संपादने
Marathi

भविष्यातील मोठी क्रांती? सर्वांना मोफत आणि सहजसाध्य शिक्षणासाठी रतन टाटांचे खान अकादमीसोबत योगदान!

Team YS Marathi
10th Dec 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

एक आदर्शवत ना-नफा संस्था ‘खान अकादमी’ने तेवढ्याच आदर्शवत असलेल्या ‘टाटा ट्रस्ट’ सोबत ऑनलाइनच्या माध्यमातून सहजपणाने देशातील माहिती उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. या करोडोंच्या सहकारिता करारातून केवळ भारतातील शिक्षकांसाठीच नव्हेतर ऑनलाइन मजकूरासाठी देखील सहकार्य केले जाणार आहे. प्राधान्याने एनसीईआरटीच्या पुस्तकांवर आधारीत हा उपक्रम असेल.

image


‘युवर स्टोरी’ याकडे मुलभूत क्रांतीकारी बदल म्हणून पाहते, जी शिक्षणाच्या क्षेत्रात दर्जेदार शिक्षणासाठी संघर्षरत असलेल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, शाळांना, मजकूर तयार करणा-यांना, आणि शिक्षणाधारित तंत्रज्ञानातील उभरत्या उद्योगांना देशात नवा मार्ग देईल. त्यासोबतच त्यातून देशातील हजारोकोटींच्या शिक्षणक्षेत्राला पारदर्शकता आणि सहजसोपेपणाही प्राप्त करून देणार आहे. खान अकादमीचे संस्थापक सलमान खान म्हणाले की, ते खुलेपणाने शिक्षण-तंत्रज्ञान क्षेत्रातील उभरत्या उद्योगांसोबत काम करण्यास तयार आहेत. ज्यातून संघटनेला देशातील मुक्त, जागतिकदर्जाच्या सर्वांसाठी कुठेही देता येणा-या शिक्षणाबाबत जाणिव-जागृती करता येईल.

यात महत्वाचे म्हणजे हा मजकूर ऑनलाईन आणि ऑफलाईन असा दोन्ही प्रकारात उपलब्ध असेल, आणि कमी खर्चिक उपकरणांसोबत. खान अकादमीने यासाठीचा पथदर्शीप्रकल्प अनेक शाळातून राबविण्यास सुरुवात केली असून त्यातून शिक्षकांनाही त्यांच्या गुणवत्तांचा विकास करण्याची संधी मिळणार आहे. यातून त्यांनाही प्रोत्साहन मिळणार आहे, ज्यांना या क्षेत्रातील करोडोंवर प्रभाव टाकणा-या क्षेत्रात काम करायचे आहे. भारतात शिक्षणाच्या उपलब्धतेच्या प्रश्नावर, केवळ दर्जेदार शिक्षणाच्या प्रश्नावर अजूनही संभ्रमाची स्थिती आहे. खान अकादमीच्या शिकवणीत शिक्षकांना बदलण्याऐवजी केवळ त्यांना विद्यार्थ्यांना मुक्तपणाने अतिरिक्त मार्गदर्शन करण्याची मुभा आहे.

टाटा यांनी खान यांचे वर्णन करताना म्हटले आहे की, "अनोख्यारीतीने प्रोत्साहित करणारा’; ज्या पध्दतीने त्यांचे उद्दिष्ट केवळ निरक्षरांना साक्षर करून जग बदलण्याचे नसून कुणालाही, कुठेही ज्ञानाची कवाडे खुली करण्याचे आहे. असे आदर्शवत ज्यातून १०९कोटींच्या टाटा ट्रस्टला व्यापकपणे सर्वदूर पोहोचता येणार आहे.

या भुतलावरील आणि भारताचा नागरीक म्हणून हा खूप मोठा सन्मान मिळाला आहे की, हा उभरता उद्यम मी सहकार्यातून सुरू करतो आहे. याकडे मी उगवत्या पिढीसाठी जगण्याचा नवा दृष्टिकोन म्हणून पहातो, असे रतन टाटा म्हणाले.

ज्यांना खान यांच्याबाबत माहिती नाही त्यांच्यासाठी, ते ‘एमआयटी’ आणि ‘हॉवर्ड’मधील पदवीप्राप्त ‘हेजफंड’ विश्लेषक आहेत. ज्यांनी अकादमीची स्थापना केली ती पुतण्याला मदत करण्यासाठी, आणि अश्या अनंत पुतण्यांच्या मदतीसाठी, ज्यांना मदत हवी आहे. जे सारे त्यांनी इंटरनेटवर उपलब्ध केले आहेत. सुरुवातीलाच त्यांना केवळ अमेरिकेतूनच नाहीतर जगभरातून पत्रांव्दारे प्रतिसाद मिळू लागला की, कसे त्यांना या शिकवणीतून भुमितीचा अभ्यास करता येईल, किंवा महाविद्यालयातील त्यांच्या मुलांना मदत करता येईल. “ यातून हेच अधोरेखित झाले की यामध्ये खोलवर आणि व्यापक गरज आहे ती अशाप्रकारचा मजकूर देण्याची. खान म्हणाले की, “ यातून आम्हाला हे जाणवले की जगात लोकांना त्यांच्यातील क्षमतांचा विकास करण्याची किती भूक आहे?”

अखेरीस, खान अकादमीकडे सुमारे२७०० पाहण्याजोगे दहा मिनिटांचे व्हिडिओ आहेत, ज्यात सारे विषय जसे की, गणित, विज्ञान, संगणक विज्ञान इतकेच नाहीतर मानव विज्ञानाचे विषय आणि परिक्षेची तयारी. सुरुवातीला खान अकादमीने प्रामुख्याने इंग्रजीतून धडे देण्यावर प्रामुख्याने भर दिला होता. “ परंतू तुम्ही पाहू शकता की हा विषय खोलवर प्रभाव पाडणारा आणि मोठ्या जनसंख्येच्या क्षमतांचा विकास करण्याबाबत अत्यंत गरजेचा होता, या यादीत भारताचा क्रमांक अर्थातच वरचा होता. माझ्या कुटूंबाची पाळेमुळे इथली आहेत आणि आमच्यासाठी तो भावनिक विषय आहे.” खान म्हणाले. खान अकादमीच्या हिंदी पोर्टल बाबत बोलताना, जे काही दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे; “ हा हिमनगाचा छोटासा तुकडा आहे, येत्या चार-पाच वर्षांत आणि येत्या दशकांत आम्ही भारतीय संस्था होऊ इच्छितो”. ते म्हणाले.

पहिल्या टप्प्यात, भागीदारीचा भर शैक्षणिक स्त्रोतांच्या विकासावर असेल, त्यातून शहरी भागातील कमी आणि मध्यम उत्पन्नगटाच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल, दुस-या टप्प्यात विविध भारतीय भाषांतील विस्तारावर भर दिला जाईल. ‘टाटा ट्रस्ट’ सोबतच्या भागीदारीतून अपेक्षित आहे की, भारतीय विद्यार्थ्यांना प्रथम सबटायटलच्या माध्यमातून आणि मूळ मजकूरासह भारतीय भाषांतून, माहिती देण्याचा प्रयत्न असेल आणि कदाचित हा प्रयत्न भारतातील आणखी ‘सलमान’ शोधण्यासाठी असेल.

खान यांचे स्वप्न आहे की, भारतातील प्रत्येक शिकणा-याला त्याच्यातील क्षमतांचा पुरेपूर विकास करता यावा आणि त्यांच्या भाषेतूनच शिक्षण घेताना हा विकास साध्य झाला तर ते त्यांच्यासाठी अधिक उपयुक्त असेल. यासाठी त्यांना मदत करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांना हे सारे काही संगणक आणि कमी किंमतीच्या फोनव्दारे देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल यासाठी अकादमी प्रयत्न करते आहे.

“जेंव्हा मी यासाठीचे ‘मिशन स्टेटमेंट’ तयार केले, ज्यात कुणासाठीही, कुठेही जागतिक दर्जाच्या मोफत शिक्षणाबाबत उल्लेख होता; ते थोडेसे अविश्वसनीय वाटले. पण तीस हजार वापरकर्त्यांसह आम्ही यश मिळवले आहे आणि आता ते अविश्वनीय कमी आणि यथायोग्य जास्त वाटते आहे. आम्हाला टाटांसारखे सहभागीदार शोधूनही सापडला नसता,” असे खान यांनी सांगितले.

खान आणि टाटा यांची भेट दोघांच्या समान मित्रांद्वारे झाली, चर्चा सुरू झाली की, समाजाला मुक्त आणि सहजसाध्य शिक्षणासाठी काय करता येईल. त्यातूनच आजच्या या सहकार्याच्या संकल्पनेचा उदय झाला.

वायएस टेक

खान अकादमीने जगभरात आपला असा प्रभाव दाखवल्यानंतर हे सांगण्याची गरजच नाही की ती किती सर्वज्ञात आहे, हे तर स्वयंस्पष्ट आहे की, ती स्वयंसिध्द आदर्शवत संस्था आहे. नफ्यासाठी नव्हे, जेंव्हा तुम्ही प्रभावासाठी काम करता जो खोलवर आणि व्यापक असतो, ज्याद्वारे तंत्रज्ञानाधारित करोडोंच्या हिताचे कार्य जन्माला येत असते.

हा काही दुर्लक्ष करण्याचा विषय नाही, तर त्यातून निर्माण झालेल्या प्रभावक्षेत्राबाबतचा मुद्दा आहे. एकदा प्रभाव निर्माण झाला की,दानकर्ते तुमच्यासाठी पुन्हा पुन्हा येत राहतात. ज्यावेळी सहभागिता कराराकडे महसूल आणि नफ्यासाठीच पाहिले जाते (आणि त्यात चुकीचे असे काहीच नाही) या मिशनला वेगवेगळ्या प्रकाराने अनेक अपेक्षांनी पाहिले जाते, ज्यातून जोखीम पत्करत उद्दीष्टांचा वेध घ्यावा लागतो.

लेखिका: श्रध्दा शर्मा, युवर स्टोरी, संस्थापिका आणि मुख्य संपादिका

अनुवाद : किशोर आपटे.


(सूचना: रतन टाटा हे योर स्टोरीमधील एक गुंतवणूकदार आहेत.)

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags