६३ नकार पचवूनही पराभव नाहीच, नवीन-कौशिक जोडी अखेर जिंकलीच

15th Oct 2015
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

कौशिक मुद्दा आणि नवीन जैन यांनी २०१४ मध्ये बंगळुरूतील ‘आरव्हीसीई’मधून ‘ईअँडटीसी’ (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन) या अभियांत्रिकी शाखेतील पदवी संपादन केली. पदवीच्या शेवटच्या वर्षातच कॅम्पस इंटरव्ह्यू झालेला होता. निवडही झालेली होती आणि या दोन्ही नवोदित इंजिनियर्सना नोकरीसाठी फिरावेही लागलेले नव्हते. दोघांच्या वाटा मात्र बदललेल्या होत्या.

कौशिक केपीएजी कंपनीत चांगल्या हुद्दयावर लागलेले होते. पगार दणकून होता. इतर नवख्यांसाठी असते तसे कौशिकसाठीही हे सगळे स्वप्नवत होते. नवीनही अन्य एका कंपनीत लागलेला होता. कौशिक आणि नवीन यांच्या वाटा पुन्हा एकत्र येऊ शकत नव्हत्या का? तर असे काही नाही कारण शेवटी पृथ्वी गोल आहे… त्यात एकच वर्षाआधी तर दोघांनी आपल्या सहाव्या सेमिस्टरदरम्यान लहानमोठ्या प्रकल्पांवर एकत्र काम सुरू केलेले होते. एका प्रकल्पावर तर दोघांनीही आपली संपूर्ण वेळ आणि संपूर्ण ताकद वाहिलेली होती. तो पूर्णत्वाला आणलाही होता आणि त्यात हे नोकरीचे मध्यंतर आलेले होते… पण जोडी पुन्हा जमलीच.

आपला ‘स्टार्ट-अप’ स्थिरस्थावर करण्यासाठीच्या संघर्षादरम्यानच एका ईमेलच्या माध्यमातून कौशिक सांगतात, ‘‘कॉलेजच्या काळात मी आणि नवीन छोटे रोबोट आणि अवरक्राफ्ट बनवत असू.’’ असल्या यंत्रांवर काम करत असतानाच आपल्या रोबोटला अधिक उपयुक्त बनवायचे तर त्याच्या सुट्या भागांना अधिक तपशीलवार व सुटसुटित करणे आवश्यक आहे, असे दोघांनाही वाटले. त्यासाठी त्यांना एक सीएनसी (संगणक संख्यात्मक नियंत्रक) राउटरची गरज होती. पण त्या काळात बाजारात उपलब्ध असलेली सर्वांत स्वस्त मशिनही त्यांच्या कुवतीबाहेर होती. कारण किमती प्रचंड होत्या. सहा ते सात लाख रुपयाला एक मशिन. कशी घेणार?

image


कौशिक म्हणतात, ‘‘मशिन विकत घेऊ शकत नाही म्हटल्यावर आमच्यासमोर एकच मार्ग होता, तो म्हणजे स्वत: मशिन तयार करणे. आम्ही ठरवून टाकले, की मशिन तयार करायचे. तेव्हापासून आम्ही मागे वळून पाहिलेले नाही. ज्या कल्पनेचा श्रीगणेशा आम्ही आमच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी केलेला होता, ती कल्पना आता आमच्या ग्राहकांच्या समस्येवर उपाय म्हणून समोर येऊ पाहात होती.’’

अशाप्रकारे एथरियल मशिन्सची (Ethereal Machines) सुरवात झाली. अर्थात या पुढला मार्ग सोपा नव्हता. अडचणींनी व्यापलेला होता.

हे स्वप्न छोटे स्वप्न नव्हते. नोकरीच्या रूपात एक मध्यंतर त्यात येऊन गेलेले होते. हे स्वप्न म्हणजे यज्ञच खरंतर. सर्वांत आधी आम्ही त्यात नोकरीची आहुती दिली. आता मुख्य अडचण आमच्या समोर जी होती ती म्हणजे ग्राहकांच्या गळी हे उतरवणे, की कॉलेजचेच काही विद्यार्थी अशा मशिन बनवतील, ज्या तुमच्या (ग्राहकांच्या) उपयोगात पडतील. विद्यार्थी मशिन बनवू शकतील, यावर ग्राहकांचे साशंक असणे ओघाने आलेच. शंका दूर कराव्या लागल्या. खुप अवघड गेले हे.

… आणि आता पुढेच जायचेच, हे ठरले. एका दोस्ताने त्याचे गॅरेज कौशिक आणि नवीन यांना उपलब्ध करून दिले. गॅरेजमध्येच एथरियल मशिन्सचे पहिलेवहिले कार्यालय थाटले गेले. एक प्रोटोटाइप निर्माण केल्यानंतर आणि त्याच्या हायपोशिसिसची शाश्वती झाल्यानंतर आता ऑर्डरी मिळवू म्हणून ते बाहेर पडले. बाजारातला सर्वांत स्वस्त सीएनसी राउटर ते बनवत होते, हीच या दोघांची सर्वाधिक जमेची बाजू होती. देशभरातील उत्पादकांना मशिन बनवताना ग्राहकांच्या गरजेनुरूप तिची धाटणी, बांधणी करण्यात खुप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो, असा या जोडीचा दावा आहे. एथरियल त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तांत्रिक सहाय्य करण्यातही मोलाचा ठरतो. जोडीच्या मशिनच्या साह्याने लाकुड, संगमरवर, ग्रेनाइट, प्लास्टिक आदींवर अगदी कशाही प्रकारची २डी तसेच ३डी डिझाइन, नक्षी साकारली जाऊ शकते. बाजारात उतरताना जोडीचा सामना प्रत्यक्ष आयुष्यातल्या वास्तवाशी झाला. नकाराचा सामना करावा लागला. नकार पचवावा लागला. नकार जणू त्यांची वाटच बघत होता.

कौशिक सांगतात, ‘‘पहिले काम मिळवण्यापूर्वी मी ६३ नकार पचवलेले होते. खचलो नव्हतो.’’ जेव्हा एका ग्राहकाला कळले, की कौशिक अद्याप कॉलेजच्या शेवटल्या सेमिस्टरला आहेत, तेव्हा त्याने कौशिकना हाकलूनच लावले. कौशिक सांगतात, ‘‘एका ग्राहकाने आम्हाला केवळ यासाठी नकार दिला, की त्यानेही या उत्पादनाच्या क्षेत्रात स्वत:ला आजमावलेले होते आणि तो अपयशी ठरलेला होता.’’ संघर्षाच्या त्या काळात नवीन आणि कौशिकने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खुप काही केले. कार्यालय-कम-गॅरेजमध्ये ते स्वत:च झाडू मारत. ग्राहक आला म्हणजे आपणच विक्री प्रतिनिधीची भूमिका साकारत. ग्राहकासाठी चहाही स्वत:च सांगायला जात. शेवटी ६४ व्या बैठकीने नकाराचा पाढा पुसला. जोडी जिंकली!

गेल्या काही महिन्यांत त्यांच्या एथरियल मशिन्सच्या ग्राहक-यादीत कुठलेही बडे नाव नसले तरी दोघांचा व्यापार मस्त चाललेला आहे. कौशिक म्हणतात, ‘‘आमच्या मशिन्सच्या माध्यमातून आमच्या ग्राहकाला आम्ही उद्यमशील बनवतो, मदत करतो, याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. आमचे मशिन विकत घेतल्यानंतर आमचा ग्राहक संगमरवरासह लाकडावरही नक्षी काढू शकतो. नेमकी आखणी, नेमकी कटाई यामुळे विशेष म्हणजे अगदी नेमकेपणाने नक्षी पडते. इंटेरियअर डिझायनिंगमध्ये तर तिला पर्याय नाही.’’

image


मशिनची किंमत दोन ते चार लाख रुपयांदरम्यान आहे. मशिनसाठी जाहिरातीवर अजून पावाणा खर्च झालेला नाही. कौशिक सांगतात, ‘‘अशा काळात जिथे आयटी आणि सेवा संबंधिंत क्षेत्रांचाच बोलबाला आहे. बाजारावर त्यांचीच हुकुमत आहे. अशात मॅकेनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात स्वत:ला स्थिरस्थावर करणे जरा जिकिरीचेच आहे.’’

कौशिक आणि नवीन यांच्या तांत्रिक ज्ञानावर या व्यापाराची मुख्य भिस्त आहे. दोघांचा अनुभवही दांडगा आहे.

परदेशातून मशिन मागवणारे खरेदी करणारे लोक काही दिवस मजेत काढतात, पण मशिनमध्ये समस्या उद्भवली आणि तांत्रिक साह्याची आवश्यकता भासली तर मग त्रेधातिरपिट उडते. इथे कौशिक-नवीन जोडीचे महत्त्व अधोरेखित होतेच. त्यांच्याकडून मशिन घेतली आणि खराब जरी झाली तरी ते सुधरवून देतीलच, ग्राहकांची ही खात्री पटत गेली आणि व्यवसायाला ते उपयुक्त ठरत गेले.

सध्या बाजारात चिनी मशिनचा बोलबाला आहे. ग्राहकांना या मशिनचा चांगला अनुभव मात्र नाही. मशिन चालवणे शिकण्यापासून अडचणींना सुरवात होते. मशिन चालवणे सुरू केल्यानंतर एखादा बिघाड झाला, की ते कायमस्वरूपी बंद पडते. कुणी वाली नसतो. कौशिक म्हणतात, ‘‘आमच्या मशिन आम्ही डिझाइन केलेल्या आहेत. आमचे तंत्र त्यात आम्ही वापरलेले आहे. ग्राहकांना हे मशिन हाताळायला अगदी सोपे जाते. पुन्हा काही अडचण आलीच तर आमच्याकडे इंजिनियर असतातच. आमचे इंजिनियर तर किरकोळ बिघाड आल्यास ते कसे दुरुस्त करावे हे देखिल आमच्या ग्राहकांना शिकवून देतात. ग्राहकांना वेळ देतात.’’

बंगळुरूच्या या कंपनीत आता सहा इंजिनियर्सची टीम आहे. ग्राहकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना आणि तक्रारींची तातडीने दखल घेतली जाते. आवश्यक त्या सुधारणा त्यानुरूप केल्या जातात. प्राप्त परिस्थितीत चार राज्यांमध्ये एथरियल मशिन्स काम करताहेत. वेळेसोबत पुढे सरकण्याचा, व्याप्ती वाढवण्याचा जोडीचा इरादा आहेच.

‘‘मी देशातल्या प्रत्येक राज्यात कमीत कमी एक मशीन लावू इच्छितो. आताच आखाती देशांसह श्रीलंका आणि नेपाळसारख्या शेजारी देशांतून अनेक ग्राहक आमच्याशी संपर्क करताहेत. चिनी मशिन्सवरून त्यांचा भरवसा उडालेला आहे, हे त्यामागचे कारण. नजीकच्या काळात आमच्या मशिन्स या देशांतल्या बाजारांतूनही तुम्हाला पहायला मिळतील.’’ हे नमूद करताना कौशिक यांचा विश्वास ओसंडून वाहात असतो.

Want to make your startup journey smooth? YS Education brings a comprehensive Funding and Startup Course. Learn from India's top investors and entrepreneurs. Click here to know more.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

Our Partner Events

Hustle across India