संपादने
Marathi

फिल्ममेकर ते बेकर : पूनम मारिया यांचा अनोखा प्रवास

Team YS Marathi
22nd Nov 2015
1+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

गोल्डन कंपास आणि लाइफ़ ऑफ पाय या दोन ऑस्कर विजेत्या सिनेमांच्या श्रेयात त्यांचा ही खारीचा वाटा . अनेक वर्ष चित्रपट क्षेत्रात विज्युअल इफेक्ट ही बाजू सांभाळणाऱ्या त्या ! सात वर्षांपूर्वी त्या बेकर बनल्या. वर्ष होते २०१२ , मुलीच्या तिसऱ्या वाढदिवसाला प्राण्याच्या आकाराचा केक बनवण्याची कसरत करताना त्यांच्या डोक्यात सहजच हा विचार चमकून गेला, " माझा पहिला विचार होता तो म्हणजे हे कितपत कठीण असू शकेल ? पण जरी ते नाही जमल तरी जे काही असेल ते माझं असेल ," पूनम मारीया हैदराबाद इथल्या झोय'ज् बेक हाउसच्या मालकीण सांगत होत्या .

image


पूनम यांना बेकरीचा लागलेला छंद

मुलीच्या वाढदिवसानंतर त्या पुन्हा आपल्या कामात गर्क झाल्या. त्यांच्या बेकरीच्या आवडीने पुन्हा उचल खाल्ली ती म्हणजे त्यांच्या एका सहकाऱ्यानं आपल्या मुलीसाठी इंद्रधनुष्य असा विषय घेऊन केक कसा बनवावा याची विचारणा केली तेंव्हा " मी तो केक बनवला पण अतिशय चिंतातूर होऊन ! म्हणजे मी विचार करत होते, टीवी वर जे मोठमोठाले केक दाखवतात, ते कसे बनवत असतील? "

अनेक महिने त्यानंतर गेले आणि पूनम यांच्या कामाची जबाबदारीही वाढली आणि एकीकडे हा सगळा गोंधळ सुरु असताना त्यांनी आणखी एका सहकाऱ्यासाठी साखरेमध्ये स्टिलेटो बनवण्याचं धनुष्य पेलायचं ठरवलं. " खरंतर , या कल्पनांना व्यावहारिक स्वरूप द्यायचं असं मी काही ठरवलं नव्हतं, मी फेसबुक पेज बनवलं खर ! माझ्या मुलीच्या नावावरून झोय नावानंच हे पेज सुरु केलं ,( त्यावरूनच पुढे बेकरीच नावही आलं , झोय'ज् बेकहाउस !) कुणीही या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही की मी ते पेज बनवून विसरूनदेखील गेले होते . माझ्या नवरयाने एके दिवशी मला दाखवलं की , माझ्या पेजवरच्या अनेक पोस्ट्स चक्क वायरल झाल्या होत्या. " पुनम अगदी उत्साहात सांगत होत्या .

त्यानंतर , सुरु झाली फोन्स आणि कमेंटची मालिका. लोकांना हे केक खरेदी करायचे होते आणि पुनम यांना समजत नव्हतं की बेकिंगमध्ये करियर करावं किंवा नाही ? अर्थात त्याचं फिल्ममधील करियर उत्तमरित्या सुरु असतानाही!

image


मग आठवड्यातील शेवटच्या दिवशी त्यांनी व्यावसयिकरित्या केक बनवून द्यायला सुरुवात केली. ही कल्पना चांगलीच चालली आणि समाधानकारक कामही होऊ लागलं.

"मग मात्र मला अक्षरश: वादळासारखी केकची मागणी येऊ लागली. मला तेंव्हाच समजलं की या व्यवसायात आपला जम नक्की बसणार आणि हे भव्य दिव्यं साकारायचं म्हणजे अतिशय कठीण परिश्रम करावे लागणार होते म्हणजेच केक तयार करण्यासाठी रात्री जागून काढणं, काही चुकाही झाल्यात मात्र माझ्या नव्या उद्यमासाठी लोकांच खूप सारं प्रेम संपादन करणं माझ्यासाठी महत्वाचं होतं " पूनम आठवणीत रमल्या होत्या .

image


बेकिंगचा नवा अध्याय:

एक वर्षभरानंतर त्यांनी त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचं (पर्सी जेक्सन -सी ऑफ मॉनस्टर्स ) काम संपलं आणि ऱ्हिदम एंड ह्यूज मधली नोकरी सोडली. त्यांच्या बेकिंगच्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्याचा त्यांनी विडा उचलला होता .पुनम यांच्या मते या कामात पैसे चांगले मिळतात पण यात लागणाऱ्या मेहनतीमुळे अनेक लोक बेकरी व्यवसायाला फारसं महत्त्व देताना दिसत नाहीत. पुनम म्हणतात , की लोकांच्या सतत विचारणा सुरु असतात सोशल मिडियाच्या आधारे चौकशी सुरु असते , फोन येत असतात " लोकांना वाटत की माझ्याकडे एक भली मोठी टीम आहे , पण तसं नाहीये , हे म्हणजे अक्षरश: काठावर उभ राहून , स्वत:च काळजीपूर्वक चालणं अशी अवस्था माझी आहे . माझे पती माझा कणा आहेत , त्यांच्या सहकार्याशिवाय झोयज हे फक्त एक स्वप्न राहिलं असतं." पुनम सांगत होत्या .

उद्योजिका बनण्याचा प्रवास :

पूर्वी नोकरी करणाऱ्या आणि आता उद्योजिका म्हणून वावरणाऱ्या पुनम यांच्या मते , या दोन्ही कामात चढउतार आहेत . झोयज् बेकहाउसनं मात्र पुनम यांना स्वत:ची ओळख दिलीय. जी त्यांनी स्वत: बनवलीय आणि लोकांमध्ये त्यांची यासाठी प्रशंसा होणं याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.

" विज्युअल इफेक्ट्स साकारणं , खरंच खूप कठीण काम आहे. कारण काम कधी लांबेल याचा भरवसा नसतो. मला आठवतंय, मी तब्बल १४ ते १५ तास सलग काम केलंय आणि अनेकदा त्यामुळे मला माझ्या मुलीला बघायलाही मिळायचं नाही . आताही मी तब्बल १२ तास काम करते पण काम आणि घर याचा समतोल संभाळणं आता सोपं जातं. माझ्या मुलीसाठी मी कधीही अगदी हाकेच्या अंतरावर असते " पुनम आपलं मनोगत मांडत होत्या .

image


उद्योजिका म्हणून कठीण होतं ते म्हणजे ग्राहकांशी बोलणं आणि अधिकाधिक व्यवसाय खेचून आणणं. सुरुवातीला त्यांना ते खुप कठीण गेलं " तुमचा ग्राहक आणि बाजारपेठ ओळखणं अत्यंत गरजेच असतं. कष्टाचं फळ मिळतच आणि चांगलं काम कधीच स्वस्त नसतं," पुनम म्हणतात. " स्वयंपाक घरात फार काळ राहणं हे अतिशय जाचक वाटू शकत पण जसं जसे तुम्ही रूळत जाता तो तुमच्या आयुष्याचा एक भाग होऊन जातो." पुनम सांगत होत्या

महिलांनी आत्मनिर्भर व्हावं

पुनम यांच्या मते, महिलांनी नेहमीच सक्षम असावं आणि जोवर शरीर साथ देत राहील, तोवर स्वत:ला सिद्ध करा. अगदी घरून करण्याचं काम असो किंवा मग बाहेर संपूर्ण वेळ खाणारं काम असो , " मुलं मोठी होतात आणि त्यांच्यासोबत तुम्हीही. एकदा का ती त्यांच्या आयुष्यात स्थिरस्थावर झाली की , तुमची असणारी ओळखच तुम्हाला आयुष्यभर साथ देते," एक अनुभवी माता म्हणून पुनम बोलत होत्या. पुनम आता स्वत:चा व्यवसाय ऑफलाईन म्हणजेच स्वत:चं बेकरी हाऊस सुरु करण्याच्या विचारात आहेत, पण मुलीच्या आणि पतीच्या व्यस्त दिनक्रमामुळं सध्या त्यांना ते शक्य नाही .

" पण कधीतरी हे स्वप्नही पूर्ण होईलच . " पुनम अगदी आत्मविश्वासानं सांगत होत्या.


लेखिका - सस्वती मुखर्जी

अनुवाद - प्रेरणा भराडे

1+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags