आईच्या साथीनं श्वेताची फॅशनच्या दुनियेत भरारी - WhySoBlue फॅशन पोर्टल

7th Jan 2016
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

इतर उद्योजकांसारखं श्वेता शिवकुमार यांना कधीही स्टार्टअप सुरू करायचं नव्हतं. पण २०१२मध्ये वडिलांच्या निधनानंतर श्वेता यांनी आईच्या साथीनं एक उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.


image


(श्वेता (डावीकडून) आणि जया शिवकुमार, WhySoBlueच्या सहसंस्थापक)

त्या क्षणी उच्चशिक्षण घेणं शक्य नव्हतं असं श्वेता सांगतात. त्याचवेळी वडिलांच्या निधनानंतर भेटायला आलेल्या काकाने त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीला आऊटलूकच्या बिझनेस मॅगझिनसाठी जाहिरात आणि विक्री विभाग सांभाळणारी व्यक्ती हवी असल्याचं सांगितलं, असं WhySoBlue या ऑनलाईन फॅशन पोर्टलच्या सह संस्थापक श्वेता सांगतात. आऊटलूकमध्ये १३ महिने काम केल्यानंतर श्वेता यांनी एका कंपनीत ६ ते ७ महिने मीडिया प्लानिंगचं काम केलं.


image


श्वेता शिवकुमार

कामातून वेळ मिळेल तेव्हा श्वेता फॅशन मॅगझिन आणि ब्लॉग्ज वाचायच्या. एखादा उद्योग सुरू करण्याची महत्त्वाकांक्षा नसली तरी एकदिवस फॅशन क्षेत्रात काम करण्याची त्यांची इच्छा होती. श्वेताने नोकरी सोडावी असं त्यांच्या आईचं मत होतं. पण घाई न करता श्वेता यांनी अत्यंत विचारपूर्वक नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

वडिलांच्या अकाली निधनामुळे स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं श्वेता सांगतात. “यकृतामधील संसर्गामुळे त्यांची प्रकृती बिघडली, हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत होती पण अचानक ते गेले. ते जर असते तर मी कदाचित उशीरा स्टार्टअप सुरू केलं असतं. मला स्टार्टअप सुरू करण्याचं धाडस झालं नसतं” असं श्वेता सांगतात. आईच्या सोबतीनं स्टार्टअपसाठी निधी उभारणं, लोकांच्या भेटीगाठी घेणं या सगळ्या गोष्टी श्वेता यांना आजही आठवतात.

WhySoBlueया नावाबद्दल श्वेता सांगतात की त्यांनी लहान बहिणीसोबत रात्रभर विचार केल्यानंतर हे नाव निश्चित झालं. त्यांना त्यांच्या स्टार्टअपच्या नावात फॅशन हा शब्द नको होता. आमचा ब्रँड हा सर्वकाही आहे म्हणजे पेपी आणि हॅपी असंही श्वेता सांगतात. उत्पादनाबद्दल बोलताना एखाद्या व्यक्तीचा मूड अगदी छान होऊ शकतो असं नाव असल्याचा दावा श्वेता करतात.

स्टार्अप सुरू करण्यासाठी श्वेता यांना आईनं खूप प्रोत्साहन दिलं. घरातील एकमेव कमावती व्यक्ती असल्यानं श्वेतानं नोकरी करणं मान्य नव्हतं. त्यापेक्षा श्वेताने फॅशन जगतातील तिची स्वप्न पूर्ण करावी असं मत असल्याचं त्यांच्या आई जया सांगतात. वडील आजारी पडल्यानंतर जया या मुलींच्या आधार आणि प्रेरणास्त्रोत बनल्या. कोणाकडून कर्ज घेण्यापेक्षा त्यांनी स्वत: पैसा टाकण्याचा निर्णय घेतला. हळूहळू विस्तार करायचा आणि गरज पडली तर कर्ज घ्यायचं असा निर्णय घेतल्याचं जया सांगतात. वेळ घालवण्यापेक्षा लवकरात लवकर स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेण्याचा कणखरपणाही जया यांनीच दाखवला.


image


जया शिवकुमार यांचं शिवणकाम उत्तम होतं. २५ वर्ष त्यांनी त्यांच्या मुलींसाठी स्वत: कपडे शिवले होते. जेव्हा WhySoBlueची संकल्पना प्रत्यक्षात आली तेव्हा सुरूवातीपासूनच प्रत्येकाचं काम ठरवण्यात आलं होतं. श्वेता या कापड, डिझाईन ठरवणं आणि मार्केटिंगचं काम बघतात. तर जया या प्रत्यक्ष शिवणकामात लक्ष घालतात. त्यांचं काम घरातच चालतं आणि उत्पादनावर त्यांचं पूर्ण नियंत्रणही असतं. त्यामुळे दुकानदारही त्याकडे लवकर आकर्षित होतात. डिझाईन तयार करण्यापासून ते फॅशनचे नवे ट्रेंड तयार करण्यापर्यंत WhySoBlue सारं काही करतं. हा ब्रँड नवीन असला तरी त्यांचा हळूहळू विस्तार होतोय.

“जेव्हा माझे पती वारले तेव्हा आमची आर्थिक स्थिती खूप वाईट होती. त्यामुळे श्वेताला नोकरी सोडण्यासाठी प्रवृत्त करणं ही मोठी जोखीम आहे हे मला कळत होतं. पण तिला त्या नोकरीत अजिबात रस नव्हता. त्यामुळे तिला तिथे जबरदस्ती काम करायला लावणं पटत नव्हतं. आम्ही दोघी हे आव्हान पेलू असा विश्वास मला होता,” असं जया सांगतात. अनेक वर्ष त्यांनी फक्त मुलींसाठी आणि मैत्रिणींसाठी कपडे शिवले होते. पण या व्यवसायात आल्यानंतर शिवणकामाचं कौतुक होऊ लागल्यानं आत्मविश्वास वाढल्याचं जया सांगतात.

जया यांची वृत्ती एका उद्योजकाची असल्यानं त्यांनी त्यांच्या मुलीला या व्यवसायात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं. या मुलींच्या वाढत्या वयातही पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे शिवण्याचा प्रयत्न केल्याचंही जया सांगतात.

लेखक – सास्वती मुखर्जी

अनुवाद – सचिन जोशी

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा

Our Partner Events

Hustle across India