Marathi

अजीता बेगम यांनी त्यांच्या पतीकडून स्विकारली पोलीस आयुक्त पदाची सूत्र!

Team YS Marathi
16th Jun 2017
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

अजीता बेगम आणि त्यांचे पती सतिश बीनो सध्या बातमीचा विषय आहेत, आणि हे काही प्रथमच नाही. मागील वर्षी ते चर्चेत होते ते कोल्लामच्या इतिहासातील असे पहिले जोडपे म्हणून जे जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्था यासाठी जबाबदार आहेत.

पोलीस दलातील फेरबदलांनंतर, सतीश पोलीस आयुक्त झाले, त्यावेळी त्यांच्या पत्नी कोल्लाम ग्रामिणच्या अधीक्षिका होत्या. बदलीनंतर त्या म्हणाल्या होत्या की, “ या बदल्यांमुळे आम्हाला काम करणे सोपे झाले आहे, दोन विभागांचे प्रमुख म्हणून एकाच जिल्ह्यात प्रशासनिक दृष्ट्या आम्हाला काम करताना मनुष्य बळाचा सुयोग्य वापर करता येतो, आणि इतर संसाधनाचा देखील. त्याशिवाय येथे सेवा देताना एकात्मिकपणाची भावना जाणवते ज्यामुळे कामात प्रभावीपणा येतो. कारण आम्ही दोघे एका जिल्ह्यात काम करतो.”


image


वर्षभरानंतर अजीता यांनी देखील पोलीस आयुक्त म्हणून सूत्र स्विकारली ज्यांची बदली आता पथानामथ्थीता जिल्ह्याचे प्रमुख म्हणून झाली आहे. या दोन्ही घडामोडीमुळे चर्चा सुरू झाली आहे, ज्यामध्ये दररोज आम्ही पोलीस अधिकारी जोडपे म्हणून लोकांच्या समोर येत असतो. जे एकाच जिल्ह्यात कार्यरत होते, दोघांनी एकाच वेळी प्रशिक्षण घेतले आणि समान रँक मिळवले.

अर्थातच प्रशिक्षणा दरम्यान त्यांची भेट झाली आणि ते प्रेमात पडले, आणि पाच वर्षापूर्वी विवाहबध्द झाले. अजीता यांची ख्याती छेडछाड आणि विनयभंग याविरूध्द धडक कारवाई करणा-या अधिकारी अशी होती जेथे त्यांनी भूतकाळात काम केले. त्यांच्यासाठी हा जिल्हा नवीन आहे. त्यांना येथे महिलांच्या तसेच लहान मुलांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करायचे आहे, ज्यात अमली पदार्थ वाहतूक आणि अपघात यांची संख्या कमी करायची आहे. पोलिस विभाग हा असा विभाग आहे जेथे फार मोठ्या प्रमाणात महिला पुरूषांच्या तुलनेत मोठ्या हुद्यावर कामे करत नाहीत. त्यांच्या अनूभवाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ मी असे म्हणत नाही की लिंगभिन्नता असल्याने काम करता येत नाही. मी गेल्या आठ वर्षांपासून सेवेत आहे. व्यक्तिश: मला कधीच असे वाटले नाही की, महिला म्हणून कुणी मला वेगळी वागणूक देत आहे, माझ्या जीवनात हा अनुभव मला कधीच आला नाही. पण पोलीस खात्यात, येथे वेगवेगळ्या श्रेणीचे अधिकारी असतात. जर तुम्ही याची तुलना महिला कॉन्सटेबलशी करत असाल तर , तिच्या जवळ वेगळा दृष्टीकोन असू शकतो. मला असा अनुभव आहे की त्यांना समान वागणूक दिली जात नाही, जितकी त्यांच्या पुरूष सहका-यांना दिली जाते”

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags