Marathi

भारतीय अल्पसंख्यांकासाठी आता 'रहमान ३०'

Team YS Marathi
14th Jul 2017
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

सुपर ३०, मोफत शिकवणी केंद्र जेथे गरीबातील गरीब मुलांना उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी आयआयटी मध्ये सुविधा मिळावी म्हणून अनिवासी भारतीय आर्थिक मदत करतात.

कादीर रहमान, सौदी अरेबीया मधील व्यावसायिक आणि बिहार फाऊंडेशनचे अध्यक्ष यांनी एक संस्था ‘रेहमान ३०’ स्थापन केली असून ही संस्था दरवर्षी देशभरातून तीस विद्यार्थ्यांची निवड करते जे अल्पसंख्याक समाजाचे आहेत आणि ज्यांना शिक्षणासाठी मदत करण्याची अत्यंत गरज आहे. पाटणा येथील सुपर ३० चे संस्थापक आणि संचालक आनंदकुमार यांच्या मार्फत या विद्यार्थ्यांना मोफत सुविधा पुरविल्या जातात. ते वेगवेगळ्या अभ्यास क्रमाचे असतात असे रहमान यांनी सांगितले.

ते म्हणाले की, “ मुख्य उद्देश हा आहे की या तरूणांना रोजगाराभिमुख शिक्षण देणे, जे अल्पसंख्य समाजात आभावाने असते. त्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळत नाही कारण त्यांची कौटूंबिक आर्थिक स्थिती हालाखीची असते.”


image


२०१४-१५ च्या अखिल भारतीय सर्वेक्षणानुसार, जे मानव संसाधन विभागाने केले होते,अल्पसंख्यांक सातत्याने समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावर राहिले आहेत. ज्या वेळी ते उच्च शिक्षणासाठी येतात, त्यांच्या पैकी केवळ ४.४टक्केच प्रवेश घेवू शकतात. मुस्लिमांच्या गळतीचे प्रमाण देखील सर्वाधिक म्हणजे १७.६ टक्के आहे. रहमान यांनी पुढे सांगितले की, “ शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे ज्यातून समाजात यांना सन्मानाने जीवन जगता येईल. कारण त्यात पिढीला बदलण्याचे सामर्थ्य आहे जे मी सुपर३० मध्ये पाहिले. ज्यावेळी मी अरबाज आलम यांच्यासारखे यशस्वी विद्यार्थी पाहतो, जो अत्यंत हालाखीच्या स्थितीत आयआयटी सारख्या ठिकाणी शिकण्यासाठी पोहोचला. त्यातून मला प्रेरणा मिळाली की गरजूंना अजून मदत मिळाली पाहिजे. विद्यार्थी आणि त्यांचे प्राध्यापक यांच्यासाठी देखील हे प्रोत्साहन आहे की, सुपर ३० पाहण्यासाठी अन्य देशातून लोक येत आहेत आणि त्यांचे अनुकरण करत आहेत. ज्यात गरजवंत विद्यार्थ्यांना कशी मदत होत आहे आणि समाजात त्यांना कसे सन्मानाने जगता यवू शकेल. आम्ही देखील गरजूंना हे देत आहोत, जे खरोखर हुशार आणि समर्पित आहेत.”

२००२ मध्ये स्थापित, सुपर ३० ही आघाडीची संकल्पना आहे, जीने शांतपणे समाजिक बदल घडविण्याचे काम सुरू ठेवले आहे. ज्यात आर्थिक मागास घटकातील हुशार, प्रज्ञावान विद्यार्थी शिकून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत आहेत. यामध्ये आयआयटी- जेईई, आय आय टीची प्रवेश परिक्षा उत्तिर्ण होणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा देखील समावेश आहे.

आजवर चारशे सुपर३० विद्यार्थी- जे आर्थिक हालाखीच्या स्थितीत होते, त्यांना आनंद यांनी मार्ग दिला आहे. आणि वेगवेगळ्या आयआयटीमध्ये त्यांना शिक्षण देण्यात मदत झाली आहे.

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags