संपादने
Marathi

दहावी उत्तीर्ण मेकॅनिकच्या स्वप्नाला ‘स्टार्टअप इंडिया’ने दिली हवा, निर्माण झाली, सर्वात कमी खर्चावर चालणारी ई-बाईक !

Team YS Marathi
29th Feb 2016
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

यश मिळविण्याची शक्यता त्या व्यक्तीकडे सर्वात जास्त असते, जे आपल्या स्वप्नांना नेहमी जिवंत ठेवतात. असे म्हणतात की, स्वप्नांचे मरणे हे सर्वात भयानक असते. ज्यांना आपल्या स्वप्नांची कदर असते ते त्याबाबतीत खूप जिद्दी असतात आणि त्यांची ही जिद्द महत्वाकांक्षेमध्ये परावर्तीत होते. जेंव्हा तुमची स्वप्ने महत्वाकांक्षेमध्ये परावर्तित होतात, तेंव्हा त्यांचे लक्ष्य प्राप्त करण्याची शक्यता वाढते. स्वतःची एक आरेखन केलेली बाईक बनविण्याचे, भीम सिंह यांचे एकच स्वप्न होते. मेकँनिक भीम सिंह यांनी सामान्य बाईकपेक्षा पाच पटीने कमी किमतीवर चालणारी बाईक बनविली. 

image


कुठून आणि कशी मिळाली प्रेरणा?

भीम सिंह यांचे वडील रेल्वेत डिझेल मेकॅॅनिक होते, त्यामुळे यंत्रांसाठी असलेली आवड त्यांना पूर्वजांकडून मिळाली होती. सन १९८८मध्ये १०वी केल्यानंतर भीम सिंह यांनी मध्यप्रदेशच्या झाबुआच्या सरकारी आयटीआय संस्थेमधून शिक्षण घेतले. त्यांनी शिक्षणानंतर अनेक ठिकाणी नोकरी केली आणि सोडली. १९९०मध्ये त्यांनी इंदूरच्या पिथमपूरमध्ये बजाज कंपनीत नोकरी करणे सुरु केले. त्या दरम्यान त्यांचे वडील सरनाम सिंह राजपूत यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना घरी परतावे लागले. मात्र कंपनीने त्यांना सुट्टी दिली नाही. भीम सिंह यांनी ‘युवर स्टोरी’ला सांगितले की,“जेव्हा व्यवस्थापकांनी सुट्टी देण्यास मनाई केली, त्याचवेळी मी निश्चय केला की, आता नोकरी करायची नाही. नोकरी सोडताना मी मनोमनी निश्चित केले होते की, आता मी कुठेही कुणाची गुलामगिरी करणार नाही. स्वतःचा व्यवसाय करेन. नोकरी सोडताना माझ्या मित्रांनी त्याचा विरोध केला, मात्र मी निश्चित केले होते की, एक दिवशी स्वतः मोटर सायकल बनवेन. माझ्या या बोलण्यावर त्यावेळी लोक हसायचे. परंतु मी, आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवले आणि परिस्थिती चांगली झाल्यावर स्वप्नांना मी खरे करून दाखविले. ”

२५ वर्षापूर्वी जेव्हा भीम सिंह यांनी नोकरी सोडली, त्यानंतर त्यांनी बाईक आणि कार दुरुस्ती करण्याची एक लहानशी कार्यशाळा उघडली. परंतु या संपूर्ण वेळेत त्यांचे स्वप्न एका क्षणासाठी देखील त्यांच्या नजरेपासून दूर गेले नाही. जेंव्हा अचानक त्यांच्या स्वप्नाला स्टार्टअप इंडियाची हवा लागली. स्टार्टअप इंडियाने प्रेरित होऊन भीम सिंह यांनी अशी एक विजेवरील बाईक बनविली आहे, ज्याची चर्चा संपूर्ण प्रदेशात होत आहे. जर या बाईकचे व्यवसायिक उत्पादन यशस्वी झाले तर, प्रदूषण आणि उर्जा संकटाची चिंता केल्याशिवाय, खूपच स्वस्त किमतीवर बाईक रस्त्यांवर वेगाने धावण्यासाठी तयार होईल. मध्यप्रदेशच्या रतलाम शहराच्या गायत्री मंदिररोडवर गायत्री इंजिनियरिंग वर्क्स नावाची बाईक आणि कार दुरुस्ती करण्याची कार्यशाळा चालविणा-या ४७ वर्षीय कामगार भीम सिंह राजपूत आपल्या स्वप्नांची बाईक बनविण्यात मागील सहा महिन्यांपासून दिवस रात्री मेहनत घेत आहेत. त्यांचे मत आहे की, पुढील तीन महिन्यात ते या बाईकला पूर्ण प्रकारे तयार करून त्याला रस्त्यावर उतरवतील. असे असूनही त्यापूर्वी त्यांनी अनेकदा बाईकची चाचणी केली आहे, मात्र अनेकदा काहीतरी नवे करण्यासाठी अंतिम रूप देण्यात सध्या थोडी वाट पहात आहेत. 

image


बाईकची वैशिष्ट्ये.

ही बाईक पूर्णपणे वायू आणि ध्वनी प्रदूषण मुक्त विजेवरील बाईक आहे. बाईकला पूर्णपणे भीम सिंह यांनी स्वतः गरजेनुसार आपल्या कार्यशाळेत डिझाईन केले आहे. त्यात पल्सरचे एलोय व्हील लावण्यात आले आहेत. बाईकमध्ये १२-१२वोल्टचे एकूण ४८किलो वजनाच्या चार बँटरी लावण्यात आली आहे. बाईकला चालविण्यासाठी त्यात ज्या मोटर लावण्यात आल्या आहेत, त्याचा आरपीएम ३०००आहे. बाईकचे एकूण वजन १५०किलो आहे आणि त्याची कमाल गती १२०किमी/तास आहे. बाईकची बॅटरी एकदा पूर्ण भारीत झाल्यावर ती न थांबता जवळपास ३००किमीचे अंतर सहज पार करता येते. बँटरी विजेवर चालते. बँटरी चार्ज होण्यासाठी जवळपास ४८रुपयांचा खर्च येईल, ज्यात तुम्ही ३००किमीचे अंतर पार करू शकता. या बाईकला रस्त्यावर उतरविण्यासाठी जवळपास १.२०लाख रुपये खर्च येईल. याप्रकारे बाईक चालविण्याचा खर्च प्रति किमी जवळपास १६पैसे येईल, तर सध्या बाजारात उपलब्ध विजेच्या बाईकला चालविण्यासाठी सध्या प्रती किमी ८५पैसे खर्च येतो. त्यामुळे भीम सिंह यांची बाईक खूप स्वस्त सिद्ध होते. 

image


भविष्याची योजना

भीम सिंह या बाईकच्या यशस्वी चाचणीनंतर त्याचे पेटेंट घेतील, त्यासाठी आतापासूनच त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी सांगितले की, त्यासाठी ते बाईक पुण्याला पाठविण्याची तयारी करत आहेत. भीम सिंह यांचे मत आहे की, “या बाईकचे व्यावसायिक उत्पादन खूप स्वस्त होऊ शकते. जर हे यशस्वी झाले तर, महागड्या पेट्रोल आणि डीझेलवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे प्रदुषणाची समस्या देखील राहणार नाही.”

भीम सिंह सांगतात की, ते एका प्रकल्पावर काम करत आहेत. त्या प्रकल्पामार्फत ते सौरऊर्जेने बाईक चालविण्याचा प्रयत्न करत आहेत. विजेवर चालणा-या बाईकच्या यशानंतर ते या कामात पूर्णपणे सामील होतील. 

image


गाड्यांच्या नुतनीकरणाचे देखील करतात काम

भीम सिंह यांच्या कार्यशाळेत प्रत्येक प्रकारच्या कार आणि बाईकची दुरुस्ती केली जाते. गाड्यांमध्ये कुठलीही खराबी असेल तर ते काही मिनिटात दुरुस्त करतात. त्या व्यतिरिक्त भीम सिंह संपूर्ण रतलाम जिल्ह्यात गाड्यांना स्टायलिश रूप देण्यासाठी देखील ओळखले जातात. सामान्य बाईकचे रूप बदलून त्याला स्पोर्टी बाईक बनविण्यात देखील त्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. याआधी भीम सिंह जीपला देखील वेगळे रूप देत होते. भोपाळ सहित प्रदेशाच्या अन्य डोंगराळ भागात चालणा-या वेलीज जीप बनविणे देखील त्यांना येत होते. सामान्य जीपला ते वेलीज जीपमध्ये बदलत होते. असे असूनही आता ही जीप मध्यप्रदेशात चालणे देखील कमी झाले आहे. त्यामुळे त्यांनी आपले काम बदलले आहे, मात्र ग्राहक भेटल्यानंतर ते आता देखील जीप नुतनीकरण करत आहेत.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कहाण्या :

बारावी उत्तीर्ण व्यक्तीने केवळ दहा हजारात निर्मित केला एक टन एसी, विजेचा वापर १०पटीने केला कमी!

असा एक स्टार्टअप जो 'कारपूलिंग' मार्फत रस्त्यावर गाड्यांची संख्या कमी करण्यासाठी तत्पर आहे.

विदर्भातील एक शेतकरी, ज्याने लाखो शेतक-यांना दिलासा देऊन फोर्ब्स नियतकालिकात मिळवली जागा!

लेखक : हुसेन तबिश

अनुवाद : किशोर आपटे

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags