उद्देशाच्या शोधात रिक्षांच्या चाकांवर धावणारी ‘नवीन’ स्वप्ने!

10th Jan 2016
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

स्वप्न आणि महत्वाकांक्षा जीवनातील असे औजार आहेत, ज्याच्या बळावर प्रत्येक जण आशेच्या नौकाविहारामध्ये स्वार होऊन पुढे जातो. जो कठीण प्रसंगात देखील स्वतःवर संतुलन ठेवतो, त्याचे लक्ष्य निश्चित असते. स्वप्न कधीही लहान नसते आणि त्याच स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी प्रत्येकजण खूप मेहनत करतो.

तुम्हाला आता अशा एका व्यक्तीची ओळख करून देत आहोत, जो दुस-यांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी धडपडत आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे ‘नवीन कृष्ण’. नविन, त्या हजारो रिक्षा चालविणा-या लोकांचे उद्देश आहे, ज्यांचे स्वप्न आहे की, त्यांचीदेखील एक स्वतःचा रिक्षा असावी. अशाच रिक्षा चालकांचे स्वप्न साकार करण्यासाठी नवीन यांनी एस एम वी व्हील्स (SMV Wheels) ची स्थापना केली.

वाराणसीत असलेला एस एम वी व्हील्स (SMV Wheels) एक सामाजिक उपक्रम आहे, जे सायकल रिक्षा चालविणा-या लोकांची मदत करतात. कंपनी सायकल रिक्षा विकण्याचे काम करते, जी स्थगित देय (deferred payment) या सुविधेवर रिक्षा चालकांना रिक्षा देऊ करते, ज्यामुळे ते सहजरित्या आठवड्याच्या टप्प्यात जवळपास एक वर्षात रिक्षेच्या किंमतीचा भरणा देतात. इतका कालावधी गेल्यानंतर नोंदणीकृत रिक्षाचे मालकीहक्क चालकांना मिळते. त्याव्यतिरिक्त नियमित आठवड्याच्या टप्प्यात पैसे भरल्यामुळे त्यांची चांगली पत बनते आणि नंतर कधी कर्जाची गरज पडल्यास त्यांना सहजरित्या कर्ज प्राप्त होते, ज्याची पुढे जाऊन त्यांना आर्थिक मदत होऊ शकते. त्याव्यतिरिक्त कंपनी रिक्षा चालकांचे जीवन विमा, अपंग विमा, रिक्षा चोरी विमा आणि अपघात विमा देखील बनवते. वाहन चालक परवाना आणि रिक्षा परवाना प्राप्त करण्यात देखील ते रिक्षा चालकांची मदत करतात.

image


एस एम वी व्हील्स (SMV Wheels) चे संस्थापक आणि व्यवस्थापक संचालक नवीन यांनी सामाजिक कार्य या विषयात बनारस हिंदू विद्यापीठातून पदवी घेतली आहे. या व्यवसायाला सुरु करण्यापूर्वी ते रिक्षा चालकांसाठी खूप जवळून सामाजिक कार्य करत असे. पहिले ते शहरातील विकास मंत्रालयाची वित्तीय सहायक शाखा CAPART साठी काम करायचे, जेथे त्यांनी ग्रामीण विकास केंद्रात आपल्या सेवा प्रदान केल्या आणि रिक्षा बँक परीयोजनेचे राष्ट्रीय संयोजक राहिले. त्यांनी त्रिपुरा, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये रिक्षा बँकेच्या विस्तारात आपले बहुमुल्य योगदान दिले आणि त्यांच्या अनेक शाखांचे उद्घाटन केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी आसाम मध्ये १२००रिक्षा चालकांना रिक्षाचे मालकीहक्क प्रदान केले, तसेच लखनौ, अलाहाबाद आणि वाराणसीत रिक्षा पूर्वयोजनेच्या विस्तारात महत्वाची भूमिका साकारली. रिक्षा बँक पूर्वयोजनेत सेवा देतानाच त्यांना स्वतः आपला स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. “मी पाहिले की, रिक्षा वितरणाचा व्यवसाय स्वतः मध्येच एक शाश्वत व्यवसाय बनू शकतो आणि स्वतः त्यांच्या मागणीची निर्मिती करण्यास सहायक बनू शकतो. स्वयंसेवी संस्थांप्रमाणे बाजारात नव्या रिक्षांचा भडिमार करून नव्हे तर, ही मागणी व्यवसायातूनच निर्माण होईल, जेव्हा वितरण प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्यात येईल आणि जेव्हा रिक्षा चालक स्वतः आपल्या रिक्षांचे मालक होतील आणि त्यांच्या आत्मसम्मानात वाढ होईल,” असे नवीन समजवून सांगतात.

एस एम वी व्हील्स ची स्थापना एप्रिल २०१०मध्ये झाली आणि त्यांनी आपली पहिली रिक्षा त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये विकली. रिक्षा चालक समुदायासाठी नविन यांची संवेदनशीलता आणि आपल्या व्यवसायावर असलेल्या नितांत विश्वासामुळे अनेक आंतरराष्ट्रीय भांडवल गुंतवणूकदार या पूर्वयोजनेच्या दिशेने आकर्षित झाले. वर्ष २०११मध्ये नवीन यांच्या नेतृत्वात एस एम वी व्हील्स ने संकल्प पुरस्कार आणि First Light Village Capital award जिंकले. त्यांचा व्यवसाय Unreasonable Institute च्या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात पोहोचला आणि ते परिवर्तनीय कर्ज रोखे म्हणून ३००,०००चे भांडवल जमविण्यात यशस्वी झाले. या भांडवलाचा उपयोग कंपनी- विस्तारात करण्यात आला आणि जौनपुरमध्ये त्यांची पहिली शाखा उघडण्यात आली. त्यांनी नुकतेच वितरण व्यवस्थेत आंतरिक सुधार करण्याच्या दिशेने पाउल वाढविले आहे, ज्यामुळे गुणवत्ता सुनिश्चित केली जाऊ शकेल आणि सोबतच अनावश्यक खर्चात कपात केली जाऊ शकेल.

नवीन यांच्या मते, गरिबांना रिक्षेची व्यवस्था करून देणे नवा विचार नाही, मात्र एस एम वी व्हील्स एक फायद्यासाठी सुरु करण्यात आलेली रिक्षा वितरण कंपनी आहे आणि हीच बाब गुंतवणूकदारांना स्वतःकडे आकर्षित करते आणि ते या पूर्वयोजनेत मोठ्या संख्येने भांडवल गुंतवणूक करण्यात मागे पुढे पाहत नाहीत. हा व्यवसाय शाश्वत आहे, आपल्या पायावर उभा आहे. कारण ते भांडवलाची पुन्हा पुन्हा पुनर्गुंतवणूक करतात आणि रिक्षाचालकांमध्ये अधिकाधिक आत्मविश्वास निर्माण करतात. ते आपल्या मेहनतीच्या कमाईचा उपयोग आपल्या नियमांवर स्वतःचा रिक्षा विकत घेताना बघतात आणि अशाप्रकारे दुस-यांच्या करुणेवर त्यांची निर्भरता संपते. “वास्तवात एस एम वी व्हील्स रिक्षा विकण्याचे नाही तर, रिक्षा चालकांसोबत आपल्या नात्याचा व्यवसाय करतात, ज्याचा एक अतिरिक्त फायदा हा आहे की, त्यांना आयुष्य व्यतीत करण्याच्या निमित्ताने मालमत्ता प्राप्त करण्यासाठी मदत मिळते आणि सोबतच विमा आणि कायदेशीररित्या रिक्षा चालविण्याचा सम्मान आणि निश्चिंतता देखील मिळते. नवीन सांगतात की, आमचे ग्राहक आपला व्यवसाय पूर्ण आत्मविश्वासाने आणि आत्मसम्मानाने चालवितात.

कंपनी आपल्या रिक्षाच्या वास्तविक किंमतीपेक्षा थोड्या अधिक मूल्यावर विकून फायदा करून घेतात. ते रिक्षाच्या मागे थोडी जागा जाहिरातीसाठी सोडतात आणि जाहिरातीच्या उत्पन्नाला रिक्षा चालकांसोबत सामायिक करतात. एस एम वी व्हील्स रिक्षांची खरेदी करतात, त्यांचा विमा आणि परवान्याचे निष्कलंक कामकाज आटपतात आणि याप्रकारे रिक्षाचा एकूण खर्च ११,५००रुपये येतो, ज्यात के वाय सी नियमांची तपासणी, रिक्षावाल्यांकडे कंपनी - कर्मचाऱ्यांचे साप्ताहिक दौरे आणि दुस-या भारसाधकात होणारे कार्य खर्च देखील सामील होतात. त्यानंतर ग्राहक म्हणजे रिक्षा चालक प्रत्येक आठवड्यात सहज टप्प्यात चुकवितात आणि जवळपास एक वर्षात त्यांना रिक्षाचे पूर्ण मालकीहक्क प्राप्त होते. सध्या बनारस आणि जौनपुर मध्ये एस एम वी व्हील्स चे १५कर्मचारी कार्यरत आहेत आणि झारखंड मध्ये एका शाखेसाठी अजून तीन कर्मचारी नियुक्त करण्याची त्यांची योजना आहे. जवळपास १२००एस एम वी व्हील्स रिक्षा आज रस्त्यांवर धावत आहेत, तसेच १५०रिक्षा चालकांना रिक्षांचे मालकीहक्क प्राप्त झाले आहेत. “आम्ही देशाच्या जवळपास एक कोटी रिक्षा चालकांपैकी कमीत कमी २०टक्के ग्राहकांना लाभ मिळावा म्हणून योजना आखत आहोत,” नवीन सांगतात की, या उपक्रमात नुकतेच उत्तर प्रदेश सरकार सोबत सौर रिक्षांचे अनावरण करण्याचा करार केला आहे आणि आतापर्यंत ५०रिक्षा चालकांना सौर रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुढील पाच वर्षात नवीन यांना स्वतःच्या रिक्षांची निर्मिती करायची आहे. जेणेकरून रिक्षांची वाढती मागणी सहजतेने पूर्ण करता येऊ शकेल.

आज एस एम वी व्हील्स एक यशस्वी व्यवसायाप्रमाणे काम करत आहे, सुरुवातीला हे इतके सोपे नव्हते. “एम एम वी व्हील्स चे सुरुवातीचे दिवस खूपच कठीण होते. वाराणसीच्या गुंतवणूकदारांशी संपर्क आणि त्यांना आपल्या पूर्वयोजनेकडे आकर्षित करणे खूपच मोठे आव्हान होते, कारण आम्ही दिल्ली किंवा मुंबई सारख्या एखाद्या मोठ्या शहरात काम करत नव्हतो. त्यामुळे मुंबई आणि दिल्ली मध्ये आम्ही कमीत कमी १०००वेळा गुंतवणूकदारांना संक्षिप्त माहिती द्यावी लागली आणि ५००पेक्षा अधिक पावर पॉइंट प्रेजेंटेशन्स द्यावे लागले,” आठवण करत नवीन सांगतात की, त्या दरम्यान त्यांना गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये प्रवास करावा लागला आणि ढाब्यावर जेवण खाऊन रहावे लागले. त्याव्यतिरिक्त कठीण सामाजिक आणि वैयक्तिक आव्हाने तर होतीच. मात्र आज त्या कठोर परिश्रमाला आठवत नवीन खूपच संतुष्ट आहेत. कारण व्यवसायच त्यांना यशस्वी करण्यात सक्षम राहिला नाही तर, त्याच्यामुळे रिक्षा चालकांच्या जीवनात परिवर्तन देखील आले.

लेखक : अजित हर्षे

अनुवाद : किशोर आपटे.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close
Report an issue
Authors

Related Tags

Our Partner Events

Hustle across India