लंडनच्या या विद्यार्थीनीला धन्यवाद! युपीच्या या खेड्यातील प्रत्येक घरात वीज दिल्याबद्दल!

लंडनच्या या विद्यार्थीनीला धन्यवाद! युपीच्या या खेड्यातील प्रत्येक घरात वीज दिल्याबद्दल!

Tuesday August 01, 2017,

2 min Read

भारतात अशी हजारो गावे आजही आहेत ज्यांना देशाच्या राष्ट्रीय उर्जा ग्रीडला जोडले गेले नाही. आणि देशात अशी हजारो गावे आहेत ज्यांना विजेच्या तारांनी जोडले आहे तरी देखील पुरेशी विज मिळू शकत नाही. आता मात्र लंडनच्या इंपेरियल महाविदयालयातील विद्यार्थीनीने या गावागावतील चित्र बदलून टाकायचे ठरविले आहे. क्लेमेंटीन चँम्बोन यांना धन्यवाद द्या ज्यांच्या अथक प्रयत्नातून उत्तर प्रदेशातील शंभर पेक्षा जास्त घरे असणा-या या गावात वीज पुरवठा सुरू झाला आहे.


image


क्लेमेंटीन या त्यांच्या इंग्लंड मधील अभियांत्रिकी महाविद्यालयातील पीएचडीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थीनी आहेत, ज्या उर्जा या सामाजिक स्टार्टअप उपक्रमात कार्यरत आहेत. त्यांनी सा-यांनी मिळून एक लहानसे सौरऊर्जा ग्रिड( विद्यूत भारमंडल) तयार केले ज्यातून हजार लोकांच्या उपयोगाची वीज देता य़ेईल.

विजेच्या पारंपारिक स्त्रोतांशिवाय, भारतात आता अपारंपारिक स्त्रोत विकसित करण्यावर भर दिला जात आहे. आणि अन्य कोणत्याही अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतामध्ये सौर ऊर्जा या स्त्रोताला जास्त मागणी आहे. मागील तीन वर्षांपासून भारतात सौर ऊर्जाची बाजारपेठ चार पट वाढली आहे, आणि दहा हजार मेगावॅट पर्यंत जावून पोहोचली आहे. येत्या तीन वर्षात ती अशीच दुपटीने वाढून २० हजार मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे.


image


क्लेमेंटीन यांना त्यांच्या प्रयत्नातून लोकांचा फायदा झाला याचा आनंद आहे. गावातील मुलांना आता अभ्यास करण्यासाठी उजेड मिळाला हे माहिती झाल्यावर त्यांचा आनंद व्दिगुणीत झाला. त्यांची इच्छा आहे की गावातील शाळेत संगणककेंद्र सुरू करून त्यातून विद्यार्थ्याना शिकता आले पाहिजे.

गावातील बहुतांश लोक शेती आणि पशुपालन यावर गुजराण करतात. सौर ऊर्जा आल्याने गावातील लोकांना आता डिझेल पंपावर विसंबून राहावे लागत नाही. त्यामुळे त्यावर त्यांच्या शेतात सिंचन करता येते. क्लेमेंटीन यांना विश्वास आहे की डिझेलच्या किंमती वाढत राहतील त्यामुळे सौर पंप वापरणे केंव्हाही व्यवहार्य होणार आहे.


image


त्यांना हे कार्य असेच अव्याहत सुरू ठेवायचे आहे, आणि इतर गावांमध्ये देखील सौर पंप लावून द्यायचे आहेत. ज्यावेळी सौर प्रकल्प तयार होतो, प्रत्येक घरावर छोटा मिटर लावला जातो आणि किती वीज वापरली याची नोंद केली जाते. 

    Share on
    close