भारत पाक सीमेवर बीएसएफ मध्ये देशाच्या सीमांचे रक्षण करणा-या पहिला महिला कमांडंट तनुश्री!

भारत पाक सीमेवर बीएसएफ मध्ये देशाच्या सीमांचे रक्षण करणा-या पहिला महिला कमांडंट तनुश्री!

Friday August 25, 2017,

2 min Read

राजस्थानच्या भारत पाक सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी तैनात सीमासुरक्षा दलाच्या पहिल्या महिला सह कमांडंट तनुश्री पारीक यांनी चाळीस वर्षांच्या सीमा सुरक्षा दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कमांडंट होण्याचा सन्मान मिळवला आहे. त्या सध्या पाकिस्तानला लागून असलेल्या बाडमेर जिल्ह्यात आपल्या कर्तव्यावर तैनात आहेत.


तनुश्री पारीक (फोटो साभार: सोशल मीडिया)

तनुश्री पारीक (फोटो साभार: सोशल मीडिया)


आपल्या कर्तव्यावर असतानाच त्या कॅमल सफारीच्या माध्यमातून आणि वायूसेनाच्या महिला जवांनासोबत महिला सक्षमीकरणाचा 'बेटी बचाओ बेटी पढावो'चा संदेश देत आहेत.

देशात महिलांनी पुरूषांच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना आव्हान देत वर्चस्व सिध्द केले आहे. राजस्थानच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलात सह कमांडंट म्हणून कार्यरत झालेल्या पहिला महिला तनुश्री या देखील त्यापैकीच एक आहेत. या दलाच्या ४० वर्षाच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला आधिकारी आहेत. सध्या त्या पाकिस्तानच्या सीमेलगत बाडमेर जिल्ह्यात तैनात आहेत.


आई मंजू देवी आणि वडील शिव प्रसाद जोशी समवेत तनुश्री

आई मंजू देवी आणि वडील शिव प्रसाद जोशी समवेत तनुश्री


तनुश्री या २०१४च्या तुकडीतील अधिकारी आहेत. २०१४ मध्ये त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या युपीएसी परिक्षेत प्राविण्य मिळवले त्यानंतर त्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या टेकनपुर येथे पासींग परेड मध्ये देशातील पहिली महिला अधिकारी म्हणून भाग घेतला आणि ६७ अधिका-यांच्या पासींग परेडचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी बीएसएफच्या अकादमीमध्ये ४० तुकडीत ५२आठवड्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना पंजाब मध्ये भारत पाक सीमेवर तैनात करण्यात आले. 


image


ज्या बाडमेरमध्ये तनुश्री आज तैनात आहेत तेथे कधी काळी त्यांचे वडील कर्तव्यावर होते, ज्यावेळी बिकानेरला बॉर्डर सिनेमाचे चित्रीकरण झाले त्यावेळी त्या शाळकरी मुलगी होत्या.

आता तनुश्री पंजाब फ्रंटीयरमध्ये तैनात आहेत. त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी नोकरी करण्यासाठी नाही तर आवड म्हणून बीएसएफची निवड केली आहे कारण लहानपणापासून त्यांना सैन्यदलाची आवड होती. ज्या बाडमेर मध्ये त्या आज तैनात आहेत तेथे त्यांचे वडील काम करत होते. ज्यावेळी बॉर्डर सिनेमाचे चित्रीकरण बिकानेर मध्ये झाले त्यावेळी त्या शाळेत जात होत्या त्याच चित्रीकरणाने त्यांना सैन्य दलात जाण्याची प्रेरणा दिली. शाळेत त्या एनसीसी कॅडेट होत्या. तनुश्री म्हणतात की, “ माझे सैन्य दलात जाणे त्याचवेळी योग्य ठरेल ज्यावेळी माझ्यापासून प्रेरणा घेत अन्य मुली अनुकरण करतील.” त्या म्हणाल्या की मुलींनी उन्हापासून बचाव करणारे सनस्क्रीन लोशन लावणे बंद करावे, उन्हात तापून त्यांनी स्वत:ला सिध्द करावे. त्यांना आपण देशाच्या पहिल्या महिला कॉम्बेट अधिकारी असल्याचा प्रचंड अभिमान आहे.

तनुश्री सध्या कॅमल सफारी देखील करत आहेत, ज्यातून सीमांत भागात सामान्य लोकांशी ओळख करून घेण्यात आणि सांस्कृतिक कार्यक्रमातुन बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देखील देतात. ही कॅमल सफारी १३६८ किमीचे अंतर पार करत ४९ दिवसांत वाघा सीमारेषेजवळ पोहोचेल. या सफारी मध्ये त्यांच्या सोबत वायूदलाच्या महिला अधिकारी अयुष्का थॉमस देखील आहेत. त्या म्हणतात की जर आई वडील मुलींना शिक्षणासोबतच सक्षम करून स्वत:च्या पायावर उभ्या करतील तर त्या कुणावरही अवलंबून राहणार नाहीत.

लेखक :मन्मेष कुमार

    Share on
    close