Marathi

गुंतवणूक स्वत:ची तरीही फायदेशीर, कोटामधल्या स्टार्टअपच ध्येय आहे वर्षाची तब्बल २८ कोटींची उलाढाल

Team YS Marathi
22nd Apr 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

वाढती विद्यार्थी संख्या आणि मोबाइल फोनचा वाढता वापर यामुळे गेल्या काही वर्षात ऑनलाइन परीक्षा तयारी ही बाजारपेठ चांगलीच फोफावत आहे. मात्र साधारण २००७-०८ मध्ये मोबाइल फोनने शैक्षणिक साहित्य पुरवणं, ही संकल्पना तितकीशी रूढ झालेली नव्हती.

२००७ साली, नितीन विजय या ३२ वर्षीय आयआयटीतल्या युवकाने काळाच्यापुढे विचार करीत, मोशन एज्युकेशनची सुरुवात केली. ज्यामध्ये ऑलींपियाड्सवर सहावी ते बारावी या वर्गांसाठी विविध प्रशिक्षण दिलं जातं त्याचबरोबर एनटीएसइ, जेइइ-मेन, जे इ इ -एड्वान्सड आणि पूर्व वैद्यकीय परीक्षा आदींसाठी सुद्धा विविध प्रशिक्षण उपलब्ध आहे. ७०० विद्यार्थी आणि ४ कर्मचाऱ्यांसह सुरु केलेल्या कोटा शहरातल्या या संस्थेमध्ये आता २२० कर्मचारी आणि ६,४६५ विद्यार्थी आहेत.

मोशन एज्युकेशन टीम

मोशन एज्युकेशन टीम


पायाभरणी

डिसेंबर २००७ साली नितीन यांनी सुमारे एक लाखाच्या भांडवलावर मोशन आयआयटी-जेईइ सुरु केलं. त्यावेळी त्यांनी सहा महिन्यांपूर्वीच त्यांचा बी टेक चा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. वाराणसी मध्ये जन्मलेल्या नितीन यांनी आपला व्यवसाय सुरु केला तो राजस्थानमधल्या कोटा इथे. प्रशिक्षण वर्गांसाठी या शहरातली मागणी लक्षात घेता त्यांनी याठिकाणी आपला व्यवसाय सुरु करण्याच ठरवलं. त्यापूर्वी ते वाराणसी मधल्या कोटा पॉइंट या ठिकाणी ते आयआयटी आणि पूर्व वैद्यकीय चाचणी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्याना शिकवत असत. त्यानंतर मात्र आपल मोशन एज्युकेशनच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी ते कोटा पॉइंट येथून बाहेर पडले.

शिकण्याचा अनुभव अधिक प्रभावी बनवणे

२०१२ साली, मोशन एज्युकेशननं मोशन सोल्युशन लॅबची सुरुवात केली. ज्यामध्ये व्याख्यान प्रश्न आणि मसुदे यांची नोंद केली जायची. ज्यामुळे इ-लर्निंग ची मदत घेऊन विद्यार्थ्यांना डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम म्हणजेच बहि:शाल शिक्षण कार्यक्रमाचा (ज्यामध्ये दृकश्राव्य व्याख्यान, शंका निरसन, अभ्यास सामुग्री सर्व कोर्सेससाठी)लाभ घेता येत होता. तर गेल्याच वर्षी त्यांनी मोशन एज्युटॅब प्रोग्रामचं प्रक्षेपण केलं. जिथे वर्गात टॅब वापरले जातात आणि विद्यार्थ्यांचं काम पाहिलं जात आणि या कामाच्या आधारावर व गरजेनुसार वर्गातल्या व्याख्यानांची दिशा ठरवली जाते. नितीन म्हणतात की, 'शाळेमध्ये विद्यार्थ्याला जसं रोजचं वेळापत्रक पाळावं लागतं, क्लास, गृह्पाठ, परीक्षा, सांस्कृतिक उपक्रम आदींचा हा ठरलेला वेळ असतो, त्याचप्रमाणे मोशन एज्युकेशनचं स्वरूप आहे'.

नितीन विजय, संस्थापक मोशन एज्युकेशन

नितीन विजय, संस्थापक मोशन एज्युकेशन


आज भारतातल्या, आसाम, उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान,ओडीसा आणि गुजरात या राज्यांत मोशन एज्युकेशन ची १८ केंद्रे आहेत. मोशन सोल्युशन लेब आणि मोशन एज्यु टॅबसारख्या उत्पादनांमुळे आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवणं सोप जातं आणि ही माहिती आम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा देतो. त्याचबरोबर शिक्षकांना सुद्धा याचा संकलित अहवाल पाठवला जातो ज्यामुळे वर्गातल्या विद्यार्थ्यांना कोणत्या विषयांमध्ये अडचणी आहेत किंवा वर्ग कोणत्या विषयात मागे आहे हे समजण्यास मदत होते," नितीन म्हणतात.

या निधी उभारणीमुळे अन्य एज्युटेक स्टार्टअप्सचा एकीकडे गवगवा होत असतानाच, मोशन एज्युटेकनं मात्र एक आदर्शवत उदाहरण घालून दिलं ते म्हणजे स्वत:च्या गुंतवणुकीवर व्यवसायाचा डोलारा सांभाळून! ज्याला बूटस्ट्रॅप म्हंटल जात आणि विशेष म्हणजे हा व्यवसाय वर्षानुवर्ष नफा कमवित आहे. ६०० विविध संस्थांशी भागीदारी ज्यामध्ये शाळा, महाविद्यालय, प्रशिक्षण संस्था आणि वैयक्तिक रित्या शिकवणारे शिक्षक यांचा समावेश आहे. या माध्यमातून या संस्थेची २०१४ -२०१५ या आर्थिक वर्षात तब्बल १६ करोड इतकी उलाढाल झाली आहे.

निधी न उभारताही मोशन एज्युकेशन या संस्थेची वृद्धी अगदी सुरुवातीपासून होत आली आहे. दरवर्षी प्रशिक्षण वर्गात १७% तर ई-लर्निंग विभागात १४०% नी वृद्धी होत आहे. या स्टार्ट-अपचा महसूल येतो तो प्रशिक्षण वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या शुल्कामधून आणि ई-लर्निंग सामुग्री लोकांना, शाळांना किंवा अन्य संस्थाना विकल्यानंतर. पुढील तीन वर्षात मोशन एज्युकेशनचं लक्ष्य आहे ते म्हणजे तीन लाख विद्यार्थी आणि ७०० शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचण्याचं. तर चालू आर्थिक वर्षात, तब्बल २८ कोटी रुपयांचं ध्येय आम्ही गाठू, असा विश्वास कंपनीला आहे.

करियर लॉन्चर, टाईमसारख्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था सुद्धा आता त्यांच्या परीक्षा तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीचा सहारा घेत आहेत. त्याचबरोबर कोर्सएरा, उदेमी, उदासिटी, खान अकादमी सारख्या संस्थांनी सुद्धा पारंपारिक शिक्षण पध्दतीमध्ये बदल केले आहेत. टॉपर, एम्बाइब, ऑनलाइन तैयारी,एण्ट्रेसप्राइम, क्रेकू आणि क्रंचप्रेप जीआरइ ही काही स्टार्टअप्सची नावे आहेत, जी भारतातल्या परीक्षा सराव बाजारपेठेच्या पारंपारिक आणि विस्कळीत पद्धतीला नव्यानं आकार देत आहेत.

उद्यम आणि स्पर्धा

ऑनलाइन सराव उद्यामाच्या सद्य बाजारपेठेची किंमत तब्बल ८ अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि गेल्या काही वर्षात या उद्योगात गुंतवणुकदारांची प्रचंड वाढ झाली आहे . बेंगळूरूच्या वेदांतु या संस्थेनं एक्सेल पार्टनर्स आणि टायगर ग्लोबल मेनेजमेंट या संस्थांकडून ५ दशलक्ष डॉलर्स इतका निधी उभारला. तर टॉपरने मे २०१५ मध्ये ६५ करोड इतका निधी जमवला. ऑनलाइन तैय्यारीनं वेंचर कॅपिटल गुंतवणुकदारांच्या दोन कंपन्यांकडून ५ करोडचा निधी उभारला, तर बेंगळूरू मधल्या बैजू या संस्थेनं सेक्वाया कॅपिटल आणि सोफिना या कंपन्यांद्वारे तबब्ल ७५ दशलक्ष डॉलर्स इतका निधी उभारीत भारतातील एज्युकेशन स्टार्टअप क्षेत्रात पहिला क्रमांक पटकावला आहे.

कोटा इथं आयआयटी-जेईई मधील व्यवसायाभिमुख प्रकल्प, शाळातील अभियांत्रिकी परीक्षांसाठी प्रशिक्षण वर्ग या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे मोशन आयआयटी-जेईई ही संस्था ! यामागची संकल्पना होती ती म्हणजे अत्यंत कमी खर्चात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण शैक्षणिक सुधारणेला वाव देणे ," नितीन यांनी आपले मनोगत मांडले.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

‘विज्ञानवाहिनी’ निवृत्त लोकांनी मुलांच्या विकासासाठी सुरु केलेली एक मोहीम 

शिक्षणक्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्मितिन यांचे 'स्मार्टस्टेप्स'

विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेणारे शिक्षकच चांगले विद्यार्थी घडवू शकतात : 'आयटीच'

लेखिका : अपराजिता चौधरी

अनुवाद : प्रेरणा भराडे

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags