संपादने
Marathi

मदरशांमधील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात रंग भरतायेत आयआयटीयन्स

Team YS Marathi
20th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share


दुसऱ्याचं आयुष्य बदलून टाकणारी एखादी सुंदर कल्पना म्हणजे सर्वकाही असतं..याचं उत्तम उदाहरण म्हणजे आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांचा एक अनोखा उपक्रम...त्यांनी आपल्या कल्पनेला मूर्त स्वरुप देत मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात रंग भरले. आयआयटीच्या या विद्यार्थ्यांनी मदरशांमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी डेस्क (उतरते टेबल )भेट दिलेत. विशेष म्हणजे या छोट्या डेस्कचं रुपांतर बॅगमध्येही होऊ शकतं.


image


दिल्ली आयआयटी कॅम्पसच्या जवळ आरकेपुरम् सेक्टर-4 मध्ये जामिया मोहम्मदिया मदरसा आहे. या मदरशामध्ये शंभरहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला यातील 30 विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्वावर डेस्क- कम-बॅग भेट दिले. या निळ्या, केशरी, हिरव्या रंगांच्या या डेस्कना पाहून या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. या डेस्कमुळे विद्यार्थ्यांना मदरशांमध्ये शिकणं घेणं आणखी सोयीचं झालं आहे. या डेस्कचे रंग तर मुलांना खूपच आवडतात, असं मदरशामध्ये काम करणाऱ्या अब्दुल शरीफ यांनी सांगितलं. हे डेस्क आम्ही स्कूल बॅग म्हणूनही वापरू शकतो आणि त्यात आम्ही आमची पुस्तकं, सामान तर ठेवू शकतोच पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्याचं अजिबात ओझं होत नाही, असं एका विद्यार्थ्यांनं सांगितलं.


image


गेल्यावर्षी आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या टीमनं काही मदरशांना, सरकारी शाळांना भेट दिल्यावर तिथले विद्यार्थी जमिनीवर बसून शिक्षण घेत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पाठीत आणि मानेत दुखायचं. तसंच त्यांच्या डोळ्यांवरही परिणाम होत होता. यावर उपाय म्हणून आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या टीमचे प्रमुख वासू टेकरीवाल यांनी आपल्या टीमसोबत खूप चर्चा आणि संशोधन केलं. आम्हाला जे काही द्यायचं ते अगदी स्वस्त आणि वजनानंही हलकं असायला हवं यावर आम्ही ठाम होतो. त्यासाठी आम्ही अनेक प्रकारचं साहित्य वापरून प्रयोग करून पाहिले. शेवटी कार्डबोर्डपासून बनविलेल्या ए-मेजवर आम्ही शिक्कामोर्तब केलं.


image


आयआयटी दिल्लीमध्ये केमिकल इंजिनियरिंगमध्ये एम.टेक करणारे वासू सांगतात की सुरुवातीला आरके पुरम् सेक्टरमधल्या जामिया मोहम्मदिया मदरशांमधील 30 विद्यार्थ्यांना हे डेस्क दिल्यावर दोन आठवड्यांनी त्यांनी या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. तेव्हा त्यांना अपेक्षेपेक्षा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. या विद्यार्थ्यांना जाणवणारा पाठीचा आणि मानेचा त्रासही हे डेस्क दिल्यावर कमी झाला. परिणामी विद्यार्थी मन लावून जास्त वेळ शिकायला लागले. आता उर्वरित विद्यार्थ्यांनाही हे डेस्क लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ असं वासू यांनी सांगितलंय.


image


तसंच मदरशांमधील या विद्यार्थ्यांना पुनर्प्रक्रिया केलेल्या कागदांच्या वह्यादेखील पुरवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणविषयक जागरुकता निर्माण करणं हा यामागचा उद्देश आहे, असं वासू यांनी सांगितलं. कागदाचा पुनर्वापर केल्यानं किती झाडं वाचू शकतात, पर्यायानं आपलं पर्यावरण वाचू शकतं हा संदेश या विद्यार्थ्यांना देँणं हा यामागील हेतू आहे.


image


आयआयटीचे एक विद्यार्थी दक्ष अरोरा यांच्या टीमनं वृंदावन इथल्या मैत्री या आश्रमात राहणाऱ्या विधवा महिलांना एक महिन्यापूर्वी डेस्क बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. या टीमनं दोन दिवसांतच 50 पेक्षाही जास्त महिलांना प्रशिक्षण दिलं. आता लवकरच वृंदावनमधील या महिलांनी बनवलेले डेस्क या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या महिलांनाही उत्पन्नाचं साधन मिळालंय.

लेखक – अनमोल

अनुवाद – सचिन जोशी

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags