संपादने
Marathi

तरुणांच्या एका समूहाने हडली गावात उपलब्ध केल्या रोजगारांच्या संधी

23rd Feb 2017
Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share

हडली हे कर्नाटकातील बेळगावपासून २९ किमी अंतरावरील लहानसे गाव आहे. जे नकाशात दिसत नाही. तरीही येथील सात हजार लोक गरिबी, असुरक्षा आणि बेरोजगारीच्या झळा सोसत जगत आहेत. येथे सातत्याने ही भिती असते की कधी आणि कुठे हातचे काम जाईन आणि नवे कसे मिळेल. हडलीच्या लोकांनीही मग लहान शहरे आणि मोठ्या नगराकडे धाव घेन्यास सुरुवात केली, जे भारताच्या जवळपास प्रत्येक गावात घडत असते.

या गावात खादीग्राम आहे, जे १९३७मध्ये महात्मा गांधी यांनी सुरु केले आहे. खादीग्राम लोकांना गावात रोजगार मिळवून देते आणि तो टिकवूनही ठेवते. या गावात २५ महिला आहेत ज्या अप्रतिम लोणची तयार करतात. “ त्या अशी लोणची तयार करतात की तुमच्या आज्जीलाही आवडतील ” हडली प्रकल्पाचे प्रमुख सांगतात. तरुणांच्या एका समूहाने हडली गावात रोजगार निर्मितीला चालना देण्यास सुरुवात केली, ज्याला खादीग्रामचा पाठिंबा आहे. या प्रकल्पात शंभर नव्या महिलांना रोजगार देण्याचा उद्देश आहे ज्यातून हडली येथील लोणच्या बाबत जागृती आणि मागणी वाढेल. हडली प्रकल्पाचे संथापक आहेत प्रोणोय राय, अमित वाडावी, आणि आदर्श मुथाना. या चमूने गावातील लोकांच्या स्थलांतराला थांबविताना तातडीने रोजगार कसा देता येईल, आणि तो टिकवून कसा ठेवता येईल याचा विचार केला. प्रोणोय यांनी युवर स्टोरी सोबत चँट करताना सांगितले की, “ आम्ही तिघे एमयू सिग्मा मध्ये सल्लागार आहोत, जी शास्त्रीय-निर्णय संस्था आहे. आम्हाला वाटले की आम्ही किमान काही ग्रामिण संस्थाना तरी मदत केली पाहिजे, ज्यांना समस्या असतील, जे गुंतागुंतीच्या व्यवसायात असतात. आमचा विश्वास आहे की, आमच्या प्रयत्नातून ग्रामिण प्रश्नाकडे पाहण्याची शहरी दृष्टी बदलून जागरुकता वाढेल. केवळ हडलीच्या महिलांच्या बाबतीत नाहीतर एकूणच अशाप्रकारच्या व्यवस्थेतील संस्था ज्या लहान आणि ,मध्यम ग्रामिण क्षेत्रात कार्यरत आहेत.


image


आर्थिक बाबीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “ आम्ही नुकतीच सुरुवात केली आहे, आम्ही आमच्या बचतीचा वापर करत आहोत, आणि जोवर हे वर्गणीच्या पध्दतीवर चालेल, तोवर आमच्याकडील गंगाजळी वाढेल, आणि आम्ही सक्षम होवू शकू. आम्हाला वाटते की वर्गणीच्या तत्वावर खाद्य पदार्थ निर्मितीच्या इ कॉमर्स कंपन्या आणि आम्ही आमच्या मते काही काळात चांगल्या स्थितीत जावून पोहोचू. थोड्याच कालावधीत आम्ही ऑफलाइन पध्दतीने कंपन्याना आणि त्याच्या मालकांना भेटत आहोत. दीर्घ कालावधीत आम्ही हडली खादीग्रामची आणखी काही उत्पादने बाजारात आणू, या मोहिमेत आणखी काही लोकांना जोडू शकू, आणि आणखी काही गावाना समृध्दीच्या दिशेने घेवून जावू शकू.”

केवळ २५ दिवसांच्या कामगिरीत, हा चमू तिहेरी अंकाच्या जवळ पोहोचला आहे, आणि देशभरातून मोठ्या प्रमाणात मागणी येवू लागली आहे, यासाठी तयार केलेल्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात लोकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या जसे की फरहान अख्तर, शशी थरुर, आणि विल्यम डार्यंपल. ते म्हणतात की अजून खूप काही करता येईल, जेणे करून ३० हजार ग्राहकांपर्यंत पोहोचता येऊ शकेल.

ही लोणची हडलीप्रोजेक्ट डॉट. कॉम. वर येत्या १२ महिन्यात उपलब्ध होतील, आणि १८ महिन्यात वर्गणीच्या पँकेजमध्येही, ज्यात जवान या ब्रँण्ड नावाने २५०ग्रँमच्या जार किंवा पाकिटे ग्राहकांना प्रतिमहिना पाठविली जातील. यातून निश्चित मासिक उत्पन्न मिळत राहील, त्यातून लोणच्याची निश्चित मागणी नोंदली जाईल आणि वर्षभर असलेल्या बेरोजगारीच्या भितीच्या सावटातून बाहेर पडता येईल.

यावर आणखी भाष्य करताना ते म्हणाले की, “ हडली प्रकल्प हा प्रयोग आहे. जर ग्रामिण उत्पादकांच्या मालाला मागणी मिळाली, आणि बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला. शहरी लोक ती घेतील का? जर उत्तर होय असेल तर त्यांना पारंपारिक पाक कृती संवर्धन करण्यासाठी मार्ग मिळेल, रोजगार मिळेल आणि ग्रामिण महिलांना सक्षम करता येईल. त्यांच्यात स्वयंपूर्णता येईल आणि त्यातून ग्रामिण संस्थाना सक्षम करण्याचा मार्गही मिळेल.”

एमयू सिग्माच्या या व्यावासायिकांच्या गटाचे हे कार्य निश्चितच दाद देण्यासारखे आहे,युवर स्टोरी त्यासाठी येथे त्यांना शुभेच्छा देते, हडली प्रकल्प असाच यशस्वी होवो, आणि त्याचे उद्देश सफल ठरो!

Add to
Shares
3
Comments
Share This
Add to
Shares
3
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags