संपादने
Marathi

राष्ट्रीय पुरस्कार पटकाविल्यानंतर सैराटच्या नायिकेची नवी उपलब्धी!

Team YS Marathi
18th Jun 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

ज्यावेळी त्यांचा सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकला त्यावेळी १७ वर्षाच्या प्रेरणा एम राजगुरू ऊर्फ रिंकू हे नाव फारसे परिचित नव्हते. २०१५ मध्ये मात्र राष्ट्रीय पुरस्कारात मराठीतील लोकप्रिय सिनेमा सैराट मधील भूमिकेसाठी विशेष समावेश म्हणून तिचे नाव जाहीर झाले, त्यावेळी ती लोकप्रियतेच्या शिखरावर होती. नुकतेच तिने शालांत परिक्षेत ६६.४० टक्के गुण घेत यश संपादन केले आहे.


image


मराठीमधील ब्लॉकब्लस्टर सिनेमा म्हणून तिच्या सिनेमाची इतिहासात नोंद झाली आहे. ज्याने शंभर कोटीच्या कमाईचा टप्पा गाठला आहे. ज्यात निर्मात्याकडून रिंकू आणि आकाश ठोसर या दोघांना विशेष पुरस्कार म्हणून पाच कोटी रूपये बोनस मिळाला. रिंकू याच नावाने सा-या राज्यात तिची ओळख आहे, तिला हिंदीत ८७, तर मातृभाषा मराठीत ८३ आणि इंग्रजीत ५९ गुण मिळाले आहेत. तिला विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात सर्वात कमी गुण आहेत ४२, त्याशिवाय गणितात ४८, आणि समाजविज्ञान मध्ये ५०असे ६६.४० टक्के गुण तिला मिळाले आहेत, जी एकूण पाचशे गुणांची परिक्षा असते.

सन २०१४ मध्ये ती केवळ १४ वर्षाची शाळकरी मुलगी होती, ज्यावेळी तिने सैराटसाठी ऑडीशन दिली आणि दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्या कडून त्यांची निवड झाली. या सिनेमात तिने दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या तरूण मुलीची आर्चीची भूमिका साकारली आहे. जी मागास वर्गीय समाजातील मुलाच्या परश्या (आकाश ठोसर) च्या प्रेमात पडते. दोघे मिळून लग्न करतात, त्यांना छान मुल असते, मात्र त्यांना ऑनर किलींगचे बळी व्हावे लागते, सैराट आता अनेक भाषातून पुन्हा तयार करण्यात आला आहे. त्यात करण जोहर यांनी तो हिंदीतही केला आहे. पंजाबी, तेलगू, तमिळ, आणि मल्याळम. यापैकी काहीमध्ये पुन्हा रिंकूने यांनी भूमिका केली आहे. त्यापैकी कन्नडा मधील मनासू मलिगे हा फेब्रूवारी २०१७मध्ये प्रदर्शित झाला. खूप मोठी तारका कमी वयात होण्याचे मानसिक ओझे असताना रिंकूला जिजामाता कन्या शाळा या अकलूज सोलापूर येथील शाळेत जाणे अवघड झाले होते. त्यामुळे शालांत परिक्षा तिने बाहेरून दिल्याचे वृत्त आहे. २०१७च्या या परिक्षेचे निकाल नुकतेच लागले. त्यावेळी सतरा लाख विद्यार्थी परिक्षेत असताना सा-या राज्याचे लक्ष तिच्या निकालावर होते. ज्यापैकी ८८.७४ उत्तिर्ण झाले. शिवाय १९३ जणांना यावेळी शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags