संपादने
Marathi

स्वेच्छेने केलेल्या कार्यात यश तर मिळतेच पण तुमची खास ओळख बनते; अरविंद अयंगार यांच्या कहाणीची प्रेरणा!

Team YS Marathi
20th Oct 2016
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

असे म्हणतात की, इच्छा असेल तर मार्ग सापडतोच, याचा प्रत्यय अरविंद अयंगार यांना देखील आला. बालपणापासुनचे त्यांचे जे स्वप्न होते ते सत्यात आले होते. लहानपणापासून त्यांना खेळाची आवड होती, मोठ्या भावंडासोबत ते तासंतांस क्रिकेटच्या समालोचनाचा सराव करत.पण खेळातच करिअर करण्याबाबत काही नक्की नव्हते. कुटूंबाची परंपरा आयआयटी मधून अभियंता होण्याची असल्याने अरविंद यांनाही मुंबईच्या आयआयटी मधून तांत्रिक अभियंता (मेकँनिकल इंजिनिअरिंग) करण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र खेळाच्या विषयाची बांधिलकी इतकी होती की ते आज एक क्रीडा संस्था ‘स्पोर्टस् इंटरॅक्टिव’ चालवितात.

त्यांच्या या कहाणीला रंजक वळण त्यावेळी मिळाले जेंव्हा अरविंद यांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी मोठ्या पगाराची मॅकिन्से या कंपनी मधील नोकरीदेखील सोडली. इतका मोठा निर्णय घेताना त्यांना आपले लक्ष्य गाठण्यासाठी केवळ एक संधी होती जिचा त्यांना पुरेपूर लाभ घ्यायचा होता.

image


अरविंद सांगतात की जेंव्हा ते मॅकिन्सेसाठी काम करत होते, तेंव्हा त्यांना एका रिअॅलीटी शो ची माहिती मिळाली. या शो चा विषय असा होता जो लहानपणापासून त्यांना करायचा होता. २००७ मध्ये ईएसपीएन वाहिनीवर मंदीरा बेदी पंच होत्या. त्यांनी अरविंद यांना विचारणा केली की, “ तुमच्या जवळ इतकी चांगली नोकरी आहे, तुम्ही आयआयटी मध्ये शिकला आहात, इतके चांगले करिअर सोडून तुम्ही नवे काही का करु इच्छिता?” त्यावेळी त्यांनी उत्तर दिले की, त्यांचे कुटूंबिय आणि मँकिन्से कंपनीचे प्रोत्साहन आणि साथ मिळाल्यानेच हे शक्य झाले. दुसरे महत्वाचे म्हणजे त्यांना मनापसून हे काम करायचे होते आणि ही संधी त्यांना गमावायची नव्हती.

अरविंद यांनी रिआलीटी शो मध्ये जाण्याचे ज्यावेळी ठरविले, त्यावेळी केवळ त्यांच्या कंपनीनेच नाहीतर कुटूंबियांनीही त्यांना सहकार्याचा हात पुढे केला.

स्वप्न सत्यात येण्यासाठी काम करणा-याला हिम्मत आणि उमेद त्यांच्या लक्ष्यातून मिळत असते. ऑडीशन करिता अरविंद दिल्लीतून मुंबईला आले त्यावेळी त्यांना त्यांच्या संधीची आठ तास वाट पहावी लागली. ऑडीशनसाठी दहा हजार लोक आले होते. पण वाट पहाण्याचे फळ चांगले होते. अरविंद यांची निवड शोच्या अंतिम श्रेणी मध्ये झाली, त्यांना वाहिनी कडून आणखी एका शो साठी विचारणा देखील झाली.

आता त्यांच्यासमोर प्रश्न होता, पगारावर पडणा-या मोठ्या फरकाचा. या प्रश्नाचे त्यांच्या मनात स्पष्ट उत्तर होते, लक्ष्य जवळच आहे आता कुणी मला थांबवू शकत नाही.

ईएसपीएन वर एक वर्ष समालोचन केल्यांनतर अरविंद यांनी स्टँनफोर्ड येथे एमबीए करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. भारतात खेळाचे समालोचन करण्यापेक्षा काहीतरी अजून करण्याची इच्छा असणा-या अरविंद यानी स्टँनफोर्ड मध्ये एमबीए संघासोबत वेळ व्यतीत केला. एमबीएच्या दरम्यान व्यावसायिक क्रीडा कार्यक्रमात भाग घेणा-या अरविंद यांनी खेळाशी संबंधित आपल्या करिअरला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे ठरविले. आणि आता भारतात ‘स्पोर्टस् इंटरँक्टिव’ नावाच्या कंपनीचे प्रमुख आहेत जे क्रीडाप्रेमींना खेळाशी जोडण्यासाठी नवनवीन आणि रंजक पध्दतींवर काम करतात. डिजीटल मिडिया, मोबाईल आणि मोठ्या प्रसारण करणा-यांच्या माध्यमातून क्रीडाप्रेमीना क्षणोक्षणी माहिती देत राहणे आणि मोठ्या क्रीडा आयोजनावर नेहमी काम करत राहणारे अरविंद कधी आपल्या कामाने थकत नाहीत कारण अथक प्रयत्न करून त्यात ते शिरले आहेत. अरविंद म्हणतात की आता कंपनी फुटबॉल लिगसाठी विशेष उत्पादने आरेखित करत आहे. त्यांच्याकडे देशातील सर्वच क्रीडा आयोजनात सामील होण्याची संधी आहे.

अरविंद त्याच लोकांपैकी आहेत जे आपल्या कामावर प्रेम करतात आणि त्याच्या विकासाच्या योजनांचा सतत विचार करत असतात. अशा लोकांच्या यशांच्या मर्यादा नसतात.

अरविंद सांगतात की, भारतात क्रीडा क्षेत्रात करिअरच्या जास्त संधी नाहीत, आणि माहितीही दिली जात नाही. पण आता बदल होत आहे. यापूर्वी बहुतांश लोक डॉक्टर किंवा अभियंता होण्याचे स्वप्न पहात याशिवाय इतर क्षेत्रात जास्त कुणी जात नव्हते. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या क्रीडा आयोजनात आयपीएल कबड्डी, फुटबॉल लीग सारख्या नव्या आयोजनात ब-याच संधी आहेत. अरविंद यांच्या कहाणीतून आम्हाला हीच प्रेरणा मिळते की, ज्या कामासाठी तुमच्या मनात काहीतरी भावना येत असतात तेच काम झपाटून करा. तुमची ऊर्जा, समर्पण आणि सतत काम करण्याची इच्छाच तुम्हाला खास माणूस बनवत असते.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा. 

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags