संपादने
Marathi

आशेवर दुनिया कायम आहे, अपंगत्वावर मात करणा-या लजरिना बजाज!

Team YS Marathi
27th Mar 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

असे म्हणतात की, आयुष्य हे आशेवर कायम आहे. जीवनात अनेक समस्या असल्या तरी, आशा कधीच सोडू नये. जसे की, रात्र कितीही भयानक असली तरी, त्याचा अखेर एका सुंदर सकाळसोबत नक्कीच होतो. आयुष्यदेखील प्रफुल्लीत होऊन तेव्हा जगता येते, जेव्हा ज्या व्यक्तिकडे प्रत्येक क्षणाला जगण्यासाठी मजबूत मनौधैर्य आणि जिद्द असेल, जो त्या कुठल्याही परिस्थितीत चांगल्या भविष्याचा विचार करतो. कधीही आशा न सोडणा-या अशा व्यक्ती वेळेला देखील स्वतःच्या ताब्यात करतात. परिस्थितीशी झगडून स्वतःसाठी रस्ता आणि ओळख निर्माण करतात, जे संपूर्ण समाजासाठी एक उदाहरण बनतात. लोक त्यापासून प्रेरणा घेऊन, आयुष्यात पुढे वाढतात आणि आपले भविष्य घडवितात. असेच काहीतरी केले आहे, दिल्लीजवळील नोएडा सेक्टर ३९मध्ये राहणा-या लजरीना बजाज यांनी. त्यांनी सिद्ध केले की, व्यक्तीसाठी काहीही करणे अशक्य नसते. उच्च विचार आणि सकारात्मकतेमुळे सर्वकाही प्राप्त केले जाऊ शकते, ज्याला लोक अशक्य मानून आपले गुडघे टेकतात.

व्यवसायाने एचआर असलेल्या बजाज यांनी जीवघेण्या आजारापासून झगडून एक यशस्वी सायकलिस्टचा प्रवास केला. लजरीना बजाज त्या लोकांसाठी एक आदर्श आहेत, जे अपंग असल्यामुळे आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. १५मार्च २०१६मंगळवारी त्यांनी आपल्या ३५व्या वाढदिवशी ‘युवर स्टोरी’शी संवाद साधला.

image


आयुष्याचा तो अंधकारमय काळ...

आयुष्यात दु:ख, त्रास आणि समस्या नेहमीच सांगून येत नसतात. लजरीना बजाज यांच्यासोबत देखील नऊ वर्षापूर्वीच हेच झाले होते. त्या रात्री फक्त काही वेळा पूर्वीपर्यंत सर्वकाही सामान्य होते. घरातील लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर झोपण्याच्या तयारीत होते. लजरीना देखील आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यातच अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांचे शरीर हळू हळू शिथिल पडायला लागले, मन बैचेन होत होते. घरातल्या लोकांसाठी काहीही समजणे त्यावेळी कठीण होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करून सांगितले की, हा पँरालिसिस अटँक आहे. डॉक्टरांचे हे शब्द थरकाप वाढविणारे होते. स्वतः लजरीना यांच्यासाठी आणि त्यांच्या घरातल्या लोकांसाठी देखील. सर्वांच्या डोक्यात केवळ एकच प्रश्नच होता, की त्या पुन्हा कधी सामान्य होऊ शकतील की नाही. एका सामान्य व्यक्तीप्रमाणे पुन्हा चालू फिरू शकणार की नाही. जर हो असेल तर किती वेळ लागेल. लजरीना यांचा महिन्यांपर्यंत उपचार सुरु होता. औषधासोबत त्या व्यायामदेखील करायच्या, जो डॉक्टरांनी सांगितला होता. हळू हळू त्यांची प्रकृती सुधारत होती. पँरालिसिस जवळपास चांगला झाला होता. त्या यामुळे खूप खुश होत्या की, त्या देखील एक सामान्य व्यक्तीप्रमाणे स्वतः आपली स्कुटी आणि कार चालवून आपले सर्व काम करतील. मॉलमध्ये जातील, शॉपिंग करतील आणि सिनेमा देखील पाहतील.

कदाचितच कुणाला माहित होते की, एक नवी समस्या हळू हळू त्यांचा पाठलाग करत होती. पँरालिसिस अटॅकच्या दोन वर्षानंतर २००९मध्ये त्यांना स्तनाचा कर्करोग झाला. थोडीफार प्रकृती सुधारल्यानंर लजरीना पुन्हा एकदा चिंतेच्या घे-यात अडकल्या होत्या. असे वाटले की, सर्वकाही संपले. आयुष्य पुन्हा एकदा अशा उंबरठ्यावर उभे होते, जेथे अनिश्चितता होती. त्यावेळी परिस्थिती खूपच खराब होती. आशेवर आयुष्य होते. मात्र लजरीना यांनी आपले मनौधैर्य कायम ठेवले. त्या पुन्हा एकदा त्याच जिद्दीने समस्ये विरुद्ध लढण्यासाठी प्रयत्न करत होत्या. दोन वर्षापर्यंत चाललेल्या उपचारानंतर या आजारावर मात केली. मात्र, समस्या त्यांचा पाठलाग सोडत नव्हती. एकानंतर दुसरी आणि दुसरी नंतर तिसरी. सलग चार वर्ष घरी राहणे, व्यायाम न करणे आणि पँरालिसिस आणि स्तनाच्या कर्करोगादरम्यान चालणा-या औषधांच्या परिणामामुळे त्यांचे वजन खूप वाढले होते. त्यांचे वजन ९६ किलो झाले होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप उपचार झाले. मात्र, आयुर्वेद, होमियोपॅथी, नॅचरो थेरपी आणि घरगुती उपचार तसेच महागडे औषधे देखील झाली, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. 

image


लठ्ठपणाची समस्या आणि सायकलची साथ

उच्च विचार आणि मनौधैर्य मजबूत असलेल्या लजरीना यांना माहित पडले होते की, वाढलेले वजन कमी करण्यासाठी त्यांना स्वतःच काहीतरी करावे लागेल. डॉक्टरांशी सल्ला घेऊन कसरत करणे त्यांनी खूप पहिले सुरु केले होते. मात्र, यावेळी त्यांनी घाम गाळून कँलरी बर्न करण्याचा विचार केला आणि एक सायकल विकत घेतली. त्यांनी रोज सकाळी आणि संध्याकाळी सायकल चालविणे सुरु केले. हळू हळू वेळ जात होता आणि त्यांचे वजन देखील कमी होऊन सामान्य झाले. मात्र, या दरम्यान लजरीना यांनी सायकीलिंगचा वेळ आणि नेहमी गाठले जाणारे अंतर देखील वाढले होते. मजबुरीत चालविण्यात आलेली सायकल आता त्यांची आवड बनली होती. त्याच्यामागे एक कारण हे देखील होते की, वजनाला कायम ठेवण्यासाठी त्यांना या सर्वात स्वस्त साधना व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय दिसत नव्हता. आता त्या आपली सायकल घेऊन नोएडाच्या सीमेला पार करत दिल्लीच्या इंडिया गेट पर्यंत पोहोचल्या होत्या. कधी नोएडा ते ग्रेटर नोएडा, नोएडा ते दिल्ली तर कधी नोएडा ते गाजियाबाद यांच्या रस्त्यांवर जलदगतीने सायकल चालविण्याची आता त्यांना सवय झाली झाली.

नेहरू स्टेडियमचा रस्ता, आयुष्याचे वळण

वर्ष २०१४मधील दिल्लीच्या उन्हाळ्यातील एक संध्याकाळ होती. जलदगतीने धावणा-या गाड्या रस्त्यांवर खूप वेगाने धावत होत्या. लजरीना रोज प्रमाणेच आपल्या कार्यालयातून परतून आपल्या घरातील जबाबदारीला पूर्ण केल्यानंतर सायकल घेऊन निघाल्या होत्या. त्या दिवशी त्यांनी इंडिया गेट ते दिल्ली पर्यंतच रस्ता पार केला होता. नेहरू स्टेडियमजवळ पोहोचल्यावर त्यांनी काही सायकलस्वारांना स्टेडियम मधून बाहेर पडताना तर, काहींना आत दाखल होताना पाहिले. तेंव्हापासून त्यांनी देखील सायकल चालविण्याला आपले लक्ष्य बनविले. आत गेल्यानंतर त्यांना माहित पडले की, दिल्ली क्रीडा प्राधिकरण कडून सायकलची एक शर्यत आयोजित करण्यात येत आहे. व्यावसायिक सायकलीस्ट शर्यतीत भाग घेण्यासाठी पत्रक भरत होते. लजरीना यांना काही समजत नव्हते, की काय केले पाहिजे? अशात त्यांना देखील भाग घेतला पाहिजे का? मात्र, पहिले तर कधी त्यांनी असे काही केलेले नाही. माहित नाही कशा करतील. पतिला पहिले विचारावे लागेल, जसे याच प्रश्नाने त्यांचे पायसारखे थरथरत होते. तेव्हा एका परक्या व्यक्तीने त्यांना आवाज दिला की, तुम्हाला पत्रक मिळाले का? लजरीना यांनी नाही म्हणून मान हलविली. त्यानंतर त्या व्यक्तीने त्यांना पत्रक आणून दिले आणि तेच पत्रक त्यांनी जमा केले. 

image


यशाची नवी सुरुवात

जून २०१४मध्ये दिल्लीत आयोजित राज्यस्तरीय ४०किमीच्या फ्लोटोन राइडर्स शर्यतीत सर्व स्पर्धकांना मागे टाकत लजरीना बजाज या विजेता बनल्या. हा त्यांच्या आयुष्याचा सर्वात शानदार अनुभव होता. या विजयाने भविष्यात त्यांचा सायकीलिस्ट बनण्याचा रस्ता आणि लक्ष्य दोन्ही दाखवून दिले होते. त्या एकानंतर एक शर्यत जिंकत गेल्या. त्यांनतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. मागील दोन वर्षात जवळपास एक डझन सामन्यात भाग घेऊन गतीची शर्यत देखील त्यांनी जिंकली. डिसेंबर २०१५मध्ये गुडगाव – दिल्ली ग्रैंड फांडो टाईम ट्रायलच्या ४४किमी शर्यतीत त्यांनी पहिले स्थान मिळविले. वर्ष २०१६च्या सुरुवातीस अनेक राष्ट्रीय पातळीवरील सामन्यात बजाज यांनी दुसरे स्थान प्राप्त केले. आतापर्यंत त्यांनी ६ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकासोबतच १०पेक्षा अधिक मेडल आपल्या नावावर केले आहेत. त्यांच्या विजयाची यादी अजून खूप मोठी आहे.

भविष्याची योजना

लजरीना बजाज आपल्या विजयाच्या या गतीने अद्यापही संतुष्ट नाहीत. त्यांचे स्वप्न आहे की, त्यांना सायकीलिंग मध्ये त्यांना सर्वात पहिले स्थान गाठायचे आहे. आशिया, आॅलंपिक सहित अन्य जागतिक सामन्यात देशासाठी पदक जिंकायचे आहे. त्यांना वाटते की, लोकांनी त्यांना एचआर प्रोफेशनल नव्हे तर, एक सायकीलिस्ट म्हणून ओळखावे. संपूर्ण देशात त्यांचे नाव व्हावे. त्यांची इच्छा होती की, लोकांमध्ये सायकीलिंग बाबत प्रसार व्हावा. विशेषकरून त्या महिलांसाठी ज्या लठ्ठपणामुळे ग्रासलेल्या आहेत. त्यानी नियमित स्वरुपात सायकल चालविली पाहिजे. त्यामुळे केवळ लठ्ठपणाच दूर होणार नाही तर, मधुमेह, रक्तदाब आणि आर्थराइटीस सारखे अनेक रोग दूर होतील. त्यांचे मत आहे की, मुलीना व्यावसायिक सायकीलिंग कडे देखील लक्ष दिले पाहिजे. त्यांनी क्रीडा या क्षेत्रात मोठ्या संख्येने भाग घेतला पाहिजे. त्याच्या एका बाजूला ते केवळ शारीरिकच तंदुरुस्त राहणार नाहीत, तर त्यामुळे त्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे वाढण्याच्या देखील संधी मिळतील.

image


मुलाला देखील देत आहेत, प्रशिक्षण

लजरीना स्वतः त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाला देखील व्यावसायिक पद्धतीने सायकीलिंगचे प्रशिक्षण देत आहेत. त्या आपल्या मुलांना देखील एक यशस्वी सायकीलिस्ट म्हणून बघू इच्छित आहेत.

देवा कडे कुठल्याही प्रकारची तक्रार नाही

जीवनात अनेक चढ- उतार पाहिल्यानंतर प्रत्येकजण ढासळतो आणि त्याला त्यानंतर अनेक तक्रारी असतात. मात्र, एक सायकीलिस्ट झाल्यानंतर लजरीना स्वतःशी संतुष्ट आहेत. त्यांना देवाकडून देखील कुठलीही तक्रार नाही. त्या मानतात की, देव जे काही करतो ते योग्यच असते. समस्या आणि त्रास हे आपल्याला त्रासात टाकण्यासाठी नव्हे तर, सक्षम आणि मजबूत बनविण्यासाठी असतात. आपण परिस्थितीशी झगडून जगणे शिकतो. देव आपल्या क्षमता ओळखतो. योग्य वेळ आल्यावर आपल्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचवतोच. केवळ व्यक्तीला विश्वास ठेवला पाहिजे. कधी निराश होऊ नये. नेहमी सकारात्मक विचारांसोबत जुन्या दिवसाला विसरून पुढे चालत राहिले पाहिजे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

अशक्याला शक्य करून दाखवणा-या, देशाच्या पहिल्या ‘ब्लेड रनर’ किरण कनोजिया!

फेरीवाला ते कोट्यवधींचा मालक, डोळस व्यक्तींना प्रेरणा देणाऱ्या एका अंधाचा साहसी प्रवास

कृत्रिम पायाने एव्हरेस्ट सर करणा-या अरूणिमा यांच्या इच्छाशक्तीला सलाम

लेखक : हुसैन तबिश

अनुवाद : किशोर आपटे

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags