संपादने
Marathi

यशस्वी क्लाऊड तंत्रज्ञान कंपनी उभारताना...

21st Mar 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

लग्नाला साधारणपणे दशकभराचा काळ लोटल्यानंतर, सर्वसाधारणपणे लोक आपल्या आयुष्यात स्थिरस्थावर झालेले असतात, मुलाबाळांची काळजी घेण्यात व्यस्त असतात.... बहुतेकांची कारकीर्दही एका निश्चित वाटेने सुरु असते. अशा वेळी नवीन स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची ताकद असणारे मात्र मोजकेच असतात... विनोथिनी राजू यांचेही आयुष्य खरे तर याच मार्गानी सुरु होते... कॉर्पोरेट क्षेत्रात नेटवर्क प्रोटोकॉलची उभारणी आणि चाचणी करण्याचे काम करण्यात त्यांनी दशकभराचा कालावधी खर्च केला होता.... आणि त्यावेळी त्यांची ओळख झाली ती क्लाऊड तंत्रज्ञानाशी.... कॉर्पोरेट माहितीची साठवणूक ही खासगी किंवा सार्वजनिक क्लाऊडवर करावी की डेटा सेंटरचाच वापर करावा, यावरुन खरं तर त्यावेळी तंत्रज्ञांमध्ये एक जागतिक वादच सुरु होता. या तंत्रज्ञानाची गुणवत्ता नाकारणारे असले, तरीही क्लाऊड तंत्रज्ञानचे भविष्य उज्ज्वल होते, हे मात्र निश्चित.... त्याचबरोबर स्टोअरेज आणि संगणकांच्या दरात झालेल्या घसरणीमुळे तर एक प्रकारची ग्राहक क्रांतीच झाली होती, ज्यामुळे एंटरप्राईजेसमधील माहिती प्रसारणाचा मार्गच बदलला होता. या सगळ्याचा अर्थ समजण्याचे व्यवहारचातुर्य विनोथिनी यांच्याकडे निश्चितच होते आणि भविष्यात यासाठी तज्ज्ञांची गरज लागणार असल्याचेही त्यांनी ओळखले आणि २०११ मध्ये ब्लुमेरीकची (Bluemeric) स्थापना केली.

सीआयओ काय करते? एखादी व्यक्ती उपाय मिळविण्यासाठी म्हणून ब्लुमेरीक या डेवलपमेंट-ऑपरेशन्स (डेवओप्स) इंजिनियरींग कंपनीच्या नवीन माहिती तंत्रज्ञान रचनेशी संपर्क साधते. नियोजित ग्राहकांपेक्षा जास्त ग्राहक ट्रॅफीक आल्यास, या भाराखाली क्लाऊड कोसळणार नाही, याची काळजी या स्टार्टअपतर्फे घेतली जाते. यादृष्टीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून योग्य प्रकारच्या उपाययोजना एकाच वेळी केल्या जातात.

“ व्यवसाय आणि त्याबाबतच्या कल्पनांवर मी नेहमीच चर्चा करत असे, त्यातूनच मी स्वतःदेखील उद्योजक होण्याचा निर्णय घेतला आणि अगदी एका रात्रीतच सर्व काही सोडून कंपनी सुरु करण्याचे ठरविले,” विनोथिनी सांगतात. तमिळनाडूमधील एरोडे या लहानशा व्यापारी शहरांतून त्यांनी आपले शालेय शिक्षण आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. बंगळुरुमधील मराथल्ली परिसरात पोळ्यांची ऑनलाईन विक्री सुरु करण्याच्या निर्णयापर्यंत त्या पोहचल्याच होत्या, जेंव्हा सुदैवाने त्यांना त्यांची खरी आवड लक्षात आली.

स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यामागची विनोथिनी यांची भूमिका अगदी साधी होतीः एक गोष्ट त्यांना समजली होती की, सध्याचा काळ हा वेब/मोबाईल कॉमर्सची बाजारपेठ आणि सेवांचा आहे आणि त्याचबरोबर नवीन क्लाऊड तंत्रज्ञान समजू शकणाऱ्या अभियंत्यांचाबरोबर काम करणाऱ्यांचा आहे. त्यांनी सुरुवात केली ती दोन अभियंत्यांबरोबर आणि आज अमेरिकेतील विविध इंटरनेट कंपन्यांसाठी क्लाऊड तंत्रज्ञानावर काम करणारी त्यांची २५ जणांची टीम आहे.

image


बाजारपेठेचा आकार आणि संधी

आयटी इंजिनियरींग कंपन्या या व्यवसायातून पैसे कमावू शकतात.

 जगभरात सघ्या दीड लाखांच्या वर ई-कॉमर्स वेबसाईटस् आहेत. दर वेळी जेंव्हा ई-कॉमर्स कंपनीकडून विक्री केली जाते, तेंव्हा ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावरील ट्रॅफीक हाताळण्यासाठी त्यांचे सर्व्हर्स सक्षम असणे गरजेचे आहे, खास करुन जेंव्हा विविध प्रकारच्या उपकरणांद्वारे ग्राहक या वेबसाईटपर्यंत पोहचत असतात. मात्र हा भार हाताळण्यास सर्व्हर्स असक्षम ठरले, तर संपूर्ण खरेदी प्रक्रियाच धोक्यात येऊ शकते आणि त्या ऍपवरील किंवा त्या वेबसाईटवरील ग्राहकांचा विश्वासही कायमचा उडू शकतो.

 गार्टनरच्या मते, इंटरनेट बंद असतानाचा प्रत्येक मिनिट हा इंटरनेट कंपनीसाठी मोठ्या प्रमाणात नुकसानकारक ठरतो. प्रती तास सरासरी अंदाजे १,४०,००० डॉलर्सचा तोटा होत असतो आणि त्याचबरोबर यामुळे ग्राहकही तुमच्यापासून दुरावण्याची भीती असते आणि शेवटी उत्पन्नावर याचा विपरीत परिणाम होतो. 

 डेवऑप्स टुलसेटच्या बाजारपेठेचा आकार २०१५ मध्ये २.३ बिलियन डॉलर्सवर जाऊन पोहचला असून, गार्टनरच्या अहवालानुसार २०१४ च्या १.९ बिलियन डॉलरशी तुलना करता ही वाढ २१.१ टक्क्यांची होती.

बिझनेस मॉडेल

ब्लुमेरीक सारख्या स्टार्टअप्सचे बिझनेस मॉडेल हे प्रत्येक प्रकल्प आणि वेळ यावर आधारीत असते. एक मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न मिळविण्यासठी ब्लुमेरीकने जगभरातील मोठ्या कंपन्या आणि लघु आणि मध्यम व्यवसायांबरोबर दीर्घ मुदतीचे करार करणे गरजेचे आहे. आतापर्यंत तरी त्यांची स्वतःचीच गुंतवणूक असून, नफा मिळविण्यातही त्यांना यश मिळालेले आहे. विनोथिनी यांनी या व्यवसायात वीस हजार डॉलर्सपेक्षा कमी गुंतवणूक केली होती आणि आता या व्यवसायात कोअर तंत्रज्ञान व्यवसाय म्हणून चांगली वाढ झालेली आहे. आयडीयाडीव्हाईस (IdeaDevice) या त्यांच्या स्पर्धकाने त्यांच्या गुंतवणूकदारांकडून २०१३ मध्ये चार मिलियन डॉलर्स उभारले. त्याशिवाय 8केपीसी (8KPC) आणि रिलेव्हन्सलॅब्स (RelevanceLabs) यांसारख्या कंपन्यादेखील या बाजारपेठेतील महत्वाचे खेळाडू आहेत.

“ आयटीच्या जगात उलथापालथ गरजेची असते आणि पाश्चिमात्य बाजारपेठांमध्ये क्लाऊडचा स्विकार वेगाने वाढत आहे. क्लाऊडही काहीसा विस्कळीत आहे आणि डेवऑप्स हा हाय व्हॉल्युम लॉ मार्जिन व्यवसाय आहे,” ग्रेहाऊंड रिसर्चचे सीईओ संचित वीर गोगिया सांगतात.

गार्टनरच्या पहाणीनुसार २०१५ मध्ये १.९ बिलियन मोबाईल फोन पाठविले गेले. याच वर्षी जगभरात एकूण २.४ बिलियन उपकरणांची विक्री झाली. उपकरणांचा प्रसार पहाता, ग्राहकांची संख्या तर वाढणारच आहे, पण त्याचबरोबर क्लाऊडचा प्रसारही वाढणार आहे. त्यामुळे डेवऑप्स स्टार्टअप्सचे भविष्य उज्ज्वल आहे. ब्लुमेरीक कुबेरनेटस् (Kubernetes) आणि डॉकर्स (Dockers) वर आपले प्लॅटफॉर्म उभारत आहेत, हे दोन्ही ऑपन सोअर्स प्लॅटफॉर्म आहेत. लवकरात लवकर अधिकाधिक आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळविण्यात येणाऱ्या यशावरच या स्टार्टअपचे यश अवलंबून आहे.

आणखी काही यशस्वी उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.

आता वाचा संबंधित कहाण्या :

मॉर्निंग फ्रेशः हँगओव्हर घालवून ताज्यातवान्या दिवसाच्या सुरुवातीसाठीचा रामबाण इलाज.... 

दहावी नापास ते यशस्वी उद्योजक, 'मिट्टीकूल'च्या मनसुखभाई यांच्या यशोगाथेवर सीबीएसई बोर्डात धडा

नवीन उद्योजकांसाठी मराठीतून व्हिडीओ ब्लॉग, पुण्याच्या अविनाश जोशी यांचा अभिनव प्रयोग

लेखक – विशाल क्रिष्णा

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन 

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags