क्रोधातूनही महिला करू शकतात "परिवर्तन" ? !

17th Dec 2015
 • +0
Share on
close
 • +0
Share on
close
Share on
close

आज भारतात एकीकडे ‘कालीका माता’ देवीची पूजा केली जाते तर दुसरीकडे महिलांच्या संदर्भात काही समस्यांची जाणीव झाली की मोठ्या प्रमाणावर उदासीनता दिसून येते. कालिका देवी ही एक हिंदू देवता आहे जिचे रूप हे अत्याचाराची संहारक म्हणून प्रसिद्ध आहे आणि जिला आदिशक्ती च्या रुपात पूजले जाते.

ही अशी देवता आहे जी भारतीय महिलांना आपल्या चौफेर पसरलेल्या अत्याचाराशी लढण्याची शक्ती देते असे मानले जाते. तिच्याच शक्तीने प्रेरित होऊन महिला परिवर्तनासाठी सशक्त बनतात व त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडथळ्यांना दूर करण्यास शक्तिशाली बनतात. तिच्याच शक्तीने प्रेरित दिग्दर्शक नलीन यांच्या ‘अँग्री वूमन गॉडेस’ या चित्रपटाच्या सात नायिका आपली भूमिका साकारत आहेत. या सात महिला चित्रपटात प्रश्न विचारण्याबरोबरच आपल्या आणि इतर महिलांच्या आयुष्यात डोकावून ते सुखकारक करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न करीत आहेत.


image


मित्रांवर आधारित या चित्रपटात अशा मित्रांचा समूह आहे की जो एकत्र येऊन आत्मचिंतन करण्याचा प्रयत्न करून एकमेकांच्या संगतीने जीवनात आनंद उपभोगत आहे. हे याचेच प्रतिक आहे की महिला एकत्रीकरणाची शक्ती अशी आहे जी फक्त स्वतःचाच नाही तर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीच्या विकासाची पण नांदी ठरू शकते.


image


‘अँग्री वूमन गॉडेस’ च्या सात देवी आई, बहिण, मित्र, प्रेमिका इ. च्या भूमिकेत आहेत. आम्ही यापैकी पाच देवींशी त्यांचे जीवन, भूमिका, एक महिला असणे आणि ज्या गोष्टी त्यांना खटकतात अशा विषयांवर विस्तृतपणे चर्चा केली. त्यातील काही आठवणींना उजाळा .....

संध्या मृदुल – ‘सु’सुरंजना

संध्या अभिनयाच्या क्षेत्रातली एक नामांकित नाव आहे त्याशिवाय बॉलीवूडच्या एक यशस्वी कलाकार आहेत. या चित्रपटात त्या एका ‘सु’ उर्फ सुरंजना ची भूमिका निभावीत आहेत जी एक नोकरदार महिला असून ६ वर्षाच्या मुलाची आई पण आहे आणि कौटुंबिक कलहाला सामोरी जात आहे. संध्या सांगतात की त्यांची भूमिका काम आणि संसार या मध्ये येणाऱ्या समस्या व अडचणीचा सामना कराव्या लागणाऱ्या महिलांविषयी आहे. ‘ मी आपल्या या भूमिकेतून काम आणि संसार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या माहितीनुसार काही महिला अशा आहेत की ज्यांना ही सल आहे की त्यांनी आपल्या मुलांच्या संगोपनासाठी आपली नोकरी सोडली नाही आणि अशा पण काही महिला आहेत ज्यांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या भविष्याला तिलांजली दिली आहे. ही एक मोठी तारेवरची कसरत असते’.


image


संध्या पुढे सांगतात की, " जबाबदारी आणि शक्ती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्या महिला कणखर असतात त्यांच्यात आपली शक्ती दाखवण्याची क्षमता असते. त्यांच्या म्हणण्यानुसार महिलांचे शोषण आणि विशेषकरून मानसिक शोषण हा विषय महत्वाचा आहे, याचा अंदाज लावणे आणि ओळखणे कठीण असते म्हणूनच त्या याविषयी जागृती करू इच्छिता ".

त्या आग्रहाने सांगतात की, "अँग्री वूमन गॉडेस’ हा पुरुषसंस्कृतीवर आक्षेप घेत नाही तर तो महिला आणि त्यांच्यासमोर असलेल्या अडचणींविषयी आहे. महिलांनो आपला आवाज बंद करू नका. स्वतःविषयी मनात असलेला न्यूनगंड काढून टाका, आपले मन मारून दुसऱ्यांना खुश करू नका. स्वच्छंदी जीवन जगा, आपल्या मनाला वाटेल ते खा, आवडीचे कपडे घाला आणि आपले जीवन आपल्या मनाप्रमाने जगण्याचा आनंद उपभोगा.


image


देवीविषयी त्या सांगतात की, या चित्रपटातील देवी नाराज आहे, तिच्या नाराज होण्याची बरीच कारणे आहेत. ती अतिशय जबाबदारीने येते आणि अनेक अशा गोष्टींची जाणीव करून देते की आजपर्यंत ज्याची कधी वाच्यता झाली नाही’.

अनुष्का मनचंदा – ‘मॅड’ मधुरिता

अनुष्का पशुकल्याणासाठी काम करणाऱ्या अनेक एनजीओ बरोबर काम करणाऱ्या पशुप्रेमी आहे. त्या फक्त सुसज्ज अशा महिला विवा ब्रान्डच्या सदस्यच नाही तर त्यांनी आपल्या मधुर आवाजात अनेक बॉलीवूडच्या गाणाऱ्या गायिकेच्या रुपात आपली ओळख निर्माण केली आहे. त्या म्हणतात की, "मी भाग्यशाली आहे की माझा जन्म व पालनपोषण एका अशा कुटुंबात जन्म झाला जिथे व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळाले आणि हेच स्वातंत्र्य मला एक सक्षम महिलेच्या रुपात ताकद देते".

त्यांचे म्हणणे आहे की महिला सबलीकरणासाठी शिक्षण फार महत्वाचे आहे. जर महिला शिक्षित असली तर ती मोठे ध्येय गाठू शकते. आपल्या चित्रपटातील एक संभाषणाचा संदर्भ ती सांगते की, "महिला एकमेकींच्या पाठीशी उभ्या राहत नाही हे मोठे दुर्भाग्य आहे. हे एक असे सत्य आहे जे बदलण्याची गरज आहे".


image


व्यक्तीशः अनुष्का व्यवहारकौशल्य, धीरोदत्त आणि सकारात्मक अशा प्रकारच्या वृत्तीच्या नाही. या चित्रपटात मात्र अगदी उलटे आहे की ज्यात ती वादविवाद आणि लढाई या सारख्या गोष्टींसाठी लगेच तयार असणाऱ्या आक्रमक भूमिकेत आहे. स्मितहास्य करत त्या सांगतात की, "‘मॅड’ मधुरिता हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदीच उलट असल्यामुळे ते निभावणे अतिशय कठीण होते. ‘मॅड’ ही नेहमी नकारात्मक विचारांमध्ये गुरफटलेली असते पण मी मात्र नेहमी सकारात्मक असते".


image


देवी नाराज होण्याचे कारण सांगतांना त्या म्हणतात की, "आमच्या देशात महिलांची कशी उपेक्षा केली जाते आणि त्यांच्याप्रती आम्ही किती निष्ठुर आहोत हे बघण्यासारखे आहे. यात बदल घडविण्यासाठी आम्हाला स्वतः जाणीव करून घेऊन मोठ्या जोमाने काम केले पाहिजे. याचमुळे देवी नाराज आहे याशिवाय दुसरा मार्गच नाही’.

पावलीन गुजराल- पॅम उर्फ पामेला जयस्वाल

पावलीन ह्या एक निवेदक, अभिनेत्री आहेत व त्या स्वतःला ‘आजच्या जमान्यातली महिला समजतात. मी स्वच्छंदी जीवन जगते.त्यांनी निवडलेल्या पर्यायामुळे आज सन्मानास पात्र आहेत.’

त्यांनी स्वप्नातसुद्धा कधी असा विचार केला नव्हता की कॉम्पुटर इंजिनियरिंग आणि कायदा यांचा अभ्यास केल्यानंतर त्या अभिनयाच्या क्षेत्रात येतील. या चित्रपटात त्या दिल्लीच्या पामेला जयस्वाल नावाच्या एका घरंदाज मुलीची भूमिका निभावीत आहेत.


image


पावलीन म्हणतात की, " महिला एकत्र असतील तर त्या पण मुलांसारखी मजा करू शकतात. महिला एकत्र असतात तेव्हा त्यांच्यात एक नवीन जग निर्माण करण्याची क्षमता असते आणि त्या आपल्या मनाचे न ऐकता बुद्धीचा वापर करतात ".

देवी नाराज होण्याचे त्या कारण सांगता की,’ जेव्हा महिलांनी खूप काही भोगून झाले असते तेव्हा त्याच्या रागाचा तो परमोच्च बिंदू असतो’.

राजश्री देशपांडे – लक्ष्मी

राजश्री जाहिरात, चित्रपट, व टीव्ही या क्षेत्रात काम करतात आणि म्हणता की, ‘मी एक शक्तीशाली महिला आहे. मी एक लढवय्यी असून भावनाविवश पण आहे’.

या चित्रपटाबाबत बोलतांना त्या सांगतात की, "या चित्रपटात सगळी पात्र अतिशय वास्तविक आहेत. तो बघितल्यावर तुम्हाला आपल्या आसपासच्या परिस्थितीशी मेळ खाणारा असल्याची जाणीव होईल. या चित्रपटाद्वारे आम्ही समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करतो आहे. आमची इच्छा आहे की महिलांनी त्यांची ताकद ओळखावी आणि आपल्या सबलीकरणासाठी पुढे यावे’.

महिलांसाठी त्या एकच संदेश देऊ इच्छिता की, "आपल्या स्वतःला ओळखा".

सारा- जेन दयास –फ्रिडा

सारा पूर्वाश्रमीची व्ही वाहिनीच्या व्हीजे असून सन २००७ मध्ये मिस इंडिया पण होत्या. त्या सांगतात की,’ फ्रिडा आणि मी अगदीच सारख्या असूनही दूर आहोत. माझ्यासाठी यात समानता आणि भिन्नता शोधण्यातच अधिक रस होता’.

फिल्मी दुनिया आणि वास्तविक जीवन यांच्या समानतेविषयी बोलतांना त्या म्हणतात की, "जोपर्यंत आम्हाला डिवचले जात नाही तोपर्यंत आम्ही दोघी अतिशय शांत आणि प्रेमळ आहोत व दोघीसुद्धा अतिशय भावनाविवश आहोत".

सारा यांना एक गोष्ट प्रकर्षाने करण्याची इच्छा आहे की महिलांना आत्मसंरक्षण व मनशक्ती अनिवार्य आहे आणि महिला या शारीरिक दृष्ट्या सबळ झाल्या पाहिजे.

‘अँग्री वूमन गॉडेस’ महिलांपर्यंत पोहचण्याचा आणि त्यांना बोलण्याचा अधिकार प्राप्त होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकत आहे.

महिलांसाठी स्वतःच्या सबलीकरणाची व आवाज उठवण्याची हीच वेळ आहे. महिलांनो बरोबर आहे की नाही? या आपण सगळ्या मिळून आपल्या आत लपलेल्या भयाला (न्यूनगंड) बाहेर काढूयात. 

लेखिकाः तन्वी दुबे

अनुवाद : किरण ठाकरे

 • +0
Share on
close
 • +0
Share on
close
Share on
close
Report an issue
Authors

Related Tags

  Latest

  Updates from around the world

  Our Partner Events

  Hustle across India