकृत समजल्या जाणाऱ्या अमेरिकन आर्थिक बाजारपेठेतदेखील तो उपलब्ध नाही. विजय शेखऱ शर्मा सांगतात की, जेव्हा मी पेटीएम सुरू केले, तेव्हा बोर्डमधील सदस्यांनी मला सांगितले की, मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका पत्करला आहे. सद्यस्थितीला रोख पैसे वापरणे लोकांना सोयीस्कर वाटते. स्मार्टफोन्स आणि एप्लिकेशनमधील क्रांतीने ग्राहकांमध्ये झालेल्या बदलाचा साक्षीदार भारत आहे. सप्टेंबर २०१५मध्ये मोबाईल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म पेटीएमने चिनी ई-कॉमर्समधील प्रमुख असलेल्या अलिबाबाकडून ५०० दशलक्ष डॉलर्स एवढा निधी वाढवला. जुलै २०१५ मध्ये त्याच्या वापरकर्त्यांचा आकडा १०० दशलक्षाच्या पार गेला होता.

नितिन मेहतांच्या वक्तव्यानुसार, भारतात मोठ्या संख्येने नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकते. 'दारिद्रय रेषेखाली अद्यापही बरेच लोक राहत आहेत. आपल्याला त्यांचे जीवनमान सुधारायचे आहे. उदाहरणार्थ – ओला टॅक्सी चालक प्रतिमहिना ६० हजार रुपयांची कमाई करतो. जर महिला टॅक्सी चालकांकरिता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले. तर त्यांच्याकरिता ही सुवर्णसंधी ठरू शकते.' भारतातील संशोधनाबाबत बोलताना विजय शेखर शर्मा सांगतात की, स्मार्टफोन्सचा वाढत असलेला वापर हेच भारताच्या प्रत्येक क्षेत्रातील यशाचे गमक आहे. प्लास्टिकची पिढी वगळून आपण मोबाईलच्या पिढीकडे फार जलदगतीने प्रवास केला आहे आणि त्यामुळे आपण अधिक सेवा पुरवण्यासाठी सक्षम आहोत. स्मार्टफोन आणि मोबाईल इंटरनेट या देशात चमत्कार घडविल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

लेखक – अपराजिता चौधरी, आयुष शर्मा

अनुवाद – रंजिता परब

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags