भारतातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन योजनेचा युनायटेड नेशन्सने केला गौरव

By Team YS Marathi|1st Jun 2017
Clap Icon0 claps
 • +0
  Clap Icon
Share on
close
Clap Icon0 claps
 • +0
  Clap Icon
Share on
close
Share on
close

भारत हा केवळ आणि एकमेव देश ठरला आहे, ज्याने राष्ट्रीय धोरण आणि स्थानिक नियोजन यातून नैसर्गिक आपत्तीमध्ये कमीत कमी हानी व्हावी असा प्रयत्न केला आहे. जागतिक नियोजनासह, अशा दुर्घटनांमध्ये कमीतकमी हानी व्हावी, यासाठी केलेल्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्रांनी दखल घेतली आहे आणि गौरव केला आहे.


image


या साठीचा जो आराखडा सादर करण्यात आला होता, तो नुकत्याच झालेल्या यूएन २०१७डिझास्टर रिक्स रिडक्शन (UNISDR) जे कॅनन मेस्किको येथे संपन्न झाले तेथे आपल्या देशाला प्रकाशझोतात आणले. याबाबतच्या वृत्तानुसार, ही सर्वात मोठी ठळक गोष्ट होती जी यूएन प्रवक्त्यांनी इतर देशानाही अनुकरणीय असल्याचे सांगितले. मे २२ ते २७ दरम्यान झालेल्या या वर्षीच्या या परिषदेच्या पाचव्या सत्रात १७६ देशांच्या नेत्यांचे स्वागत करण्यात आले. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव पी के मिश्रा यांच्या सोबत भारताचे प्रतिनिधित्व केले.

यावेळी जो आराखडा तयार करण्यात आला त्यात यूएन सर्वसाधारण परिषदेने १५ वर्षांच्या स्वयंसेवी करार केला असून डेनिक मँक क्लिन संवाद प्रमूख यांनी बैठकीत सांगितले की, “ भारत ही सर्वात मोठी लोकशाही आहे, ज्यांनी असा आराखडा तयार केला आहे ज्यात नैसर्गिक आपत्तीत उद्भवणारे धोके कमी करण्याची तरतूद केली आहे. ज्यात अल्पावधीत गाठावयाचे लक्ष्य २०२० निश्चित करण्यात आले आहे.”

हे व्यासपीठ २००४ च्या भारतीय त्सुनामीच्या घटनेनंतर अस्तित्वात आले. हे अशा प्रकारचे महत्वाचे एकत्रित येवून नैसर्गिक आपदांचे धोके कमी करण्यासाठी चर्चा करण्याचे व्यासपीठ झाले आहे. पंतप्रधांनाच्या दहा कलमी कार्यक्रमांतर्गत जो त्यांनी ३ नोव्हे २०१६मध्ये जाहीर केला होता, तो अशा आपत्ती निवारणासाठी आश्वासक व्यवस्थापन आराखडा ठरला आहे. यात महिलांच्या नेतृत्वाचा मोठ्या प्रमाणात सहभाग करुन घेण्यात आला आहे, आणि जागतिक धोके ओळखण्यासाठीची गुंतवणूक करण्यात आली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, “ आपत्ती धोके कमी करण्याची महत्वाची भूमिका आहे, ज्यात हवामान बदलांसह इतर बदलांचा विचार करण्यात आला आहे, शिवाय शक्य त्या विकासाचा विचार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पाहता ही परिषद योग्य वेळी आणि समयोचित झाली आहे. त्यांनी प्रामुख्याने दोन बाबींवर जोर दिला.

एक, विकासाची सर्व क्षेत्र ही आपत्ती व्यवस्थापनात अविभाज्यपणे जोडली गेली पाहिजेत. यातून हेच निश्चित केले जाईल की सा-या विकासांच्या कामात प्रकल्पात- विमानतळांवर, रस्ते, कालवे,रुग्णालये,शाळा पूल यांची बांधणी करताना योग्य त्या मानकांचा वापर केला जाईल. यातून समाजाच्या प्रती असलेल्या जबाबदारीची भावना वाढीस लागेल. दुसरे, धोके टाळून कामे पूर्ण करण्यात अगदी घरगुती प्रकारच्या लहान मध्यम प्रकारातील कामांपासून बहुराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरांपर्यंत वातावरण तयार होईल.

Clap Icon0 Shares
 • +0
  Clap Icon
Share on
close
Clap Icon0 Shares
 • +0
  Clap Icon
Share on
close
Share on
close