संपादने
Marathi

‘mDhil’ आरोग्याचा दूत, SMS ने जमवा सूत!

Chandrakant Yadav
6th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

नंदू माधव ‘गोल्डमॅन सॅच’ बँकेत एक गुंतवणूकदार बँकर म्हणून कार्यरत होते. कामातून त्यांना पैसा वगैरे मिळत असला तरी समाधान आणि आनंद दोन्हीही इथे गैरहजर होते. गोल्ड सॅचसमवेत काम करताना येत असलेल्या अनुभवांचे इतर बरेच फायदे मात्र होतेच. बँकेतील या कार्यकाळादरम्यान त्यांना सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजकांना जाणून घेण्याची संधी मिळाली. उद्यम व्यवसायात आपणही आपले भाग्य आजमावले पाहिजे, स्वत:ला आजमावले पाहिजे, असे याचदरम्यान त्यांना वाटू लागलेले होते. पण थेट ‘स्टार्टअप’साठी प्रेरणा कुठून मिळाली? तर दक्षिण अमेरिकेत असताना दोन वर्षे ते ‘पिस क्रॉप्स’ या संस्थेत स्वयंसेवक म्हणून होते. इथल्या अनुभवांतून.

आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणून सेवा बजावतानाच आपल्याकडे भारतात आरोग्यविषयक जागरूकतेचा किती अभाव आहे, याची प्रकर्षाने जाणिव त्यांना झाली. आरोग्यविषयक माहितीच लोकांना नाही. त्यातही जी माहिती असणे आवश्यक काय, खरं तर अनिवार्य आहे, ती देखील लोकांना नसते. भरीस भर म्हणजे एड्‌स, गर्भावस्था असे विषय तर अगदी निषिद्ध मानले जातात आणि लोक त्यावर बोलणेही टाळतात.

mDhil चे संस्थापक नंदू माधव सांगतात, ‘‘एक स्वयंसेवक म्हणून माझे कार्य समग्र आहे, असे मला मनोमन वाटत असे. पण तसे ते नव्हते. कारण एखाद्या कोट्याधीश माणसासाठी त्याला आणखी पैसे मिळावेत म्हणून तुम्ही जे काही सुचवता आणि त्यानुसार काम करता, तेव्हा त्या गोष्टीला माझ्यामते फारसे महत्त्व नसते. कारण तुम्ही जर त्याचे काम केले नाही, तर दुसरी माकडे त्याचे काम करण्यासाठी तुमच्या जागेवर उडी मारून बसायला टपलेलीच असतात. थोडक्यात जिथे वैभव आहे तिथे काम करायला कुणीही तयार असते. पण जिथे अभाव आहे, तिथे काम करायला कुणी तयार होत नाही. मी अभाव असलेली जागा काम करायला निवडली. आरोग्यविषयक माहितीचा अभाव असलेले लोक निवडले आणि त्यांना आवश्यक ती माहिती आपण उपलब्ध करून द्यायची, असे ठरवले.’’

image


हॉर्वर्ड विद्यापीठातून एमबीए केल्यानंतर नंदू माधव यांनी ‘ऑफिस टायगर’मध्ये काम करायला सुरवात केली. ‘ऑफिस टायगर’च्या अधिग्रहणानंतर नंदू यांना जाणवले, की आता आपण स्वत:च काहीतरी सुरू करायला हवे.

अमेरिकेत एक मोठा कालावधी घालवल्यानंतर २००८ मध्ये नंदू भारतात परतले आणि २००९ मध्ये mDhil ची स्थापना त्यांनी केली. नंदू यांच्या मते, भारतात सामान्यपणे आरोग्य म्हणजे एक वैताग असाच काहीसा दृष्टिकोन बहुतांशी असतो. गरजेच्या गोष्टींमध्ये प्राधान्यक्रमातही आरोग्याचा क्रमांक़ शेवटचा लागतो. आरोग्य या विषयाबाबत एका विशिष्ट वर्गात नव्हे तर सर्वच घटकांमध्ये एक उदासीनता आहे.

नंदू म्हणतात, ‘‘जिथे स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूकतेचा ठिकाणा नाही, तिथे देशभरात ज्या ज्या म्हणून आरोग्यविषयक समस्या आ वासून उभ्या आहेत, त्या समस्यांबद्दल गांभिर्य कुठून येणार? मधुमेह आणि धुम्रपानाच्या अनुषंगाने जडणाऱ्या इतर आजारांसह आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना समाजातील उच्चभ्रू वर्गही करतो आहे, पण या वर्गात देखील आरोग्याबाबत, आरोग्यविषयक उपाययोजनांबद्दल उपेक्षेचीच भावना आहे. आजार प्रत्यक्ष होत नाही आणि बळावत नाही तोवर कुणीही त्याला गंभीरपणे घेत नाही, अशी परिस्थिती इथे आहे. आरोग्याच्या क्षेत्रात सेवा द्यायची, योगदान द्यायचे तर प्रत्येक वयोगटातील लोकांबाबत तुम्हाला जागरूक राहावे लागते.’’

mDhil ने एसएमएस आधारित सेवांना सुरवात केली तसा शहरातील उच्च व मध्यम वर्गातील १७ ते २५ वर्षांतील वयोगट निवडलेला होता. या वयोगटात मोबाइल आणि अन्य तंत्रसामुग्री आवर्जून वापरली जाते. mDhil च्या सेवा मोबाइल नेटवर्कवरही उपलब्ध होत्या. या वयोगटातच लैंगिक आरोग्याचा विषयही एक मोठा मुद्दा असतो. एका विशिष्ट व्यवसायातील महिलांच्या लैंगिक आरोग्याचाही विषय असाच आहे. समाजातील इतर घटकांशीही तो निगडित आहेच. अर्थात हे सगळे निषिद्ध मानले जाणारे विषय आहेत. या विषयांची मोकळेपणाने चर्चा आपल्याकडे घडतच नाही. हे सगळे लक्षात घेऊन mDhil ने सुरवातीच्या काळात तरुणांवर आपले लक्ष केंद्रित केले.

तसे पाहाता ही कंपनी सध्याही एसएमएस आधारित सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देते आहे. गेल्या दोन वर्षांदरम्यान कंपनीने स्वत:चे मोबाईल आणि डेस्कटॉप ॲअॅप्लिकेशन तयार करण्यासह व्हिडिओ सामुग्रीच्या क्षेत्रातही पाय पसरले आहेत. कंपनीशी संपर्क करणारे ६० टक्के लोक मोबाईलच्याच माध्यमाचा वापर करतात. उर्वरित ४० टक्क्यांमध्ये कॉम्प्युटरचा वापर करणारे आहेत. ८५ टक्के ग्राहक भारतीय आहेत, तर उर्वरित १५ टक्क्यांमध्ये पाकिस्तान, सौदी, फिलिपाइन्स, इंडोनेशिया सारख्या देशांतील मिळून आहेत.

एसएमएस सेवांना मुख्यत्वे भाषेसंबंधीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. भाषेच्या आव्हानावर मात करण्यासाठीच कंपनीने आपल्या एसएमएस सेवा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांतून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. व्हिडियो आणि वेब माध्यमाद्वारे अधिक समृद्ध आणि विस्तृत माहिती कंपनी आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू इच्छिते. दृकसामुग्रीच्या वापरानेही भाषेच्या समस्येवर मात करता येईल.

image


नंदू सांगतात, ‘‘माझे लक्ष सध्या पैसा किती मिळतो आहे, त्यापेक्षा ग्राहकांकडून येणाऱ्या प्रतिसादावर आणि अनुभवांवर अधिक लागलेले आहे. मी हळुवारपणे पुढे चाललेलो आहे. कारण भारतात अजूनही ई-कॉमर्सचा हवा तेवढा प्रचार झालेला नाहीय, असे मला वाटते. अरे बाजारात ही सेवाही उपलब्ध आहे का, चला मग आपणही ती वापरून बघू, अशा वृत्तीचे लोक इथे फारसे नाहीत. उलटपक्षी माझ्या मुलीला मासिक पाळी सुरू झालेली आहे, याबाबतीत मला अधिक माहिती हवी आहे, तीही सांकेतिक भाषेत, असे एसएमएस मात्र आम्हाला जरूर येतील. कारण मोकळेपणाने आम्ही बोलतच नाही.’’

एसएमएस सेवा वगैरे आहेच, पण खरंतर कंपनीला जो काही महसूल मिळतो, पैसा मिळतो तो बहुतांशी फार्मास्युटिकल्स कंपन्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातींचा मिळतो. ‘डिजिटल आउटरिच’च्या भागीदारीच्या माध्यमातूनही काही पैसा मिळतो. शिवाय एअरटेलसारख्या कंपनीकडून एसएमएससेवेसाठी शुल्कही आकारला जातो. यूट्युब, फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मिडियाच्या माध्यमातून लोक कंपनीच्या संपर्कात राहातात.

आरोग्य सेवा तसेच चिकित्सकांपर्यंत समाजातल्या ज्या वर्गाची मजल जात नाही, त्या वर्गासाठी एक माहितीचा मजला म्हणून काम करण्याची आगामी पाच वर्षांमध्ये mDhil ची योजना आहे.

तुम्हालाही तुमच्या आरोग्याशी संबंधित काही माहिती तुमच्या फोनवर हवी असेल तर नाडी तपासत बसू नका स्वत:ची, mDhil वर एक नजर टाकून बघा…

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags