संपादने
Marathi

डिलीवरी करणा-या माणसाच्या खुनानंतर, फ्लिफकार्टने डिलीवरीमनच्या सुरक्षेसाठी तयार केले एसओएस बटन!

Team YS Marathi
21st Jan 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

फ्लिपकार्टने आता एसओएस बटन तयार केले असून त्यातुन फिल्डवर काम करणा-या कर्मचा-यांना तातडीने मदत मागता येईल ज्यावेळी त्यांना वैद्यकीय किंवा सुरक्षा मदत हवी असेल.

भारतीय स्टार्टअप स्टोरीत डिलीवरीमन हे देखील अविभाज्य हिरो आहेत. त्यामुळे डिलीवरी बॉय नानजुंदा स्वामी यांचा खून ज्यांनी स्मार्टफोनची मागणी केली होती त्यांनीच पैसे न देण्याच्या हेतुने केल्यानंतर फ्लिपकार्टने ‘प्रोजेक्ट नानजुंदा’ अंतर्गत आपल्या डिलीवरी करणा-याना ते कामावर असताना सुरक्षा देण्यासाठी पाऊल उचलले आहे.


Screenshots of the feature in action

Screenshots of the feature in action


फ्लिपकार्टने युवर स्टोरीला सांगितले की, “कंपनीने ही अनपेक्षित घटना घडल्यानंतर शक्य तो सर्व प्रकारचा पाठिंबा डिलीवरी बॉय नानजुंदा यांच्या कुटूंबाला देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात आर्थिक मदतीसह इतरही मदतीचा समावेश आहे.” कर्मचारी कामावर असताना कंपनीने त्याच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे, ज्याचे फलित आणिबाणीच्या वेळी प्रोजेक्ट नानजुंदा हे आहे.

या प्रकल्पात तातडीच्या वेळी मदत देण्यासाठी एसओएस बटनचा वापर केला जाणार आहे, (ज्याला नानजुंदा बटनही म्हटले जात आहे.) फिल्ड एक्झिकेटीवच्या मोबाईल ऍपमध्ये ही सुविधा असेल, तातडीच्या मदतीसाठी त्याने ते दाबल्यास अलार्म वाजेल.

फ्लिपकार्ट भारतातील सर्वात मोठे संकेतस्थळ आहे, ज्यात शंभर दशलक्ष ग्राहकांचा डेटा आहे, “फ्लिपकार्ट विश मास्टर ( कंपनीच्या वितरण करणारांना उत्स्फूर्तपणे देण्यात आलेले नाव) हे कंपनीच्या कामाचा कणा आहेत. त्यांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य आहेच. विशमास्टर नानजुंदा स्वामी याच्या मृत्यूनंतर महिन्याभरात आम्ही हा प्रकल्प घाईने राबविण्यावर भर दिला. ज्यातून आमच्या फिल्ड वरील कर्मचा-यांना सुरक्षेची भावना निर्माण हौईल.” फ्लिपकार्टचे सिओओ नितीन सेठ यांनी सांगितले.

तातडीच्या वेळी नानजुंदा बटन दाबल्यानंतर हब इनचार्जला तातडीने एसएमएसने हे समजेल की त्यांचा माणूस संकटात आहे आणि तो जवळच्या दुस-या माणसाला त्याच्या मदतीला रवाना करेल. त्यासाठी मोबाईलचे नेटवर्क केवळ आवश्यक आहे, मात्र मोबाईल डाटा नसेल तरी ते काम करेल. त्यामुळे देशाच्या बहुतांश भागात ते उपयोगी ठरेल. फिल्ड एक्सिकेटीवच्या फोन नंबर्स, स्थान यांच्या माहितीचे संकलन संबधीत तीन जणांच्या जवऴ असेल जे तातडीने त्याला आवश्यक मदत देवू शकतील. फ्लिपकार्टने आणखी सांगितले की ते त्यात आता आणखी सुविधा देत असून त्यानी बटन दाबल्यास तातडीने पोलिसांनाही सूचना मिळू शकेल. आणखी एक सुविधा फिल्पकार्ट आपल्या कर्मचा-यांना देत असून त्यात नियोजित वितरण सांयकाळी पाचच्या आत करता येणार आहे, त्यामुळे डिलीवरी करणा-यांना धोक्याच्या जागी संरक्षण मिळू शकेल.

लेखिका : बिंजल शहा

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags