संपादने
Marathi

रेनोमेनियाः गृह सजावटीच्या कल्पनांच्या देवाणघेवाणीचे आगळेवेगळे व्यासपीठ

16th Feb 2016
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

नववीत मल्होत्रा (५०) आणि रितु मल्होत्रा (४९) हे पतीपत्नी गेली २६ वर्षे गृह सजावटीच्या व्यवसायात कार्यरत आहेत. गृह सजावटीच्या आपल्या कल्पना सुस्पष्टपणे मांडण्यासाठी मासिके किंवा इंटरनेटवरील छायाचित्रे बरोबर घेऊन येणारे अनेक ग्राहक त्यांना आजपर्यंत भेटले आहेत. सातत्याने येणाऱ्या या अनुभवातून या पतीपत्नींना प्रकर्षाने जाणवू लागले की, आजही आपल्या देशातील घरमालकांना सर्वोत्तम इंटीरीअर डीजाईन्स मिळविण्यात अडचणी येत आहेत. त्यातूनच गृह आणि अंतर्गत सजावटीसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण ऑनलाईन व्यासपीठ सुरु करण्याच्या कल्पनेचा जन्म झाला आणि सप्टेंबर, २०१५ मध्ये ‘रेनोमेनिया’ (Renomania) ला सुरुवात झाली.

दिल्ली स्थित रेनोमेनियावर सुंदर घरांच्या छायाचित्रांचा कॅटलॉग, अद्ययावर डिजाईन ट्रेंडस् वरील लेख आणि होम डिजाईनशी संबंधित विविध पैलूंबाबत सल्ला उपलब्ध आहे. या संकेतस्थळाची विभागणी चार विभागांत झालेली असून त्यामध्ये छायाचित्रे, स्क्रॅपबुक, प्रो फाईंडर आणि ब्लॉग्ज यांचा समावेश आहे.

image


प्रो फाईंडर या विभागात आर्कीटेक्टस्, इंटीरीयर डिजायनर्स, लॅंडस्केप डिजायनर्स, कंत्राटदार, विकासक, हाेम प्रोडक्ट ब्रॅंडस् आणि बांधकाम व्यावसायिक यांची यादी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. रेनोमेनियावर असलेली सर्व छायाचित्रे ही त्यांच्याच छायाचित्रकारांच्या टीमने घेतलेली असून, हे छायाचित्रकार भारतभर प्रवास करतात आणि भारतातील आघाडीच्या आर्कीटेक्टस् नी डिजाईन केलेली सुंदर घरे आपल्या कॅमेरात कैद करतात. या स्टार्टअपने आतापर्यंत ७०,००० एचडी छायाचित्रांचा कॅटलॉग तयार केला असून, या कामासाठी त्यांच्याकडे आठ छायाचित्रकार आहेत आणि इंटेरीयर डीजाईनच्या क्षेत्रात काम करणारे ६०० व्यावसायिक आहेत.

नवनीत सांगतात, “ आपले प्रोफाईल तयार करुन, त्याद्वारे आपले काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याची संधी रेनोमेनिया व्यावसायिकांना देऊ करते. त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन उपस्थितीवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यास आणि प्रामाणिक फॉलोओर्सचा मोठा समुदाय उभा करण्यासही त्यांना सक्षम बनविते. आम्ही अशा एका मोठ्या समुदायाची उभारणी करत आहोत, जेथे घरमालक अनेक गोष्टींबाबत मोकळेपणाने चर्चा करु शकतात, जसे की स्वयंपाकघरात कोणत्या प्रकारचा ग्रॅनाईट वापरला जावा, बेडरुमच्या भिंतींसाठी योग्य रंग कोणता किंवा बाथरुमसाठी कोणत्या प्रकारच्या टाईल्स वापरणे योग्य ठरेल, इत्यादी अनेक”.

त्याशिवाय योग्य टॅग्जसह व्यावसायिक नियमितपणे त्यांचे नवीन प्रकल्पही अपलोड करु शकतात, तसेच त्यांचे फॉलोअर्स कोण आहेत ते पाहू शकतात, प्रकल्पाचा आढावा घेऊ शकतात, त्यांचे रेटींग्ज आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तपासून पाहू शकतात. त्याचबरोबर ते त्यांचे काम किंवा प्रकल्प फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्कींग साईटस् च्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहचवू शकतात.

रेनोमेनिया हा रीतु आणि नवनीत यांनी हाती घेतलेला दुसरा उपक्रम आहे. १९८९ मध्ये त्यांनी दिल्ली स्थित आर्कीटेक्चर आणि डीजाईन फर्म ‘एए डिजाईन कन्सल्टंटस् प्रायवेट लिमिटेड’ची स्थापना केली होती. रीतु यांनी स्कुल ऑफ प्लॅनिंग ऍन्ड आर्कीटेक्चरमधून पदवी घेतली आहे. तर नवनीत यांनी स्कुल ऑफ प्लॅनिंग ऍन्ड आर्कीटेक्चर, दिल्ली येथून आर्कीटेक्चरची बॅचलर पदवी मिळवली आहे आणि इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मधून कन्स्ट्रक्शन इंजिनियरींग ऍन्ड मॅनेजमेंट मध्ये एम.टेक. पदवीही मिळविली आहे. या दोघांसह रेनोमेनियाचे तिसरे सहसंस्थापक आहेत तेहतीस वर्षीय राहूल लोढा.... राहूल हे एए डिजाईन कन्सल्टंटस् च्या ग्राहकांपैकीच एक होते. रेनोमेनियामध्ये ते तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत. राहूल यांनी २००४ मध्ये आयआयटी खरगपूर येथून बी.टेक पूर्ण केले आहे आणि त्यांना अकरा वर्षांहून जास्त काळ कामाचा अनुभव आहे. रेनोमेनियेची स्थापना करण्यापूर्वी ते ९९एकर्स (99Acres) मध्ये व्हीपी ऑफ इंजिनियरींग या पदावर काम करत होते. त्याशिवाय त्यांनी यापूर्वी सॅमसंग आणि याहूसाठीही काम केलेले आहे.

जेंव्ही रीतु आणि नवनीत यांनी आपल्या या कल्पनेबाबत होमशॉप१८ (HomeShop18) चे माजी सीईओ संदीप मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली, तेंव्हा त्यांना त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि लवकरच संदीप यांनी रेनोमेनियामध्ये एक सल्लागार आणि गुंतवणूकदार म्हणून येण्याचा निर्णयही घेतला. ज्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमधील जोखीम बऱ्याच प्रमाणात कमी झाली.

रीतु सांगतात, “ होमशॉप१८ ची यशस्वीपणे सुरुवात करण्याचा आणि ती चांगल्याप्रकारे चालविण्याचा अनुभव संदीप यांना आहे. त्या अनुभवाचाच उपयोग करुन ते व्यावसायिक सल्ला देऊ करतात.”

पाच महिन्यांपेक्षा कमी काळातच रेनोमेनियाला दरमहा ३,००,००० व्हिजिटर्स मिळाले आहेत आणि महिन्यागणिक हा आकडा पन्नास टक्क्यांनी वाढत आहे. एप्रिल २०१६ पर्यंत अर्धा मिलियन युनिक व्हिजिटर्सपर्यंत पोहचण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. संकेतस्थळावरील ट्रॅफीकच्या ३५ टक्के व्हिजिटर्स हे येथे पुन्हा एकदा आलेले असतात, यावर नवनीत विशेष जोर देतात.

रेनोमेनियाने अजून यातून कमाई सुरु केलेली नाही. मात्र एप्रिल २०१६ च्या अखेरपर्यंत त्यांच्याकडे कमाईचे अनेक पर्याय असतील, जसे की जाहिराती, उत्पादन कंपन्यांकडून (पेंटस्, लाईटींग, टाईल्स, इत्यादी) किंवा या व्यासपीठाचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांकडून लिस्टींग शुल्क आणि रेनोमेनियाच्या सहाय्याने केल्या गेलेल्या एखाद्या त्रयस्त व्यवहारासाठी अल्प शुल्क.

सध्या रेनोमेनियाकडे ३६ जणांची टीम असून त्यामध्ये छायाचित्रकारांचाही समावेश आहे. एप्रिल २०१६ पर्यंत आपल्या कॅटलॉगमधील छायाचित्रांची संख्या एक लाखांपेक्षा जास्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर व्यावसायिकांचा बेसही एक हजारपर्यंत नेण्याची आणि वापरकर्त्यांना गृह सजावटीच्या कल्पनांवर चर्चा करण्यासाठी उपयुक्त असे ऍप सुरु करण्याचीही त्यांची योजना आहे.

युवर स्टोरीचे मत

गेल्या काही वर्षांत ऑनलाईन गृह सजावट बाजारपेठ तेजीत आली आहे. या क्षेत्रात सुरु झालेल्या स्टार्टअप्समुळे वापरकर्त्यांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही उत्पादकांकडून येणाऱ्या उत्पादनांच्या अनेक पर्यांयांमधून निवड करणे शक्य झाले आहे आणि ही बाजारपेठ तेजीत येण्यामागचे हे प्रमुख कारण आहे. टेक्नाव्हीयोने व्यक्त केलेल्या एका अंदाजानुसार भारतातील ऑनलाईन गृह सजावट बाजारपेठेत २०१९ पर्यंत ५०.४२ टक्के सीएजीआर महसूली वाढ अपेक्षित आहे. या क्षेत्रातील आणखी काही मोठ्या खेळाडूंमध्ये लिव्हस्पेस, होमलेन, अर्बनलॅडर, फॅबफर्निश, पेपरफ्राय, फर्लेन्को आणि नेस्टोपिया यांचा समावेश आहे.

लिव्हस्पेसने सिरिज ए फंडींगच्या माध्यमातून ४.६ मिलियन डॉलर्स उभे केले आहेत (हेलिओन वेंचर पार्टनर्स आणि बेसिमर वेंचर पार्टनर्स हे प्रमुख गुंतवणूकदार आहेत), होमलेनने सेक्वाया कॅपिटल (Sequoia Capital) आणि आरिन कॅपिटलकडून सिरिज ए फंडींगच्या माध्यमातून ४.५ मिलियन डॉलर्स उभारले, फॅबफर्निशने प्रामुख्याने रॉकेट इंटरनेट आणि किनेविककडून निधीची उभारणी केली आहे. तर पेपरफ्रायने थर्ड राऊंड फंडींगमधून १५ मिलियन डॉलर्स उभे केले आहेत. फर्लेन्कोने लाईटबॉक्स वेंचर्सकडून सहा मिलियन डॉलर्स उभे केले आहेत.

रेनोमेनिया हे गृहसजावटीसाठी भारतातील पहिले आणि एकमेव कंटेट व्यासपीठ असल्याचा त्यांचा दावा असला, तरी त्यांच्या वाढीबद्दल आताच काही बोलणे खूपच घाईचे ठरेल, कारण ऑनलाईन गृह सजावटीच्या क्षेत्रात इतर अनेक कंपन्या आहेत, ज्यांनी यापूर्वीच आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे काहीतरी वेगळेपण आणण्यासाठी स्टार्टअप्सना सध्या बाजारपेठेत ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या पर्यांयापेक्षाही वेगळ्या पर्यायांचा आणखी शोध घ्यावा लागणार आहे.

“ भारतीय घरांच्या छायाचित्रांच्या माध्यमातून डिजाईनसाठी कल्पना देऊ करणे, हे रेनोमेनियाच्या केंद्रस्थानी आहे आणि हेच इतर गृह सजावट उद्योगातील खेळाडूंपेक्षा त्यांचे वेगळेपण आहे. या व्यासपीठावर केवळ व्यवहारालाच प्राधान्य नाही. आमचे बिझनेस मॉडेल हे इतरांपेक्षा अगदी वेगळे आहे कारण इतरांचे प्राथमिक उद्दीष्ट हे फर्निचरची विक्री हेच असते,” राहूल सांगतात.

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

ऑनलाईन बाजारपेठेतील सर्व काही मिळण्याचं ठिकाण ‘शॉपलिस्ट’

घरातच तयार केले ग्लोबल उत्पादन ʻ हॅप्पीफॉक्सʼ

घरगुती उपकरणांना स्वयंचलनाच्या पलीकडे नेण्यामागे पंचविशील्या तरुणांकडे कोणती प्रेरणा असेल बरं ?

लेखक – अपराजिता चौधरी

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags