...आणि त्यांनी अख्ख जग जोडलं

13th Oct 2015
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

पूर्वीच्या काळात असलेले अंतराचे बंधन आता फारसे राहिलेले नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सर्वांनाच सर्वच प्रकारची माहिती मिळू शकते. एकमेकांमधला संवादही अगदी गतिशील झालाय. आजची तरुणाई आपले विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांपर्यंत पोहोचवत आहे. अशाच युवा पिढीला एकमेकांशी जोडण्याचे काम केलेय ते ‘स्मार्टिकन’ या सोशल नेटवर्किंग साईटने. याचे श्रेय जाते ते आस्था अलमस्त, चरक अलमस्त, अभिषेक पुरी आणि मणिदेव यांना. सोशल मीडियात यांची नावे अगदी आदराने घेतली जातात. ‘स्मार्टिकन’ वेबसाइटला आज जगभरातून लाखोंच्या संख्येने भेट देत आहेत.


टीम ‘स्मार्टिकन’

टीम ‘स्मार्टिकन’


‘स्मार्टिकन’ वर आजमितीस सुमारे ५ लाख विषयांवर चर्चा घडवून आणली आहे २०१३ मध्ये हे ४ मित्र एकत्र आले होते. सुरुवातीला स्मार्टफोनसाठी गेम तयार करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र सोशल मीडियाच्या क्रांतीमुळे त्यांचा मार्ग बदलला आणि ‘स्मार्टिकन’ वेबसाइटचा जन्म झाला. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे.

चरक आणि मणिदेव अमेरिकेतील लुसियाना महाविद्यालयात कंप्यूटर सायन्सचे शिक्षण घेत होते. गेम डेव्हलपमेन्टमध्ये या विषयात स्पेशलायझेशन करत असताना दोघांनी सुरुवातीपासूनच आपले कौशल्य दाखवले. कॉलेजच्या दुसरयाच वर्षी त्यानी तयार केलेला गेम पाहून कॉलेजचे डीनदेखील प्रभावित झाले होते.

कंपनी आणि प्रोजेक्ट बद्दल माहिती देताना आस्था सांगते की, कोलकात्यात आय आयएम पूर्ण केल्यावर सर्वाना हेवा वाटावा असे काहीतरी करून दाखवावे असे विचार नेहमी तिच्या मनात येत होते. असाच विचार सुरु असताना या मित्रांच्या संपर्कात आले आणि आम्ही सर्वानी मिळून ‘एंग्री बर्ड’ नावाचा गेम तयार केला आणि त्या ‘गेम’ला जगभरातून मोठी पसंती मिळाली. लोकांची पसंती पाहता आम्ही आणखी दोन गेम तयार केले. असे गेम तयार करण्यात मग्न असतानाच आम्ही सोशल नेटवर्किंग साईटबद्दल विचार केला आणि हा विचार ‘स्मार्टिकन’ च्या माध्यमातून प्रत्यक्ष कामात उतरविला.


आस्था अलमस्त

आस्था अलमस्त


याच दरम्यान भारतात सोशल नेटवर्किंग साईटचे जाळे पसरत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक एकमेकांच्या संपर्कात येत होते मात्र तरुणांना म्हणावे तसे आपले विचार मांडता येत नव्हते. दुसऱ्या साईटवर काही मर्यादा होत्या. याच बाबींचा आम्ही विचार करुन ‘स्मार्टिकन वेबसाईट ’ तयार केली. या साईटवर तरुणाई आपले विचार... आपल्यापुढील आव्हानांवर चर्चा बिनधास्तपणे करत आहेत. ‘स्मार्टिकन’ जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम करत आहेत. या साईट वर चर्चा करण्यासाठी भरपूर स्वातंत्र्य मिळत असल्याचा दावा आस्थाने केला

आस्था पुढे सांगते की, मोशन पंच स्टुडीओच्या ४ संस्थापकांपैकी तिघांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. फक्त तिचे शिक्षण पूर्ण झाले असल्याचे तिने सांगितले. चरक आणि मणिदेव कॉलेजमध्ये असताना हुशार होते. ते दोघेही भविष्यात काही तरी करून दाखवण्याच्या उद्देशाने धडपड करायचे. नवे विचार त्यांच्या मनात नेहमी घोळत राहायचेत. गेमींगच्या दुनियेत वावरताना त्या दोघांनी शिक्षण अर्धवट सोडून नवे गेम बनवण्यात मग्न झाले.

पुढे आमच्यात अभिषेक पुरी नावाचा आणखी एक साथीदार सहभागी झाला. तो कायद्याचे शिक्षण घेत होता. मात्र शिक्षण सोडून तो आमच्या मदतीला आला. आम्ही कामाशी एकरूप राहिल्यानेच एवढी मोठी भरारी घेतल्याचे ती आवर्जून सांगते. ‘स्मार्टिकन’ चा पाया जानेवारी २०१३ मध्ये घातला आणि दिवस रात्र एक करुन आम्ही नोव्हेंबर २०१३ मध्ये ही साईट जगासमोर आणली. त्यावेळी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांसमोर त्यांच्यापुढील आव्हानांवर ऑनलाइन चर्चा ठेवली होती. त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. काही कालावधीतच एकमेकांचे विचार पटणारे ‘स्मार्टिकन वेबसाईट ’शी जोडले गेले... सुरुवातीला आमच्या समोर अनेक आव्हाने आली मात्र त्यावर मात करत एक प्रकारे आम्ही विजयच मिळवला असे ती आत्मविश्वासाने सांगते.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा

Our Partner Events

Hustle across India