संपादने
Marathi

जम्मू-काश्मीरमध्ये मुलांना ‘एक स्कूल किट’ आणि आरोग्यपूर्ण ठेवण्याचे ‘परफेक्ट’ काम करणारे रोहित!

14th Nov 2015
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

रोहितकुमार जम्मू मध्ये भारत-पाकिस्तान यांच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळच्या एका छोट्या कोरोटना कलां गावात राहतात. आपल्या उदरनिर्वाहासाठी ते ‘हॉलिडे हंट’ चालवतात. जो जम्मू-काश्मीरमध्ये हॉलीडे पँकेजच्या शोधात असणा-या लोकांच्या गरजा पूर्ण करणारा उपक्रम आहे.

रोहित यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि ते मानतात की, लोकांनी गरजवंताना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असायला हवे. गेल्या पाच वर्षांपासून ते जम्मू-काश्मिर मध्ये रक्तदान शिबीरांचे यशस्वीपणे आयोजन देखील करत आहेत. ते सांगतात की, त्यांनी उत्तरभारतातील पहिल्या ऑनलाइन ब्लड बँक ‘इंडियाडोनर डॉट इन’ ची देखील स्थापना केली होती, जी आता कुशल लोकांच्या अभावाने बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कोणत्याही स्थितीत विचलित न होण्याचे धैर्य आणि आपले राज्य तसेच राष्ट्रातील लोकांची सेवा समर्पित भावनेने करण्याचा मानस या जमापूंजीवर त्यांनी २०जुलै २०१५ रोजी ‘परफेक्ट फाऊंडेशन’ नावाच्या धर्मादाय संस्थेची स्थापना करत नोंदणी केली आहे.

image


रोहित यांचे म्हणणे आहे की, त्यांचा मनोदय भारतातील एकाच प्रकृतीच्या शाळा, महाविद्यालये,ग्रंथालये,वाचनालये,प्रयोगशाळा,संशोधन केंद्र,यांना समर्पित अन्य संस्थांचा पाठिंबा घेऊन मदत गोळा करता येईल ज्याची सुरुवात ते जम्मू-काश्मीर मधून करु इच्छितात.

परफेक्ट फाऊंडेशन

सध्या त्यांची ही संस्था शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांवर आपले लक्ष केंद्रीत करत आहे. याच राज्यात जन्म झाल्याने आणि वाढल्याने त्यांना इथल्या जनतेसमोरच्या आव्हानांची नेमकी जाण आहे, आणि त्यामुळेच त्यांना तळागाळात काम करण्यात आणि योगदान देण्याआधी शोध घेण्यात आपला जास्त वेळ घालवावा लागला नाही.

image


आरोग्याच्या क्षेत्रात ‘परफेक्ट फाऊंडेशन’ रक्तदान शिबीरांच्या व्यतिरिक्त आरोग्य तपासणी शिबीरांचेही आयोजन करते. शिक्षणाच्या क्षेत्रात ‘परफेक्ट फाऊंडेशन’ राज्यातील गरीब मुलांसाठी ‘डोनेट स्कूल किटस्’ नावाचा कार्यक्रम चालवते.

एक स्कूल किटच का?

रोहित सांगतात की. “स्कूल किट एका मुलाला हस-या चेह-याने शाळेत जाण्यास प्रेरित करते. आम्ही शाळा मध्येच सोडून देणा-या मुलांची संख्या कमी करण्यासाठी खूपच इच्छूक आहोत, आणि आमचा मानस अशा मुलांमध्ये स्मार्टकिट वितरीत करण्याचा आहे. स्कूल किट मुलांना शिक्षणाकडे आकर्षित करण्याचा खूपच छान पर्याय आणि साधन आहे.”

परफेक्ट फाऊंडेशन शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच वेगवेगळ्या शाळांतून गरजू मुलांच्या माहितीचे संकलन करते. त्यांचे स्वयंसेवक या किटस् तयार करतात आणि नंतर त्या शाळांना सुपूर्द केल्या जातात. रोहित सांगतात की, “ जेंव्हा शाळा सुरू होतात तेंव्हा आमच्या स्वयंसेवकांच्या हजेरीत या कीट गरजू मुलांना वितरीत केल्या जातात. अशाप्रकारे वितरणाचे काम पूर्णत: पारदर्शकपणाने केले जाते.” ती मुले ज्यांचे पालक दरवर्षी नवीन स्कूल किट घेऊ शकत नाहीत, त्यांच्याशिवाय जम्मू-काश्मीरच्या पूरग्रस्त भागातील गरीब आणि गरजू मुलांना मदत करण्यासाठी ‘परफेक्ट फाऊंडेशन’ समाजातील जागरुक लोकांना स्कूल किट दान करण्याचे आवाहन करते. अश्या प्रत्येक कीटला १०५०रुपयांचा खर्च येतो. प्रत्येक कीटमध्ये एक स्कूल बँग, वह्या, एक पेंन्सिल किंवा कंपास बॉक्स, एक ड्रॉइंग बूक, आणि प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना रंगपेटी दिली जाते.

जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीबाबत बोलताना रोहित म्हणतात की, “पूरात किमान ४४ लोकांचे प्राण गेले आणि २५पेक्षा जास्त जखमी झाले.१२५६५ घरांचे पूर्णत: नुकसान झाले. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या पुरात खूप मोठ्या संख्येत जनावरे मारली गेली आणि अशावेळी ‘परफेक्ट फाऊंडेशन’ने पुरग्रस्त लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवात त्यांच्या मुलांपासून केली आहे. आमचा विचार केवळ काश्मीरच्याच नव्हेतर भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच एलओसी (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा)वर राहणा-या मुलांपर्यंत या कीट पोहचविण्याचा आहे.”

संघ आणि आव्हाने

रोहित यांच्याशिवाय या कोर टिम मध्ये उपाध्यक्ष अर्चना कौल, विश्वस्त म्हणून ओंकार आणि अंकुश डोगरा प्रमुख सदस्य आहेत. याशिवाय राज पारस समूह संपर्क माध्यमांचे काम सांभाळतात आणि राजू कौल दिल्लीत संचालनाशी संबंधीत कामकाज पाहतात.

‘परफेक्ट फाऊंडेशन’ पूर्णत: मित्र आणि नातेवाईकांकडून मिळणा-या मदतीवर अवलंबून आहे. आतापर्यंत त्यांना कोणत्याही उद्योजक किंवा सरकारी विभागाने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही.

रोहित सांगतात की, आमच्या समोर दोन मुख्य आव्हाने आहेत, त्यातील एक देशाच्या प्रत्येक नागरीकांच्या समोर आहे. यातील पहिले मागील काही वर्षात नेहमी येणारा पूर. दुसरी समस्या सांगताना ते म्हणतात की, “पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर नियमीतपणाने होणा-या गोळीबाराने सारे काही बाधीत होते, आणि शिक्षण मागे पडते. मी या वादात पडू इच्छित नाही पण आमचे एक खूपच संवेदनशील राज्य आहे ज्याने दहशतवादाचा दंश पचविला आहे, आणि त्याचा परिणाम रोजगार, आरोग्य, शिक्षण या मुलभूत सुविधांवर नेहमी होत राहिला आहे.”

image


या पंचवीस वर्षांच्या तरूणासाठी मार्ग इतका सरळ नाही पण तो हरणा-यांपैकी नाही. त्याउलट गरजूंना मदत करण्याचे त्याचे स्वप्न दिवसेंदिवस अधिक पूर्णत्वाकडे जाते आहे. रोहित महान स्वातंत्र्यसैनिक शहीद भगत सिंग यांना आपला आदर्श मानतात आणि त्यांची प्रेरणा घेऊनच आपले आयुष्य समाजातील तळागाळातील लोकांच्या भल्यासाठी समर्पित करु इच्छितात. याशिवाय त्यांचे म्हणणे आहे की, जर नामवंत लोक या राज्याकडे थोडे अधिक लक्ष देतील आणि स्वत: थोडेसे योगदान देतील तर ते कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नसेल. रोहित यांनी आपल्या संस्थेचे नांव ‘परफेक्ट फाऊंडेशन’ ठेवले कारण गरजूंना एक आदर्श शिक्षण पध्दती आणि आरोग्यपूर्ण ठेवण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags

Latest Stories

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा