संपादने
Marathi

सुशिक्षित बेरोजगारांचे आयडॉल... सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी !

Nandini Wankhade Patil
9th Oct 2016
Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share

राज्यातील अनेक प्रशासकीय सनदी अधिकारी त्यांच्या असामान्य कारकिर्दीसाठी गाजले आहेत. सनदी अधिकारी संवेदनशिलतेने आणि प्रामाणिकपणाने काम करतात त्यावेळी त्यांना अनेक अडचणी आणि विचित्र राजकीय सामाजिक स्थितीशी सामना करावा लागतो मात्र आपल्या कर्तव्याला न्याय देताना सामान्य जनतेच्या भल्यासाठी कायद्याच्या चाकोरीत राहून अनेक आधिकारी आश्चर्यकारक कामगिरी करुन दाखवतात. अशाच कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिका-याला आपल्या कामामुळे वारंवार बदलीला सामोरे जावे लागत होते त्याच अधिका-याला जेव्हा केंद्रात ‘‘मोदी’’ नावाचे प्रचंड बहुमताचे सरकार आले तेव्हा मात्र केंद्राने पायघड्या अंथरल्या. "पीएमओ‘ मध्ये सध्या उपसचिव म्हणून काम करणाऱ्या डॉ.श्रीकर परदेशी यांची कहाणी एखाद्या हिंदी चित्रपटातील नायकाला शोभेल अशी आहे.

image


त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते.लहानपणी श्रीकर एक हुशार विद्यार्थी होते. पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेवून पुण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी MBBS पुर्ण केले. MBBS करताना सनदी अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते. पुढे MD हि केले. वयाच्या २८ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली.

यवतमाळ जिल्हा परीषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्य करतांना हजारो बेरोजगारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न त्यांनी पुर्णत्वास नेले. अनेकदा तर एकाच दिवशी परीक्षा व मुलाखत घेऊन लगेच नियुक्तीपत्र देण्याची किमयाही त्यांनी केली. नोकरभरतीच्या पारदर्शी प्रक्रियेचा पायंडा त्यांनी पाडला होता. त्यांच्या कार्यकाळात अवघ्या महाराष्ट्रातील बेरोजगार यवतमाळ जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीला येत होते. दरम्यान त्यांच्या बदलीचा राजकीय डावही रचला गेला. मात्र लोकांनी जनआंदोलन करून तो हाणुन पाडला.

image


नांदेडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करताना शाळांमध्ये विद्यार्थ्यांची खोटी नोंदणी करून अनुदानावर हात मारणाऱ्या शिक्षण संस्थाचालकांना वठणीवर आणण्यासाठी एकाच दिवशी जिल्ह्य़ातील सगळ्या शाळांची पटपडताळणी करण्याची योजना त्यांनी आखली आणि त्यातून एक भयावह सत्य उजेडात आले. पुढे ही योजना राज्यभर राबवण्यात आली आणि शिक्षण संस्थाचालकांचे धाबेच दणाणले. हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आणि संस्थांच्या अनुदानात प्रचंड कपात झाली.

image


पुढे २३ मे २०१२ रोजी त्यांनी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त म्हणून यांनी सूत्रे हाती घेतली. अनेक वर्षे तोट्यात चालणा-या महानगरपालिकेची बससेवा चारच महिन्यात त्यांनी नफ्यात आणली. आपल्या १८ महिन्याच्या कारकिर्दीत राजकीय दबावाला झुगारुन त्यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरु केला. पिंपरी-चिंचवडचे आयुक्त असताना महानगर पालिकेने ९० हजार रुपयांचा बोनस धनादेशाद्वारे पाठविला. पण, त्यांनी तो नम्रपणे नाकारला. बेकायदा बांधकामांच्या विरोधात त्यांनी सुरू केलेल्या कारवाईने तात्कालिन सरकारमधील मोठ्या नेत्यांनी त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांच्या पाठिब्यावर ते काम करत राहिले. कामाच्या धडाक्याने त्यांनी नागरिकांचा आदर मिळविला होता पण तत्कालीन सत्ताधा-यांनी परदेशी यांच्या बदलीसाठी अतोनात प्रयत्न केले. जनतेने याला विरोध केला. शेवटी राजकीय दबावापोटी त्यांची आयुक्तपदावरुन बदली राज्याच्या मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाचे महानिरीक्षकपदी केली गेली.

image


२०१४ साली केंद्रात सत्ताबदल झाला. लक्षणीय काम करणारे डॉ. परदेशी यांना थेट "पीएमओ" मध्ये उपसचिव म्हणून खास बोलावून घेण्यात आले. पदोन्नती मिळून संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मंत्रालयांच्या धोरणात्मक बाबींचे विषय हाताळण्याचे काम जसे की ग्रामविकास, अल्पसंख्याक, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बालकल्याण आदी मंत्रालयांचा यात समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची टॉप टेन ब्रेन्स टीम देशाला नवे रूप देण्यासाठी अहोरात्र झटत आहे, या कुशल टीममध्ये डॉ. श्रीकर परदेशी यांचा समावेश आहे हि आपल्यासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. 

Add to
Shares
4
Comments
Share This
Add to
Shares
4
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags