भारतीय विमानतळांवर अंगठ्याचा ठसा देण्याची लवकरच तुम्हाला गरज पडेल!

28th Dec 2016
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

भारतीय हवाईयात्रींसाठी खुशखबर आहे. त्यांना विमानतळांवर सुरक्षा तपासणीसाठी लांब रांगा लावून, हातात त्यांचे विमानाचे तिकीट घेवून आता उभे राहावे लागणार नाही. नागरी उड्डाण मंत्रालयाने बायोमेट्रीक तपासणी सुरु करण्यासाठी नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विमान प्रवासापूर्वी किंवा नंतर तपासणी करण्याचा वेळ वाचणार आहे.


Image : (L) – Quartz; (R) – IndiaTimes

Image : (L) – Quartz; (R) – IndiaTimes


त्यासाठी आता तुमच्याजवळ केवळ एकच पुरावा असायला हवा ते म्हणजे तुमच्या अंगठ्याचे ठसे, त्यामुळे प्रवाश्यांना त्याचे बोटाचे ठसे उमटवून प्रवेश करता येणार आहे. त्यामुळे त्यांना ओळखपत्रे किंवा तिकीट दाखवावे लागणार नाही. या संकल्पनेमागे आधारकार्डाला डिजीटली एअर तिकीट बुकींगशी जोडण्याची गरज आहे. आतापर्यंत शंभर कोटी आधारकार्ड वितरीत झाली आहेत. त्यासाठी अर्जदारांनी त्यांच्या डोळ्याच्या बुबळांचे आणि हातांच्या ठश्यांचे पुरावे दिले आहेत. त्यानंतर त्यांना सर्वसमावेशक आधार क्रमांक वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे बोट ठेवल्यावर त्यांची आपोआपच ओळख परेड होणार आहे. 

यासाठीची चाचणी नुकतीच हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी झाली, त्यात विमानतळावर प्रवेश देण्याचे प्रात्यक्षिक पूर्ण झाले.

विमान उड्डाण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांने सांगितले की, “आम्ही हा प्रयोग करून पहात आहोत की, लोकांनी त्यांचे तिकीटबुकींग करताना आधार क्रमांक नोंद करावेत आणि विमानतळांवर प्रवेश घेताना त्यांनी त्यांच्या बोटांचे ठसे उमटविल्यानंतर त्यांना प्रवेश मिळेल आणि स्थानिक प्रवास करता येईल.” मात्र विदेशी प्रवासाकरीता पारपत्राची गरज असेल.

एका वृत्तानुसार, जी एम आर हैद्राबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादीत (जीएचआयएएल) चे सीईओ एसजीके किशोर म्हणाले की, “यशस्वीपणे ओळखपत्रांची(पीओसी) पडताळणी झाल्यावर हैद्राबाद विमानतळावर आम्ही सर्वसाधारणपणे युआयडीएआय म्हणजे आधार ची विचारणा करतो आणि खात्री करून घेतो.”

भारतातील विमान प्रवाश्यांसाठी हे स्वागतार्ह अभियान आहे, जे सतत गर्दीचे विमानतळ असलेल्या हैद्राबाद, बंगळुरू, मुंबई, दिल्ली किंवा चेन्नई विमातळांवरुन प्रवास करतात. जेथे कायम प्रवाश्यांची मोठी रांग असते आणि मोठ्या प्रमाणात हवाई वाहतूक होत असल्याने विमातळांवर कायम गर्दी असते. 

सौजन्य - थिंक चेंज इंडिया

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा

Our Partner Events

Hustle across India