संपादने
Marathi

ʻद ब्रेकफास्ट बॉक्सʼ, घरबसल्या आस्वाद घ्या पौष्टीक न्याहारीचा

Team YS Marathi
19th Nov 2015
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

जय ओझा, अवनीश जयस्वाल, मृगनयन कमथेकर आणि महर्षि उपाध्याय यांनी सुरू केलेले ʻद ब्रेकफास्ट बॉक्सʼ, ग्राहकांना घरपोच पौष्टीक आणि स्वादिष्ट भोजन पोहोचवण्याचे काम करते. बऱ्याचदा आपल्याला व्यस्त दिनचर्येमुळे व्यवस्थित न्याहारी करण्याची संधी मिळत नाही. ʻद ब्रेकफास्ट बॉक्सʼ, संकल्पनेला मूर्त स्वरुप देणे, या चौकडीकरिता सोपे काम नव्हते. त्यासाठी त्यांना प्रदीर्घ मेहनत करावी लागली. या चौघांनाही हे पक्के ठाऊक होते की, ते अशा समस्येवर उपाय शोधत आहेत, जी केव्हा ना केव्हा तरी त्यांच्या आय़ुष्यात उद्भवली होती. त्यांच्याकडे त्या काळच्या आठवणी ताज्या होत्या, जेव्हा ते स्वादिष्ट आणि पौष्टीक नाश्त्याच्या शोधार्थ अनेक ठिकाणे पालथी घालत होते आणि अखेरीस त्यांच्या पदरी निराशा येत होती.

महर्षि सांगतात की, ʻजेव्हा आम्ही घरापासून दूर राहत होतो, त्याकाळी अनेकदा आम्ही पौष्टीक नाश्ता शोधण्यास घरातून बाहेर पडत असू. आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. तरीही आम्हाला आवडीचा नाश्ता मिळत नसे.ʼ त्यावेळेसच आम्हाला जाणीव झाली की, दिवस उजाडताच सर्वांना स्वादिष्ट आणि पौष्टीक नाश्ता उपलब्ध करुन द्यायचा असेल, तर तो नाश्ता त्यांना घरपोच देण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही. ते पुढे सांगतात की, ʻसर्वात पहिल्यांदा आम्ही या मोहिमेत एका आहारतज्ज्ञाचा (न्यूट्रीशनिस्ट) समावेश केला. महिन्यातील प्रत्येक दिवशी बदलत राहणारा मेन्यू तयार करण्यात ते आम्हाला सहकार्य़ करतात.ʼ ʻद ब्रेकफास्ट बॉक्सʼ आपल्या ग्राहकांना असे पदार्थ पाकिटबंद करुन घरपोच पोहचवतात, जे पौष्टीक असण्यासोबतच स्वादिष्टदेखील असतात. सुरुवातीच्या दिवसात त्यांना जाणीव झाली की, लोकांना एका निश्चित दिवशी त्यांचे उत्पादन हवे असते. त्यानंतर लगेचच त्यांनी बाजारपेठेत आपले उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या महिन्यात त्यांनी पुण्यात ३०० डब्बे पोहोचवण्याचे काम सुरू केले. चार महिन्यांनंतर सध्या ते १२०० ते १५०० डब्ब्यांचे वितरण करतात. महर्षि पुढे सांगतात की, ʻएवढ्या कमी वेळात पुण्यातील स्थानिकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि वाढत असलेल्या संपर्कामुळे प्रोत्साहित होऊन आम्ही आमच्या व्यवसायाच्या विस्ताराचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला अन्य शहरांमध्येदेखील आमच्या शाखा सुरू करायच्या आहेत.ʼ ते सांगतात की, ʻहल्लीच काही गुंतवणूकदारांनी आणि स्थानिक व्यावसायिकांनी आमच्या या उद्योगात गुंतवणूक करण्यात तसेच आमच्यात सहभागी होण्यास रस दाखवला. मात्र आम्हाला अशा सहकाऱ्याची गरज आहे, जो आमचे विचार आणि दृष्टीकोनाशी सहमत असेल. फक्त नफा वाढवण्याकडे आमचे लक्ष नाही.ʼ

image


महर्षि सांगतात की, ʻया कामासाठी कुशल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, हे सर्वात कठीण आव्हान होते. सर्वांत पहिल्यांदा आम्ही एका घरगुती आचाऱ्यासोबत काम करण्यास सुरू केले. मात्र त्यांच्याद्वारे वाढण्यात येणारे जेवण आणि पदार्थांची तिळमात्र माहिती आम्हाला नसायची. त्यावेळेस जय आमच्या मदतीला धाऊन आला. आवडीचे जेवण बनविण्यासोबतच त्याच्या शिजवण्याच्या पद्धतीचे पालन करण्यात त्याने मदत केली.ʼ आपल्या उत्पादनाच्या वाढत असलेल्या गरजा पूर्ण करण्याच्या हेतूने या टीमला वितरणासाठी काही लोकांना अंशकालीन स्वरुपात स्वतःशी जोडावे लागले. कारण ʻद ब्रेकफास्ट बॉक्सʼ सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत लोकांना भोजन उपलब्ध करुन देते. काही कालावधीनंतर त्यांना एका चांगल्या आचाऱ्याची (शेफ) सोबत मिळाली. त्याने त्यानंतर लगेचच मुख्य आचारी आणि दोन सहाय्यकांच्या साथीने एक छोटीशी स्वयंपाकाची टीम तयार केली. महर्षि सांगतात, ʻसद्यस्थितीला आम्ही ज्या ठिकाणी आहोत, ते आमच्या जोरावर. आम्ही आर्थिकदृष्ट्या पूर्णतः स्वावलंबी आहोत. स्थापनेच्या चार महिन्यांनंतरच आम्ही आमचा दैनंदिन खर्च काढण्यात यशस्वी झालो. आमच्यासोबत काम करण्याच्या इच्छेने गेल्या काही दिवसांपासून अनेक गुंतवणूकदार आमच्याशी सतत संपर्कात आहेत. त्यांच्यासोबत आमच्या चर्चा सुरू आहेत.ʼ गेल्या चार महिन्यात पुण्यातील रहिवाश्यांकरिता पौष्टीक नाश्ता उपलब्ध करुन दिल्यानंतर येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये अन्य आठ शहरांमध्ये आपल्या या व्यवसायाचा विस्तार करण्याचा त्यांचा विचार आहे.

५० अब्ज डॉलर्सची बाजारपेठ असूनही फूडटेकच्या क्षेत्रात अनेक कंपन्या संचालित होत आहेत. फूडपांडा आणि टाईनीआऊल यांचा वाईट काळ सुरू असल्याने अनेक गुंतवणूकदार द्विधा मनःस्थितीत आहेत. त्यांना वाटत आहे की, या क्षेत्रातील संचालन अपेक्षेएवढे सोपे नसणार. याच कारणामुळे या क्षेत्रात पदार्पण करत असलेल्या प्रत्येक उद्योजकासाठी यशाचा मार्ग सोपा नसणार. जर फक्त एप्रिल महिन्यात या क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीवर नजर टाकली असता, एकूण सात व्यवहारांमध्ये ७४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. याच गुंतवणूकीच्या रकमेत ऑगस्ट महिन्यात घट होऊन ती फक्त १९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ही संख्या अवघ्या दोन व्यवहारांवर येऊ थांबली आहे. बरीच गुंतवणूक झाल्यानंतरही तज्ज्ञांच्या मते, अधिकतम स्टार्टअप जास्तीत जास्त सूट आणि कूपन्सच्या चक्करमध्ये अडकले आहेत. याशिवाय फूडटेकच्या क्षेत्रात उपभोक्त्याला आपल्याकडे आकर्षित करताना त्याला आपले उत्पादन खरेदी करण्यास तयार करणे, एक महागडा व्यवहार आहे. सूत्रांच्या मते, फूडपांडासारखे दिग्गज फूड ऑर्डरींग मंच एका ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ४०० ते ५०० रुपये खर्च करतात.लेखक - निशांत गोएल

अनुवाद - रंजिता परब

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags