संपादने
Marathi

लेफ्ट. कर्नल राजा चारी: नासाचे तिसरे मूळ भारतीय वंशाचे अंतराळवीर!

Team YS Marathi
16th Jun 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

नासाने १२ नव्या अंतराळवीरांची तुकडी सादर केली आहे, त्यात अमेरिकन भारतीय लेफ्ट. कर्नल राजा चारी यांचा देखील समावेश आहे. १८ हजार अर्जातून ज्या बारा जणांची निवड करण्यात आली त्यांना आता खडतर समजल्या जाणा-या प्रशिक्षणाला जावे लागणार आहे, ज्यामध्ये त्यांना अंतराळात वेगवेगळ्या स्थितीत, पृथ्वीच्या कक्षेत तसेच खोल अंतराळात कसे राहावे यांचे शिक्षण देण्यात येईल.


Image source: Huffington Post

Image source: Huffington Post


या तुकडीत सात पुरूष आणि पाच महिला आहेत. १९५९पासूनचा हा बावीसावा वर्ग असेल ज्यात अमेरिकेच्या अंतराळयात्रींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गेल्या वीस वर्षातील अंतराळयात्रीच्या प्रशिक्षणार्थींची ही सर्वात मोठी तुकडी आहे.

नासाचे अंतराळवीर राजा यांची अधिकृत ट्वीटर हँडलवरून नुकतीच ओळख करून देण्यात आली.

Follow

imageAdd to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags