प्रगती व्हावी, मात्र त्यात पर्यावरणाचे नुकसान होऊ नये- पर्यावरण उन्मुख विकासा बद्दल सांगताहेत कांची कोहली
विकास व्हावा, प्रगती व्हावी, उन्नती व्हावी मात्र ती सर्वच क्षेत्रात समरूपाने पसरावी कोण्या एकाच क्षेत्राचा होत गेलेला विकास हा काही समाजासाठी हितकारक ठरू शकत नाही. कोणत्याही देशाला जर प्रगती करायची असेल तर हे आवश्यक आहे की त्याने सर्वच क्षेत्रांना सोबत घेऊन विकास साधायला हवा आणि कोण्या एका विशिष्ट क्षेत्राच्या विकासा करिता अन्य क्षेत्राकडे दुर्लक्ष होऊ नये अन्यथा त्याचे भीषण दूरगामी परिणाम संभवतात आणि एका नव्याच समस्येला देशाला समोरे जावे लागते. कांची कोहली या एक संशोधिका आणि लेखिका आहेत ज्या पर्यावरणावर अनेक वर्षे संशोधन करत आहेत त्या भारताच्या विकासाला पाहून आनंदी तर आहेत मात्र त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्या सांगतात की मागच्या दोन दशकांत देशाने बरीच प्रगती केली आहे मात्र ही प्रगती साधताना आपण पर्यावरणाचे फार मोठे नुकसान केले आहे. बऱ्याच जंगलांना तोडण्यात आले. जमिनी खालून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करण्यात आला ज्याने अनेक भागांमध्ये पाण्याचा स्तर खूप अधिक खालावला तसेच नद्या देखीलअत्यंत प्रदूषित झालेल्या आहेत. कांची यांनी मुंबई च्या टीआईएसएस मधून सोशल वर्क या विषयात शिक्षण घेतले. पर्यावरणाप्रती त्यांना लहानपणा पासूनच ओढ होती त्यांच्या आईनेही समाजसेवा या विषयात एम ए केले होते. आईच्या कामाने त्यांच्या वर फार प्रभाव पाडला आणि त्यांनी ही पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात काम करण्याचा निश्चय केला.
कांची यांनी पदविका प्राप्त केल्या नंतर कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यात कामाला सुरुवात केली. इथे त्यांनी पश्चिम पठारावरील भागात जमिनीच्या स्तरांवर काम केले आणि गोष्टीना बारकाईने समजून घेतले. इथे त्यांनी दोन वर्षे काम केले आणि इंडस्ट्री आणि इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पासून होणाऱ्या पर्यावरणीय आणि सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या हानीला समजून घेतले. त्यांना हे पाहून फार दुःख झाले की कशा प्रकारे पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून काम केले जात आहे.
दोन वर्ष कर्नाटकात काम करून त्या दिल्लीला आल्या आणि तिथे त्यांनी कल्पवृक्ष नावाच्या संस्थेसोबत काम सुरु केले. ही संस्था पर्यावरणाचे शिक्षण देण्याचे काम करत होती आणि त्यासाठी वेगवेगळे संशोधन आणि जनजागृती कार्यक्रम चालवत होती. इथे त्यांनी तीन वर्षे काम केले आणि अनेक नव्या गोष्टी शिकून घेतल्या. इथले काम कांची ला फारच भावले कारण येथे अगदी मुलभूत गोष्टींवर काम होत होते. कांची सांगतात की भारतात पर्यावरणा संबंधी जे पण नियम आहेत ते फारच तांत्रिक आहेत आणि त्यांना समजणे हे एक कष्टप्रद काम आहे. कांचीने छतीसगढ, गुजरात आणि किनारी भागांमध्ये भरपूर काम केले आणि त्यांना कळले की सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांमध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. त्या सांगतात की सर्वप्रथम आपल्याला हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की सध्या असलेल्या नियमांप्रमाणे या भागात पर्यावरणाचा समतोल राखला गेला आहे का? या नियमांना अधिक कठोर असण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी केंद्र सरकारला वेगवेगळ्या विशेषज्ञांची मते घेऊन लवकरच काही पाऊले उचलावी लागतील.
छत्तीसगढ राज्यातील रायगढ येथे कांचीने स्थानिक लोकांसोबत काम केले ज्यांनी कांचीला पर्यावरणासंबंधित काही महत्वाच्या कायद्यांची माहिती करून दिली जे त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकत होते. कांची यांनीही त्या लोकांची शक्य तितकी मदत केली आणि लोक आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी यथाशक्ती प्रयत्न केला.
आपल्या स्वतःच्या या कामा व्यतिरिक्त कांची ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च-नमाती एनवायरमेंट जस्टिस प्रोग्राम’ च्या लिगल रिसर्च सोबत ही संलग्न आहेत. त्यांनी एनवॉयरमेंटल लॉ आणि संबधित विषयांवर अनेक पुस्तके, रिपोर्ट्स आणि लेख लिहिले आहेत.
कांची सांगतात की या विषयावर काम करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाली आणि आपल्या कामाचे सारे श्रेय त्या आपल्या परिवारालाच देतात. त्यांचे कुटुंब गांधीजींच्या आदर्शांना खूप मानतात यासाठीच गांधीजी प्रमाणे लोकांमध्ये राहून त्या सहजतेने काम करू शकतात.
कांची या केंद्र सरकार द्वारे बनवल्या गेलेल्या पॅलिसी मेकिंग च्या पद्धतीना योग्य मानत नाहीत. त्या म्हणतात की धोरणे ही वेगवेगळ्या परिसरानुसार आणि तेथील गरजेनुसार बनवायला हवीत. ज्यात स्थानिकांचा सहभाग असायला हवा ज्यांना परिस्थितीचे योग्य भान आहे आणि जेहा विषय योग्य प्रकारे समजवुन सांगू शकतात.
कांची येणाऱ्या काळातही लोकांसोबतच काम करू इच्छितात आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करू इच्छितात. त्यांना एक असे माॅडेल बनवायचे आहे ज्या मध्ये लोक सहभाग असेल आणि जे सरकारी धोरण आखण्यास उपयुक्त असेल.