दीपा पोत्तंगडी : इंग्रजी साहित्याची पदवीधर ते इन्स्ट्रक्शनल डिझायनर
दीपा पोत्तंगडी ही अशा महिलेची कथा जिच्या कामाची पद्धत आणि जिद्द तुम्हाला अपार प्रेरणा देवून जाते.
तुमचा भविष्यावर विश्वास आहे का ? तुमचं मत राखून ठेवा कदाचित ही गोष्ट वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या मताचा फेरविचार करावासा वाटेल.
आपल्या सगळ्यांच्याच वर्गात असा एक विद्यार्थी असतोच असतो जो नेहमी वर्गात बसतो, जास्तीत जास्त प्रश्न विचारतो आणि शेवटी स्वतःचा एखादा मुर्खपणा दाखवून देतो. होय हे सर्व गुण म्हणजे दीपा पोत्तंगडी. फक्त वर्गाची जागा परिषदांनी घेतलीय, आणि स्वतःला बनवण्याऐवजी ती कदाचित तुम्हाला बनवेल. ती आता बंगळूरूच्या य़ुकॅलिप्टस सिस्टम या कंपनीत इन्स्ट्रक्शनल डिझायनर म्हणून काम करतेय.
संगणक आणि तंत्रज्ञान दीपाच्या आयुष्यात सहजपणे अवतीर्ण झाले. मात्र, इंग्रजी साहित्यातील पदवी घेतल्यानंतरच. तंत्रज्ञानाच्या प्रेमाशिवाय ही दीपाच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर सांगता येण्यासारखे आहे.
भविष्यात काय ?
दीपानं तिच्या उच्च माध्यमिक परिक्षेत फारशी चांगली कामगिरी केली नव्हती, त्यामुळं धास्तावलेल्या तिच्या पालकांनी तिला ज्योतिषाकडे नेले. ती संगणक क्षेत्रात आणि उच्च शिक्षणात चांगली कामगिरी करणार असल्याचं ज्योतिषानं सांगितलं. पण यामुळं संतापलेल्या दीपानं बोलपूरच्या शांतिनिकेतन विद्यापीठातून इंग्रजी साहित्याच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. ती आठवणींना उजाळा देत सांगते, “ मी माझ्या विद्यापीठाचं अनेक ठिकाणी प्रतिनिधीत्व केलं. त्यामुळं महाविद्यालयातून बाहेर पडताना मला आत्मविश्वास मिळवून देण्यात याची खूपच मदत झाली." पण पदवीनंतर बेरोजगार होण्याची पाळी तिच्यावर आली. काम मिळवून देणारा एखादा कोर्स करावा असं तिला वाटत होतं, त्यासाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणं तिनंही एनआयआयटीचा रस्ता धरला. तिनं आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेवून प्रवेश घेतला.
तंत्रज्ञानाशी थेट संपर्क
एनआयआयटीत घेतलेला प्रवेश हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय नाही, तर एक अपघात होता. एनआयआयटीत दीपानं तीन वर्षांच्या जीएनआयआयटी या कोर्सला प्रवेश घेतला आणि तिची २००० साली प्रोग्रॅमिंग लॅन्ग्वेजेसशी ओळख झाली. मग ती या कामाच्या प्रेमात इतकी पडली की तीला संगणक वर्गातून बाहेर खेचून आणावं लागायचं. त्यानंतर तिला एनआयआयटीत प्रशिक्षक म्हणून तिच्या कालिकत या शहरात शिकवण्याची संधी मिळाली, मग तीची बंगळूरूला बदली झाली.
दीपाला ख-या अर्थानं मोठी संधी मिळाली ती ओरॅकल या कंपनीत इन्स्ट्रक्शनल डिझायन या विषयाची प्रशिक्षक म्हणून. तिची कामावरील निष्ठा आणि सातत्यानं केलेले नविन प्रयोग तिला व्हीएमवेअर क्लाऊड टेक्नॉलॉजी या कंपनीत आणि त्यानंतर युकॅलिप्टस् सिस्टम्स या कपंनीत घेऊन गेले. सध्या ती तिथे नविन अभ्यासक्रम तयार करणा-या पथकाची सल्लागार म्हणून काम करतेय. ती या पथकाचा जणू कणाच... ती नविन अभ्यासक्रम डिझाईन करण्याबरोबरच प्रोडक्ट विकासक आणि प्रकल्प व्यवस्थापक म्हणूनही दस्तावेजांचं काम पहाते.
ती सांगते की,
“ नविन कोर्स तयार करताना मी अधिकाधिक नविन पद्धतींचा अवलंब करण्याचा प्रयत्न करते. ज्यात ब्लूमची थेअरी, अन्ड्राग़ॉगी अध्यापन पद्दती, तसंच शिकवण्याच्या अन्य पद्धती यांचा समावेश आहे. युकॅलिप्टसच्या तंत्रविषय अभ्यासक्रमांबाबत काम करताना इथल्या तंत्रज्ञांचीही मदत होतेय. त्याचसोबत मी युकॅलिप्टसच्या एलएमएसच्या कामातही स्वतःला झोकून दिले आहे, ज्याची देखभाल आणि व्यवस्थापन मी पाहते आहे.”
दीपा गेल्या दशकात विविध गोष्टींमध्ये व्यग्र असल्यानं तिला एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे शक्य होत नाहीये. ती म्हणते, “ मी कोणत्याही एका विशिष्ट तंत्रज्ञानाशी लग्न केलेलं नाही, पण मी नेहमी संगणकाशी खेळत असते. नवनविन तंत्रज्ञान स्वीकारण्याचा प्रयत्न करीत असते.”
तुमची ओळख ही तुमची ताकद बनते.
सर्वार्थानं विचार केला तर दीपा ही कशालाही न घाबरणारी मुलगी आहे आणि तिच्या य़शाचं हेच गमक असावं. ती जमशेदपूर इथं जन्माला आली आणि वाढली... पण शाळेच्या सुरूवातीच्या दिवसांत तीला दक्षिण भारतीय म्हणून समजलं जायचं. ती जेव्हा केरळला गेली तेव्हा तिला उत्तर भारतीय म्हणून समजलं जायचं आणि त्याच पद्धतीचं वातावरण तिच्या आजुबाजुला असायचं. तिच्यावर वडिलांचा खूप मोठा प्रभाव होता. त्यांनी मिळवलेलं यश हे तिच्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं. टिस्को कंपनीत काम करणारे ते एक अत्यंत मेहनती कामगार होते. कनिष्ठ मध्यमवर्गीय असूनही त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचं (दीपा आणि तिचा भाऊ) पालनपोषण खूप चांगल्या पद्धतीनं केलं होतं आणि त्यांच्यावर चांगले संस्कारही केले होते. तिच्यावर केलेले काही संस्कार तिच्या मनात आजही ताजे आहेत आणि तिनं ते जपून ठेवले आहेत.
प्रामाणिकता – या गुणाचा मला फायदा झालाय आणि तोटाही. पण माझ्याकडे येणा-या प्रत्येकाला याची खात्री असते की मी त्यांना योग्यच सांगेन.
स्पष्टवक्तेपणा – काळाच्या ओघात माझ्या हे लक्षात आलं की तुम्हाला मग्रुर न होताही चांगले वागता येऊ शकते.
मेहनत – मी माझ्या वडिलांना खूप कष्ट घेताना पाहिलंय आणि त्यांचा माझ्यावर खूपच प्रभाव आहे.
नाती जपणं – मी नात्यांच्या बाबतीत अत्यंत चोखंदळ आहे. माझे मित्र हे माझे भाट नाहीत. त्यामुळं मी एखादी गोष्ट चुकत असेल तर ते मला बिनदिक्कत सांगतात आणि दुरूस्त करतात.
दीपाला अन्य कुणासारखं व्हायचं नाहीये, पण जे आर.डी. टाटा, तिचे वडील, जेफ बेझॉस आणि शेरिल सॅन्डबर्ग ही तिची प्रेरणास्थानं आहेत. ती म्हणते, "लोक सद्वर्तनाबद्दल बोलत असतात. पण ते काय असते हे मी जमशेदपूरला असताना पाहिलंय. जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्या कंपनीत एक संस्कृती तयार केली होती. लोकांना त्यांच्या पदाचा आणि कामाचा सन्मान मिळत होता. त्यांनी झारखंड इथं अकादमी सुरू करून ऑलिम्पिकसाठी नेमबाजीच्या पथकाला सरावाची संधी दिली. एडब्ल्यूएस क्लाऊडच्या माध्यमातून जेफ बेझॉस यांनी उद्योग जगतातील लोकांसाठी परवडणारे पर्याय उपलब्ध केल्यामुळं मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला...
दीपानं एक महिला म्हणून स्वतःला कधीच अबला समजलं नाही, त्याचं कारण म्हणजे तिच्या पालकांना तिच्याकडून असलेल्या अपेक्षा. तिनं नेहमी चांगलं काम करावं आणि मेहनत करावी, असं त्यांना वाटतं. अजूनही या क्षेत्रात फार कमी महिला आहेत, पण तरीही दीपाचं वेगळेपण काय आहे; तर ते असं आहे...
तिच्या आवडीच्या अनेक प्रशिक्षण शिबिरांना ती हजेरी लावते.
प्रत्येक संधीचं सोनं करते.
तिच्या कामाआड कधीही घरच्यांची अथवा परंपरेची कारणं येऊ देत नाही.
परिषदा आणि बैठकांसाठी खूप प्रवास आणि मेहनत करून ती उपस्थित राहते.
दीपाला प्रत्येक गोष्ट परिपुर्ण करण्याची सवय आहे, पण लग्नानंतर ते कठिण होतंय. ती म्हणते, “ आता मी चांगलं जेवण बनवू शकले नाही, तरी मला त्याचं फारसं वाईट वाटत नाही. याआधी मला मी जे काही करीन ते चांगलंच असलं पाहिजे असं वाटायचं. पण आता मी मला हवं तेच आणि मला आवडेल तेच करते."
वाडःमयाचं काय झालं ?
जेव्हा दीपा कथा वाचत असते तेव्हा तिचं साहित्यावरचं प्रेम उफाळून येतं. अन्यथा ती तिचा मोकळा वेळ हा स्वयंपाकात (मांसाहारात ती शाकाहारी असली तरी), तंदुरूस्त राहण्यात आणि चित्रकलेत व्यतीत करते. तिला शेरील सॅन्डबर्ग यांचं लिन इन हे पुस्तक वाचायला खूप आवडतं आणि तरूणांनीही ते वाचावं असं तिचं मत आहे. ती म्हणते " हे पुस्तक महिला स्वतःला कंसं मागं खेचतात हे सांगते. महिलांनी केवळ कामामध्येच नव्हे तर नवनविन क्षेत्र पादाक्रांत करावीत, नविन कौशल्य आत्मसात करावीत. तंत्रज्ञान शिकून घ्यावं, यामुळंच त्यांचा विकास होऊ शकतो.”
पाककला, चित्रकला, हस्तकला अवगत असणाऱ्या घरगुती कलावंत महिलांसाठी काहीतरी करण्याची दीपाची इच्छा आहे. वयाच्या ४० च्या, ५० च्या आणि साठीतील महिलांकडे याबाबतचा खूप अनुभव असतो, पण त्याचं व्यावसायिकरण त्यांना करता येत नाही. अशा महिलांना त्यांचं कसब दाखवण्यासाठी, ग्राहकांशी जोडण्यासाठी एक व्यासपीठ देण्याची तिची इच्छा आहे. वानगीदाखल म्हणायचे तर तीनं तिच्या मैत्रीणीच्या आईच्या चित्रांसाठी एक वेबसाईट तयार केलीय. ती म्हणते, “ यासाठी कोणाकडून काही शुल्क घेण्याची आपली इच्छा नाही. जास्तीत जास्त महिलांच्या कल्पनांना वाव मिळायला पाहिजे, हीच माझी महत्त्वाकांक्षा असल्याचं ती सांगते.”