संपादने
Marathi

महाविद्यालयीन तरुणांचा आवाज 'फ्युचा'

Team YS Marathi
22nd Dec 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

महाविद्यालयीन आयुष्य म्हणजे सळसळता उत्साह..तरुणाईच्या मनात वेगवेगळ्या कल्पना, प्रेरणा सतत घोळत असतात. हेच विचार समविचारी लोकांसोबत वाटून घेण्याची, त्यांच्यासोबत चर्चा करण्याची खरंतर खूप गरज असते. पण दुर्दैवानं आपल्याकडच्या पारंपरिक माध्यमांमध्ये आणि अन्य व्यासपीठांवर तरुणाईला खूप कमी प्रतिनिधीत्व मिळतं. जिथे त्यांना आपलंस वाटेल असं व्यासपीठही दुर्दैवानं आपल्याकडे नाहीत.


image


दिल्ली विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तरुण भारद्वाज आणि सनी तलवार यांनाही विद्यार्थी असताना ही दरी जाणवली होती. त्यांनी ही दरी मिटवण्याचं ठरवलं आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ निर्माण केलं. याद्वारे विद्यार्थी गोष्टींमधून व्यक्त होऊ शकतात तसंच इतर महाविद्यालयांमध्ये काय चाललं आहे याचीही माहिती मिळवून अद्ययावत राहू शकतात.

२०१३ मध्ये त्यांनी फ्युचाची स्थापना केली. फ्युचा याचा दिल्ली विद्यापीठाच्या भाषेतला अर्थ नवीन विद्यार्थी अर्थात् फ्रेशर असा होतो. हे स्टॉप ऍप विद्यार्थ्यांसाठी मुखपत्र बनावं या हेतूनंच सुरु करण्यात आलं. त्याशिवाय यामधून देशभरातल्या महाविद्यालयातल्या स्पर्धा, परिषदा, चर्चासत्र, वादविवाद आणि महोत्सव यांच्याबाबतची माहिती मिळते. तसंच याद्वारे विद्यार्थ्यांना एकमेकांशी संवाद साधता येतो आणि विविध क्षेत्रांतल्या संधींबाबतची माहितीही मिळते.

सुरुवातीला आमचा हेतू केवळ दिल्ली विद्यापीठाबद्दलच्या घडामोडींची माहिती देणं इतकाच मर्यादित होता. पण आम्हाला केवळ एक वर्षाच्या आत देशभरातल्या विद्यार्थ्यांकडून विविध प्रश्न आणि विनंत्या यायला लागल्या. सध्या आमचे देशभरातल्या २०० महाविद्यालयांमध्ये एक लाखापेक्षाही जास्त सदस्य आहेत. आमचा दरवर्षाचा व्यवहार वाढतोच आहे आणि दर महिन्याला आम्हाला भेट देणाऱ्यांची संख्या आता दोन लाखापेक्षाही जास्त आहे, असं २८ वर्षांचे तरूण यांनी सांगितलं.

त्यांना भेट देणाऱ्यांमध्ये ८० टक्के १५ ते ३० वर्ष वयोगटांतले आहेत. दोन वर्षांमध्ये फ्युचाकडे इंटर्नशीपसाठी जवळपास ३००० पेक्षाही जास्त अर्ज आलेत आणि या माध्यमातून ५०० पेक्षाही जास्त लेखकांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे.

या साईटला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतकी आहे की कॉर्पोरेट्स स्वत:हून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे व्यवसाय वाढवण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज उरली नाही. यातून व्यवसाय निर्मिती हे आव्हान वाटत नाही.

ऑनलाईन पार्टनरशिपद्वारे देशभरातले महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षक यांना जोडण्यासाठी फ्युचा विविध ब्रँड्सनाही ऑफर्स देते. यातून तरुणाईशी जोडलेले राहिल्यानं त्यांची मानसिकता, आवडीनिवडी समजून घेण्यात ब्रँड्सचाही फायदा होतो. याचा फायदा या कंपन्यांना नवीन मुलं नोकरीसाठी घेताना होतो.

फ्युचा हा अनेक महाविद्यालयीन महोत्सवांचा ऑनलाईन माध्यम भागीदारही आहे. तसंच आयआयएम लखनऊ, आयआयएम बंगळुरु, आयआयएम त्रिची आणि बिट्स पिलानी यांच्यासह २०० संस्थांच्या इव्हेंट्समध्येही महत्त्वाचा भाग असतो.

स्थानिक जाहिराती आणि प्रत्येक प्रसंगानुरुप केलेला प्रचार (महाविद्यालयीन आणि महोत्सवांसह) हे आमच्या निधीचे मुख्य स्रोत आहेत. आतापर्यंत आम्ही ड्युरेक्स, व्हायबर, स्टडी ओव्हरसीज, रिलायगर आणि स्ट्रेप्सिल्स यांच्यासारख्या १२ ब्रँड्ससाठी आम्ही कँपेन्स केली आहेत. प्रत्येक कँपेनसाठी जवळपास ५,००० ते २५,००० रुपये इतका खर्च येतो, असं तरुण सांगतात. पण फ्युचाचा प्रवास हा काही कायमच इतका सोपा राहिलेला नाही. 

सुरुवातीला टीम तयार करण्यासाठी आणि लोकांनी विश्वास ठेवावा यासाठी त्यांचं मन वळवण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागला. जोपर्यंत तुमच्यावर आणि तुमच्या संकल्पनेवर विश्वास बसत नाही, तोपर्यंत तुमच्यासोबत किंवा तुमच्या स्टार्टअपसोबत दीर्घकाळापर्यंत काम करायला कोणीही तयार होत नाही. त्यामुळे हेच मोठं आव्हान असतं, असं तरुण सांगतात. आता त्यांची सहा सदस्यांची टीम आहे.

त्यांच्या उत्पादनाबद्दल बोलायचं झालं तर अनेक डिजीटल माध्यम कंपनींना उच्च दर्जाची माहिती आणि त्या माहितीच्या माध्यमातून विश्वास आणि निष्ठा निर्माण करणं हेच आव्हान वाटतं, असंही तरुण सांगतात. आम्ही माध्यम व्यासपीठ आहोत. आमच्या व्यासपीठावर सर्वोत्तम माहिती, मजकूर, ज्ञान आणि सृजनात्मक लिखाण कसं होईल हेच आमच्यासाठी कायम सर्वात मोठं आव्हान राहिलं आहं, असंही ते सांगतात.

इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियानुसार देशात ३५० दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत. २०१७ पर्यंत हा आकडा ५०० दशलक्षपर्यंत पोहोचणार आहे. यातील ७० टक्के वापरकर्ते हे १५ ते ३५ या वयोगटातील असतील, असं तरुण सांगतात. त्यांना साधी सपक बातमी नको आहे. त्यांना त्यांचा आवाज उठवता येईल, ऐकला जाईल , त्यांच्या जगाशी संबंधित असं वाचता येईल, माहिती मिळेल असं व्यासपीठ हवं आहे, असंही तरुण यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. २०१६ च्या अखेरपर्यंत दर महिन्याला तीन दशलक्ष वापरकर्ते बनवणं हे आता त्यांचं ध्येय आहे.

गेल्या काही वर्षांत तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून अनेक व्यासपीठं निर्माण होतायेत आणि ते बाजारही काबीज करतात. यूथ की आवाज, स्कूपव्हिदार यांचं १०१ इंडिया.कॉम ही काही व्यासपीठं तरुणांना केंद्रस्थानी ठेवून मजकूर देतात.

या विभागात अनेक स्पर्धक असणं हे खरोखरच भीतीदायक आहे, हे तरुण मान्य करतात.पण तरीही प्रत्येकाचा प्रेक्षक वेगळा आहे, असंही ते सांगतात.

प्रत्येक महाविद्यालयासाठी व्यासपीठ तयार करणं हे फ्युचाचं ध्येय आहे. स्वत:चा मजकूर तयार करण्यासाठी २०१६ पर्यंत मोबाईल ऐप आणि व्हिडिओ चॅनेल तयार करण्याच्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

बीई इंटलिजन्सनं केलेल्या अभ्यासानुसार, डिजीटल जाहिरातींवरील खर्च २०१८ पर्यंत २१ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. हीच प्रगती आमच्यासाठीही निधीचा स्रोत ठरेल, असं तरुण सांगतात.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या आम्हाला मिळणाऱ्या प्रतिसादात ७० टक्के वाढ झाली आहे. फ्युचा डिजीटल इंडिया मोहिमेतही महत्त्वाचा वाटा उचलेल आणि तरुणाईवर प्रभाव पाडणारा एक महत्त्वाचा हिस्सा होईल, असा विश्वास तरुण व्यक्त करतात.

Website

लेखक- तौसिफ आलम

अनुवाद- सचिन जोशी

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags