संपादने
Marathi

स्वप्नातली लक्झरी कार बनवणारी एचआय प्रायव्हेट लि.

Team YS Marathi
9th Feb 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

बेंटली अझ्युर, मर्सिडीझ बेंझ मेबॅच, रोल्स रॉयस फॅन्टम आणि डीसी अवंती... या आणि अशाच प्रकारच्या मागणीनुसार गाड्या (मेड टू ऑर्डर) तयार करणारी कंपनी म्हणजे एचआय प्रायव्हेट लिमिटेड. मेड टू ऑर्डर लक्झरी कार तयार करणं हेच या कंपनीचं उद्दीष्ट आहे...त्यामध्ये त्यांनी भारतात अनेक पायंडे रचलेत. सध्या आपण अशा युगात आहोत, जिथे आपले बूट, सूट, दागिने आणि बॅग्ज सगळं काही आपल्याला हवं तसं डिझाईन केलेलं असतं. त्यामुळेच ह्रदयेश कुमार नामदेव यांनी मागणीनुसार हव्या तशा गाड्या उत्पादित करण्याची सुविधा देण्याचं ठरवलं. ग्राहकाच्या स्वप्नातली कार तयार करण्यासाठी जागतिक दर्जाचा उत्पादन ब्रँड तयार करणं ही त्यामागची कल्पना होती.

२०१५ मध्ये भारतात या ब्रँडची सुरुवात झाली. आता त्यांच्या मागणीनुसार जागतिक दर्जाच्या गाड्या तयार करणारा एक समूह झाला आहे. एचआय प्रायव्हेट लिमिटेड तुम्हाला हवी तशी कार खास तुमच्यासाठी, तुमच्या मागणीनुसार तयार करते...अशाप्रकारची कार संपूर्ण जगात एकमेव असते, असं एचआय प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संचालक आणि सीईओ ह्रदयेश सांगतात. ह्रदयेश फक्त ३६ वर्षांचे आहेत. ‘मॉरीस स्ट्रीट’ ही त्यांनी हातानं बांधलेली, तयार केलेली पहिली लक्झरी कार.


image


प्रायव्हेट बँकिंगमधलं करियर आणि एचएनआय आणि काही राजघराण्यांची संपत्तीविषयक कामं हाताळल्यानंतर ह्रदयेश यांच्या लक्षात आलं की लक्झरी कार आणि अगदी मर्यादित असलेल्या कलाकृती आणि अन्य उत्पादनं जमा करणं हे त्यांच्या बहुतेक ग्राहकवर्गाची आवडती गोष्ट होती. हे सगळेजण जगातल्या सर्वोत्तम ब्रँड्सच्या कार विकत घेत असत. ते पाहिल्यावर जर आपण जागतिक दर्जाच्या लक्झरी गाड्यांचा भारतीय ब्रँड तयार केला, तर चमत्कारच होईल हे ह्रदयेश यांच्या लक्षात आलं.

कोणत्याही लक्झरी उत्पादनांमध्ये हे फक्त खास आपल्यासाठीच असलं पाहिजे अशी प्रत्येकाची अत्यंत प्रबळ इच्छा असल्याचं ह्रदयेश यांच्या लक्षात आलं होतं. मास्टरपिस म्हणजे अगदी एकमेव लक्झरी उत्पादन देणारी एचआय सुरु करण्यामागे हे सुरुवातीचे विचार होते. अर्थातच त्यानंतर त्याबाबत त्यांनी जगभरातलं या विषयावरचं संशोधनही केलं आणि त्यातूनच एचआयची निर्मिती झाली.

त्यामुळेच ह्रदयेश यांनी त्यांचे वडील एम. लाल यांच्यासोबत एचआय सुरु केलं. एम. लाल यांनी भेलसाठी ३४ वर्ष अनेक अभियांत्रिकी विभाग हाताळले. एचआयची प्रत्येक कार ही एकमेव असते आणि ती हातांनी जोडलेली असते. कारची उत्पादन प्रक्रिया म्हणजे त्याचं डिझाईन, मशिनरी, साचा, वैशिष्ट्यं, कार्य आणि अगदी शेवटचा हातही फिरवला जातो तो त्या गाडीच्या मालकाच्या मागणीनुसार, त्याला हवा तसाच...

एकदा तयार केलेलं अशा प्रकारचं मॉडेल हे कधीही बदललं जात नाही किंवा पुनर्उत्पादितही होत नाही, असं त्यांची टीम सांगते. अशा प्रकारच्या कार फक्त आणि फक्त मागणीनुसारच बनवल्या जातात आणि त्या नेहमीच्या माध्यमांतून विक्रीसाठी उपलब्ध नसतात.

ग्राहकानं ऑनलाईन मागणी केली की मग सगळ्यांत आधी त्या ग्राहकाची गरज काय हे सगळी टीम समजावून घेते. त्यानंतरचा टप्पा खूप महत्त्वाचा असतो, तो म्हणजे मांडलेली कल्पना प्रत्यक्षात उतरवणं खरोखर शक्य आहे का याची चाचपणी टीम करते. अगदी फुलपाखरासारखी दिसणाऱ्या कारची मागणीही असू शकते, असं ह्रदयेश सांगतात. अशा प्रकारची गाडी कदाचित संग्रहालयात खूप छान दिसेल. पण रस्त्यावर सेवा देण्याच्या अगदी व्यावहारिक हेतूसाठी तिचा काहीच उपयोग होणार नाही, असंही ते स्पष्ट करतात.

कंपनीची बहुतेक उत्पादनं ही एनसीआर आणि मुंबईच्या सेटअपमधून तयार केली जातात. यंत्रणेबद्दल जर ग्राहकाची विशिष्ट मागणी असेल तर ती पुरवली जाते. जगभरातून कुठेही मागणी नोंदवली जातं असली तरी उत्पादन मात्र भारतातच केले जाते.

एचआय कंपनी सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. जागतिक पातळीवरील संस्थांकडून आर्थिक मदत, गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

जगभरातून तीनशे निमंत्रण आल्याचा दावा एचआय कंपनी करतेय. सध्या ते काही नवीन प्रकल्पांवर काम करत आहेत. प्रत्येक कारची सरासरी किंमत १० लाख डॉलरच्या घरात आहे. पण काही प्रकारांनुसार किंमतीतही फरक असतो. जागतिक बाजारपेठेत नवीन काहीतरी सुरू करण्यासाठी एचआय सुरू केल्याचं ह्रदययेश सांगतात. कितीही स्पर्धा असला तरी आम्ही सतत काहीतरी संशोधनात्मक आणि निर्मितीक्षम असं करु असा दावाही ते करतात.

पत मानांकन देणाऱ्या ICRA या संस्थेच्या पाहणीनुसार भारतात लक्झरी कारची विक्री २०२०पर्यंत सध्याच्या ३० हजार वरुन एक लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. सध्या सुमारे १ कोटी ८ लाख भारतीय हे कोट्यधीश म्हणून गणले जातात, तसंच ही संख्या वेगानं वाढण्याचा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे जागतिक पातळीवर आरामदायी कार खरेदी करणाऱ्यांच्या यादीत भारतीयांचं स्थान काय आहे याचा अंदाज बांधता येतो.

भारतातील कार विक्रीमध्ये लक्झरी कारच्या विक्रीचं प्रमाण १.५ टक्क्यांपेक्षाही कमी होतं. जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत तर हे प्रमाण अगदी नगण्य आहे. बीएमडब्लूचे अध्यक्ष फिलीप वॉन सहर यांच्या मते मेट्रो शहरांबरोबरच टू टायर आणि थ्री टायर शहरांमध्ये विक्रीची संधी जास्त आहे. वाढती बाजारपेठ म्हणजे तीव्र स्पर्धा..२०१४-१५ या वर्षात ११ हजार २९२ वाहनं विकली गेल्याचं ऑडी कंपनी सांगते. तर मर्सिडिज बेंझच्या दाव्यानुसार त्यांची ११ हजार २१३ वाहनं विकली गेली. याचा अर्थ दोन्ही कंपन्यांच्या विक्रीत गेल्या वर्षीपेक्षा अनुक्रमे ११.५१ आणि १८ टक्के वाढ झालीये. पण मोठ्या आणि ब्रँडेड गाड्यांच्या या युगात एचआय कुठे असेल यावर ह्रदयेश यांचं उत्तर वेगळं आहे. त्यांच्या मते गाड्यांचं मर्यादित उत्पादन घेण्यापेक्षा एकच गाडी तयार करण्यावर त्यांचा भर असेल.

यासारख्या काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

पिक्काबॉक्स – जगप्रवासादरम्यान पायाभरणी एका आगळ्यावेगळ्या व्यवसायाची

प्रदुषणमुक्तीसाठी शाळकरी मुलांनी पंधरा दिवसांत तयार केली सौरऊर्जाधारित कार!

सर्वकाही फिक्स करते ʻफिक्सोफीʼ

आणखी काही प्रेरणादायी यशोगाथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.

लेखक- सिंधु कश्यप

अनुवाद- सचिन जोशी

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags