संपादने
Marathi

क्राऊडसोर्सिंगच्या दुनियेत एका क्लिकवर भेटणारा ‘स्मार्ट’ टास्कमित्र

Narendra Bandabe
10th Oct 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

आजचं जगणं ऑनलाईन झालंय. प्रत्येक गोष्ट एका क्लिक किंवा कॉलवर उपलब्ध होतेय. काहीही हवं तर क्लिक करा आणि आपल्याला हवं ते मागवा किंवा मग एक कॉल करा आणि तुमचं काम झालंच समजा. सर्व काही अगदी पटकन. चुटकीसरशी. मग एका क्लिकने घरातलं सर्व फर्नीचर खरेदी करा किंवा मग एक कॉल करुन रेस्टॉरंटमधून आवडता मेनू ऑर्डर करा. ही ऑनलाईन लाईफची मज्जा आहे. पण एखादं खास काम करण्यासाठी कुणा एका व्यक्तीची गरज भासते तेव्हा मात्र हे ऑनलाईन क्लिक उपयोगी पडत नाहीत. मग अनेकांना फोन करा. त्यांना विचारा, त्याचे अभिप्राय घ्या. त्या व्यक्तीला शोधा आणि मग त्याला काम द्या. अशी ही प्रक्रिया वेळ खाणारी ठरते. घरातलं साधं रिपेरिंग असो, वेबपेज तयार करणं असो किंवा मग त्यातला कंटेन्ट तयार करणं असो मुंबईसारख्या शहरात सुविधा पुरवणारे अनेक आहेत पण नेमका कोण कसं काम करतो हे सांगणारं मिळत नाही. हीच समस्या टास्कमित्र डॉटकॉम या वेबसाईटनं सोडवलेय. आता आपल्याला काय हवं ते टास्कमित्रला सांगा आणि निश्चिंत व्हा.

टीम टास्कमित्र

टीम टास्कमित्र


न्यू इयर पार्टीत झालेल्या दमछाकीतून टास्कमित्रची कल्पना पूढे आली. या पार्टीत लागणा-या प्रत्येक गोष्टीसाठी गौतम गोखले आणि उश्मा खबरीया यांना या मित्रांना इकडे तिकडे पळावं लागलं होतं. त्या त्या सेवा पुरवणारा प्रत्येकजण शोधताना इतकी दमछाक झाली की हे सर्वांची माहिती एकाच ठिकाणी मिळाली तर बरं झालं असतं असं वाटून गेलं. यातून टास्कमित्र ही वेबसाईट सुरु झाली.

कसं काम करते टास्कमित्र

जो गरजेला कामी येतो तो खरा मित्र असं म्हणतात. म्हणूनच टास्कमित्र सुरु करताना ही गरज लक्षात घेऊन त्याची आखणी करण्यात आली. ज्याचं काम आहे मग ते कसलंही असो त्याला अगदी साध्या रिपेरिंगपासून ते इवेन्टमध्ये लागणा-या वेगवेगळ्या सेवापर्यंत सर्व काही त्यांनी टास्कमित्र डॉटकॉमवर येऊन आपलं काय काम आहे याची माहिती द्यावी, त्यासाठी त्यांचं बजेट किती आहे हे ही सांगावं. या सर्व प्रक्रियेला ब्रॉडकास्टींग टास्क असं नाव देण्यात आलंय. एकदा का ही माहिती आली की हे टास्क पूर्ण करणारे जे त्या सेवा देणारे आहेत ते या कामासाठी बोली लावतात. मग जो कुणी कमीत कमी बोली लावणारा असेल त्याला काम मिळतं. म्हणजे वेगवेगळी सेवा पुरवणारे इथं काम मिळवण्याच्या स्पर्धेत उतरतात. या स्पर्धेतून काम करुन घेणा-याला कमी किमतीत सेवा मिळते. कुणाची सेवा घ्यायची याचा अधिकार टास्क ब्रॉडकास्टींग करणा-याला असतो. एकदा का हे काम एखाद्या सेवा पुरवणा-या दिलं की त्यावर काम सुरु झालंय असं वेबसाईटवर दर्शित करण्यात येतं. यामुळं कामासाठी येणारे अनावश्यक कॉल्स टाळता येतात. कामाच्या स्वरुपानुसार त्याचे ऑनलाईन पेमेन्ट करण्याची मुभा देण्यात आलीय. पण ते थेट सेवा पुरवणा-याला न जाता आधी टास्कमित्र डॉट कॉमकडे जातं आणि कामावर पूर्ण झाल्याचा आणि त्यावर समाधानी असल्याचा शेरा ब्रॉकास्टरनं मारल्यावरच ते पेमेन्ट टास्क पूर्ण करणा-याला देण्यात येतं.

उश्मा खबरीयाच्या मते ही वेबसाईट सेवा हवी असणारे आणि सेवा पुरवणा-या लोकांसाठी फायद्याची आहेच. पण सामाजिक पातळीवर ती जास्त महत्वाची आहे. यातून दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांना भेटतात आणि त्यातून नवीन संबंध तयार होतो. याचा विचार करता टास्कमित्र डॉट कॉम लोकांना एकत्र आणतो. यातून एक सामाजिक संबंध जोडला जातो. हे महत्वाचं आहे

image


मार्च 2015 ला ही वेबसाईट सुरु झाली. तेव्हापासून सुमारे बावीस हजार लोकांनी या वेबसाईटवर नोंदणी केलीय. गेल्या सहा महिन्यात 1 कोटी 20 लाख रुपयांची कामं टास्कमित्रच्या माध्यमातून करण्यात आलीयत. एव्हढ्या कमी कालावधीत 4500 पेक्षा टास्क पूर्ण करण्यात आले हे विशेष. यापैकी 40 टक्के ब्रॉडकास्टर पुन्हा आलेले आहेत आणि त्यात दर आठवड्याला 20 टक्के इतकी वाढ होतेय हे टास्कमित्रचं मोठं यश असल्याचं गौतम गोखले सांगतो.

टास्कमित्र डॉट कॉमवर जवळपास सर्वच कामांसाठीची नोंदणी होऊ शकते. आपल्या घरातलं कपाट हलवण्याच्या साध्या कामापासून ते पार्टनरशीप डीड आणि इनकम टॅक्स भरण्यापर्यंतची क्लिस्ट टास्क इथं पूर्ण करण्यात येतात.

जस्ट डायल, सुलेखा सारख्या जुन्या लिस्टींग साईटसहीत लोकलओए आणि अर्बन क्लॅप सारख्या नव्यानं या क्षेत्रात उतरलेल्या कंपन्यांनी हे क्राऊडसोर्सचं मार्केट व्यापून टाकलंय. त्यात टास्कबॉब आणि डोअरमिंट सारख्या नव्या साईटची भर पडलेय. दिवसेंदिवस बदलत चाललेल्या टेक्नॉलॉजीमुळं दोन अनोळखी व्यक्तींना एकत्र येऊन काम करण्याची संधी दिलीय. यापेक्षा पुढे जाऊन टास्कमित्र डॉटकॉम वेबसाईट एक विश्वासाचं नातं तयार करण्याचं काम करतेय.

टास्कमित्रची आणखी एक खासीयत आहे. यात नवख्या टास्कमित्रांसहीत अनुभवी लोकांचीही जोड आहे. मुंबईतल्या नेमक्या कुठल्या जागी नक्की कुठली टास्क आहे हे सेवा पुरवणाऱ्या मित्रांना जाणून घेता येतं.

मग आपण ते काम करु शकत असू तर त्यासाठी लगेच बुकींग करुन फावल्यावेळात काम पूर्ण करण्याची मुभा टास्कमित्रवर उपलब्ध असल्यानं ती जास्त प्रचलित होतेय.

सध्या मुंबईपुरती मर्यादीत असलेली टास्कमित्रची व्याप्ती या वर्षाच्या अखेरीस पुणे, बेंगळूरुपर्यंत नेण्याचा गौतम गोखले यांचा मनसुबा आहे. लवकरचं टास्कमित्र आपलं मोबाईलएप सुरु करणार आहे. यातून जास्तीत जास्त टास्क ब्रॉडकास्टर आणि टास्कमित्रांना जोडण्याचं काम करता येईल असा विश्वास गौतम आणि उश्मा यांना वाटतोय.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags