एक झाडूवाल्यांच्या समाजातील व्यक्ती, ज्यांना कधी संस्कृत नाकारण्यात आले होते; आज प्राध्यापक आहेत!

एक झाडूवाल्यांच्या समाजातील व्यक्ती, ज्यांना कधी संस्कृत नाकारण्यात आले होते; आज प्राध्यापक आहेत!

Wednesday July 19, 2017,

3 min Read

ज्यावेळी कौशल पनवार या हरियानाच्या त्यांच्या शाळेत सातव्या वर्गात होत्या, त्यांना संस्कृत हा विषय शिकायचा होता कारण त्यात त्यांना रूची वाटत होती. यासाठी नाही की त्या बंडखोर होत्या आणि त्यांना दाखवून द्यायचे होते की, त्या महिला आणि मागासवर्गीय असल्याने त्यांना शिकण्याचे आव्हान पेलून दाखवायचे होते. मात्र त्यांच्या शिक्षिका ज्या उच्चवर्णीय समजल्या जाणा-या समाजातील होत्या, त्यांना हाताने कचरा वाहून नेणा-या समाजातील मुलीला शौचालयात स्वच्छता करण्यापेक्षा इतर काही शिकवण्यात संकोच वाटत होता. याचा उलट परिणाम असा झाला की, शिक्षकांच्या या वागणुकीतून कौशल यांच्यातील लढाऊ वृत्ती जागृत झाली आणि त्यानी संस्कृत भाषेत पीएचडी पदवी प्राप्त केली !

कौशल या वाल्मिकी अनुसूचित जातीच्या आहेत, ज्यांना सामाजिक रचनेत अत्यंत हीन वागणूक दिली जात असे आणि जे १.३ दशलक्ष लोकसंख्येचे घटक आहेत ज्यांनी भारतात हाताने शौचालये स्वच्छता केली आहेत.

कौशल या त्यांच्या शिक्षकांच्या वागणुकीने दृढ झाल्या, दुस-या दिवशी देखील त्या वर्गात आल्या आणि शिक्षकांनी त्यांना शेवटच्या रांगेत बसायला सांगितले. कौशल यांना हे सारे सहन करावे लागले कारण काय तर त्यांना शिकण्याची इच्छा होती. शेवटच्या रांगेत बसवले गेल्याने त्यांच्यातील संघर्षाची वृत्ती जागृत झाली.


image


कौशल यांनी संस्कृतचे शिक्षण घेणे सुरूच ठेवले त्याच वेळी त्यांच्या पालकांसोबत त्या हाताने शौचालये साफ करायच्या कामात मजूर म्हणून जात होत्या. जरी त्या त्यांच्या अभ्यासात चांगल्या होत्या आणि नेहमी प्रश्नांची उत्तरे देण्यात पुढे असायच्या तरी उच्च जातीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मागे टाकले होते.

त्यांच्या सहध्यायी देखील काही शिक्षकांपेक्षा वेगळ्या नव्हत्या, ज्यावेळी त्यांना समजले की त्या झोपडपट्टीत राहतात आणि हाताने स्वच्छता करणा-या समाजातील आहेत. त्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ माझ्या लहानपणी, बालवयात आणि महाविद्यालयीन काळात हरियानामध्ये आणि माझ्या डॉक्टरेटच्या काळात दिल्लीतही, सगळीकडे माझ्या जातीच्या ओळखीमुळे मला कमी समजण्यात आले. जातीभेदाची वागणूक भारतात संपली नाही हे दिसले. यातूनच मी बदलायचे ठरविले.”

मात्र अशाप्रकारे कौशल किंवा कुणालाही त्यांच्या आजूबाजूला माहित असलेल्यांनी जातीच्या कारणाने नाकारल्याचे शतकानुशतके होत आले आहे ज्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. ज्यावेळी त्यांनी भाषा शिकण्यास सुरूवात केली, त्यांना मुळ कारण काय ते देखील समजण्यास सुरूवात झाली, भेदाभेद का आहे आणि ती दूर कशी होवू शकेल हे समजू लागले त्यानंतर त्यांना त्याच्याशी लढण्याची शक्ती आणि समज देखील येत गेली. त्यातून मग त्या पीएचडी संस्कृत पर्यंत शिकल्या आणि आता मोतीलाल नेहरू महाविदयालयात सहायक प्राध्यापक म्हणून संस्कृत विभागामध्ये शिकवत आहेत.

आजही त्या त्यांच्या जातीची ओळख लपवित नाहीत, आणि त्याबाबत अभिमानाने सांगतात. त्या असे मानतात की वास्तवापासून दूर जाण्यात लाज बाळगण्यासारखे काहीच नाही. त्या उलट कुणी त्यांची हेटाळणी करतात त्यावेळी लोक चपापतात आणि एक पाऊल मागे घेतात त्यावेळी त्यांचा विजय झालेला असतो.

अजूनही ७०टक्के पेक्षा जास्त अनुसूचित जातीचे लोक महाविद्यालयात जात नाहीत, अगदी आरक्षण लागू असले तरी देखील. चारपैकी एकालाच त्याचा फायदा मिळतो. त्यापेक्षाही मानवी हाताने शौचालये आणि मैला स्वच्छ करण्याला बंदी असली तरी एका वृत्तानुसार भारतात आजही १.३दशलक्ष लोक हे काम रोज करत आहेत. आणि भारतीय रेल्वे मध्येच यापैकी सर्वाधिक कामगार काम करतात. जर असे मानले की भारताने हाताने मैला स्वच्छ करण्याची प्रथा बंद करण्याचे स्वप्न पाहिले तर २०१९पर्यंत देखील हे स्वप्न केवळ स्वप्नच राहणार आहे.