संपादने
Marathi

अंजू किश यांना भेटा, अशा माता ज्यांना लैंगिक शिक्षणाबद्दल बोलताना संकोच वाटत नाही!

Team YS Marathi
18th May 2017
Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share

अंजू किश यांनी आऊट ऑफ दी बॉक्स या मंचाची सुरूवात केली, असा मंच जेथे लैंगिकतेवर खुलेपणाने चर्चा करून शिक्षण घेता येते. पक्षी किंवा किटकांबद्दल बोलताना सारे काही सोपे असते, मात्र भारतासारख्या देशात हा एक निषिध्द मानला गेलेला विषय असतो. गुप्तांगाबद्दल केवळ उल्लेख करणे म्हणजे देखील लज्जास्पद आणि किळसवाणे मानले जाते. मात्र यातील जमेची बाजू अशी की, ही चर्चा खुलेपणाने करताना जर कुणाला त्यातून शिक्षण मिळाले तर त्यांच्या जीवनात लैगिकता आणि सुरक्षा यामुळे जीवन परिपूर्ण होण्यास मदतच होत असते.

भारतात सामाजिक कारणांमुळे हा विषय सातत्याने टाळला जातो किंवा खिडकीबाहेर भिरकावला जातो. अंजू किश यानी मात्र याच्या उलट विचार केला लैंगिकतेची चर्चा शिक्षण म्हणून केली, आणि ‘आऊट ऑफ दी बॉक्स’ ही मुंबईस्थित संस्था २०११पासुन सुरू झाली. हा खुला मंच आहे जेथे लैगिकतेच्या मुद्यावर पाच ते १८पेक्षा अधिक वयोगटातील कुमार ते युवा नागरिकांना लैगिक शिक्षण दिले जाते.


image


आऊटऑफ दी बॉक्स

“काही दिवसांपूर्वी २००६मध्ये माझा आठ वर्षांचा मुलगा एक दिवस घरी आला आणि त्याने सांगितले की, युएसए चा अर्थ ‘अंडर स्कर्ट एरिया’ असा आहे. ऐकुन मला धक्काच बसला, अर्थातच त्या वयाने मोठा होत असलेल्या मुलाला त्याच्या शाळेच्या बसमध्ये सहाध्यायी मुलांनी विचारले की यूएसए चा पूर्णांश काय? आणि तो कधी तिथे गेला आहे का? मला त्यावेळी जाणवले की मी एक जागरूक पालक आहे मात्र मी अशाप्रकारे वयात येणा-या मुलांच्या चर्चांना ती घराबाहेर असताना तोंड देवू शकत नाही. यातून बाहेर येण्याचा योग्य असा मार्ग म्हणजे त्याला लैंगिकतेबाबत शिक्षण देणे आणि त्याला जी चुकीची माहिती मिळते त्यापासून अगोदरच सावध करणे” अंजू म्हणाल्या.

अंजू यांनी मग पुस्तकांचा शोध घेतला ज्यातून त्यांच्या मुलाशी त्यांना संवाद साधता यावा, ज्यात बालसुलभ वयात त्याला त्याच्या पध्दतीने लैंगिकतची माहिती समजावून देता येईल. मात्र आश्चर्य म्हणजे त्यांना जाणवले की बाजारात अशा प्रकारे कुमारवयीन मुलांच्या माहितीसाठी कोणतेच पुस्तक नाही. लेखिका म्हणून मग अंजू यांनी ठरविले की, लहानग्यांच्या लैगिक शिक्षणासाठी पुस्तक लिहिण्याचे ठरविले.

या लिखाणा दरम्यान, अंजू यांनी त्यांच्या मैत्रीणीना विनंती केली की या मुद्यावर मुलांशी बोला आणि त्यांच्या काय शंका आहेत ते जाणून घ्या म्हणजे त्यांची योग्य प्रकारे उत्तरे देता येतील. “ एका मुलांच्या गटाशी बोलताना जी माहिती मिळाली त्याचा उपयोग करत अन्य गटाशी चर्चा केली, या प्रक्रियेचा मी आनंद घेतला, आणि या सा-या चर्चानी मला माझ्या जीवनातील मागच्या काळात जायला मिळाले ज्यावेळी सॉफ्ट स्किल ट्रेनर होते. आणि पाच वर्षांनंतरच्या त्या काळात मी माझी लैंगिकता शिक्षण कंपनी सुरू केली. त्या साठी मला डॉ राजन भोसले यांचे या ठिकाणी आभार मानावेच लागतील—त्यांच्याकडेच मी ब-याच लैंगिकतेच्या शिक्षणाबाबत माहिती मिळवली, आणि याबाबत ते फारच उत्तम शिक्षक आहेत,” अंजू म्हणाल्या.


image


लैंगिकतेबाबत शिकवताना

अंजू यांना जाणवले की, यातील आशय जास्त आकर्षक आणि रंजक केला तर तो मुलांपर्यंत पोहोचण्यास मदत होते, कारण तीन ते पाच तास त्यांना यावर बसून ऐकणे सोपे नसते, ते आव्हानात्मक असते.

“ १३-१४ वयोगटातील मुलांच्या पालकांना वाटते की, त्यांची मुले अजून खूपच लहान आहेत, त्यामुळे त्यांच्याशी जननक्षमता यावर बोलणे योग्य नाही. आणि जनन क्षमताविषयक सत्रात देखील आम्ही लैंगिक कृतीबाबत बोलतच नाही, आम्ही केवळ शरीरात होणा-या बदलांची माहिती देत असतो. मी पुढाकार घेतला आणि शेकडो पालकांशी चर्चा केली की या विषयात मुलांशी बोलताना त्यांना काय समस्या येतात, त्यांना लैंगिक शिक्षण देताना ते कुठे अडखळतात. मी मुकेपणाच्या भिंती तोडायचे ठरविले. ज्यात मनात साचून राहिलेल्या त्या गोष्टी मोकळ्या व्हाव्या, आणि आश्चर्यकारक परिणाम झाला. मी या चर्चा पूर्णत: मुक्त आणि मोफत आयोजीत केल्या, मग त्या सामाजिक, कॉर्पोरेट, किंवा शाळा अथवा पालकांच्या गटामध्ये असोत.” अंजू म्हणाल्या.

शाळांचे दरवाजे अशा चर्चासाठी मोकळे करणे हे देखील एक दिव्य होते. अजूनही काही प्रमाणात ते कठीणच आहे, अंजू सांगत होत्या. पालकांचा विरोध, सरकारची धोरणे, शाळेच्या अभ्यासक्रमाची घाई, विद्यार्थ्यांची मोठी संख्या, आणि निधीचा आभाव या अशा अनेक समस्या होत्या ज्यातून जात अंजू यांनी या लैंगिक शिक्षणाचा आग्रह कायम ठेवला.


image


वाढत्या वयातील संगीत

अंजू यांनी या चर्चांना नंतर कार्यशाऴांचे स्वरूप दिले. त्यांनी केवळ ९-१२ वयोगटासाठी जननक्षमता आणि सुरक्षा या विषयावर कार्यशाळा सुरू केल्या. आणि त्यानंतर ब-याच सुधारणा केल्या. आता त्या कार्यशाळा घेतात, ‘चांगला आणि वाईट स्पर्श कोणता’ ६-८ वयोगटासाठी, ‘जननक्षमता आणि सुरक्षा’ ९-१२ वयोगटासाठी, ‘जननक्षमता आणि त्या पलिकडे’ १३-१५ वयोगटासाठी, लैंगिकता आणि संभोग १६ -१८ वयोगटासाठी. अंजू म्हणाल्या की त्यांनी प्रौढ तरुणांसाठी आणखी देखील काही मोड्यूल्स तयार केली आहेत.

या कार्यशाळा खाजगी किंवा शाळांच्या सहकार्याने आयोजित केल्या जातात. ज्या खाजगी कार्यशाळा असतात त्या दिवसभराच्या आणि १२-२४ वयोगटाच्या असतात, आणि त्या चार ते सहा तास चालतात, वयोगटानुसार. सर्व कार्यशाळांमध्ये पालक-पाल्य संवाद असतो, मला वाटले हे फार महत्वाचे आहे. त्यात मनातील अडथळे दूर करत घरात संवाद कसा व्हावा यांचे मार्गदर्शन केले जाते.

अंजू यांना वाटले की, पालक या कार्यशाळेत असलेच पाहिजेत. असे असले तरी त्यांनी त्यांना मुलांच्या बाबतीत फारच काळजी करणे किंवा त्यांच्या गटात त्यांच्या पासून फार दूरही न राहणे कसे ते समजावले. त्यांनी पालक आणि पाल्य जवळ कसे येतील याचा विचार केला, त्यात कोणताही संकोच नसेल आणि ज्यावेळी त्यांनी ही संकल्पना तयार केली त्यावेळी ‘जननक्षमता आणि सुरक्षा’ असा तो विषय होता.


image


गेल्या दोन वर्षापासून अंजू यांनी २० कार्यक्रमातून ‘ ग्रोइंग अप’ या नावाने संगीतमय कार्यक्रम सुरू केला आहे. ज्यात त्या जननक्षमता आणि सुरक्षेची माहिती देतात. कायदा आणि लोक संवाद या विषयात दुहेरी पदवी घेतलेल्या अंजू सध्या मुंबईत त्यांच्या पतीसोबत आणि दोन मुलांसोबत राहतात. अंजू ज्या मुळच्या नागपूरच्या आहेत,पत्रकारिता आणि कॉपी रायटर म्हणून लिंटास च्या मुंबई कार्यालयात दाखल झाल्या होत्या.

“ ज्यावेळी माझा पहिला मुलगा वर्षभराचा होता, मी एजन्सीचे काम सोडले आणि मुक्त लेखिका म्हणून काम सुरू ठेवले, त्यात मी सिनेमा, कॉर्पोरेट सिनेमा आणि क्रिकेट शृंखलासाठी लिखाण केले.” “आता मी चाळीशीत आहे मात्र माझ्याकडे असंख्या कल्पना आहेत, आणि भारतातील लैंगिक शिक्षणाबाबतचा बाऊ दूर करण्याचे काम मला करायचे आहे.” अंजू सांगतात. अंजू यांनी नुकतीच दोन पुस्तके लिहिली आहेत, ‘हाऊ आय गॉट माय बेली बटन’ आणि ‘हाऊ आय फाऊंड आऊट एव्हरीथींग अबाऊट सेक्स’.

लेखिका : हेमा वैष्णवी

Add to
Shares
2
Comments
Share This
Add to
Shares
2
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags