राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावणार प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता

राज्यातील आठ खेळाडूंना

शासकीय सेवेत सामावणार

प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता

Monday November 07, 2016,

1 min Read


राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करुन राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.

राज्यातील क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे विशेष धोरण आहे. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशा गुणवंत खेळाडूंबाबत चर्चा केली. त्यानंतर या समितीने आठ खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यास मुख्यमंत्री फडणवीस आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी मान्यता दिली आहे.

image


या खेळाडूंमध्ये संदिप यादव (क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा विभाग), कविता राऊत(आदिवासी विकास विभाग), ओंकार ओतारी (तहसीलदार, महसूल विभाग), अजिंक्य दुधारे(क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा विभाग), पूजा घाटकर (विक्रीकर निरीक्षक, विक्रीकर विभाग), नितीन मदने(तहसीलदार, महसूल विभाग),किशोरी शिंदे ( नगरविकास विभाग) आणि नितू इंगोले ( क्रीडा विभाग) यांचा समावेश आहे.