संपादने
Marathi

ऐशो आरामाच्या उत्पादनांच्या विक्रीतून 'दार्वेयस' कामावतेय नफा.

Team YS Marathi
11th Dec 2015
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

कोटक वेल्थ मेनेजमेंट च्या अहवालानुसार भारतात २०११ ते २०१५ काळात कोट्याधीशांची संख्या ६२००० वरून १३७१०० इतकी झाली. २०१५ आणि २०१५ भारतीय करोड पतींचा घरगुती खर्च १७ टक्क्यांनी वाढून ३० लाख ८० हजार अमेरिकी डॉलर इतका वाढला. येत्या पाच वर्षात ३४८००० पेक्षा तिपटीने वाढून ती ४१५ पद्म इतकी होईल अशी अपेक्षा आहे.

कोट्याधीश नागरिकांची संख्या वाढल्याने देशात ऐशो आरामाच्या वस्तुंची एक नवीन बाजारपेठ निर्माण झाली आहे. युरोमाॅनिटरने २००९ ते २०१४ मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार भारतातील ऐशो आरामाच्या वस्तूंची बाजारपेठ ३० बिलियन अमेरिकी डॉलर वरून १३० बिलियन अमेरिकी डॉलर इतकी झाली आहे. फक्त २०१४ मध्ये भारतात ऐशो आरामाच्या वस्तूंची बाजारपेठ २५ टक्क्यांनी वाढली.

जून २०१४ मध्ये ऐशो आरामाच्या उत्पादकांची बाजारपेठ वाढत तेव्हा नकुल बजाज यांनी फक्त ऐशो आरामाच्या वस्तुंच दार्वेयस हे पोर्टल सुरु केलं.

"दार्वेयस वर कॉस्मोपोलीटीन फॅशनची उत्पादनं उपलब्ध आहेत. हे पोर्टल सुरु करण्यामागे दोन गोष्टी होत्या, एकतर अशा वस्तू आंतरराष्ट्रीय वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये खूप महाग मिळतात आणि दुसरं म्हणजे त्या खूपच मर्यादित असतात. या माध्यमातून आम्ही युरोपातील नामवंत बुटिक आणि उत्पादकांशी संपर्क साधून त्या किफायतशीर किंमतीत उपलब्ध करून दिल्या आहेत. या किंमतीत इतर कोणत्याही वेबसाईट वर किंवा दुकानात या वस्तू मिळणार नाहीत." दार्वेयस चे सी ई ओ नकुल बजाज सांगतात.

image


ई कॉमर्स क्षेत्रातील बडी प्रस्थ जेव्हा या माध्यमातून नफा कसा कमवायचा याचा विचार करत होते, तेव्हा दार्वेयसला नफा कमावण्याच सूत्र सापडलं होतं असा त्यांचा दावा आहे.

दार्वेयसचा जगभरातील ३०० हून अधिक बुटिकबरोबर करार असून त्यांना भारतातील ग्राहकांशी थेट व्यवसाय करता येतो.

फॅशन क्षेत्रातील वस्तूंची विक्री करताना त्यातून नफा कमावण्यासाठी नवीन बिझनेस मॉडेल शोधावं लागलं कारण कंपनी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करत होती. दार्वेयस वर खरेदी करण्यासाठी आधी एक हजार रुपये भरून नोंदणी करावी लागते. ही सदस्यत्व नोंदणी आजीव असते आणि हे नोंदणी केलेले सदस्य या वेबसाईट वरील १० हजार उत्पादनं बघू शकतात आणि खरेदी पण करू शकतात. " आम्हाला आमच्या ग्राहकांना खरेदीचं पूर्ण समाधान द्यायचं हे आमचं उद्धिष्ट होतं." असं नकुल सांगतो.

सध्या दार्वेयस चे १५ हजार सदस्य आहेत आणि दर महिन्याला ही संख्या २५ टक्क्यांनी वाढते.

विश्वास वृद्धी

वेगळ्या पद्धतीने व्यवसाय करताना ग्राहकांनं खात्रीशीर उत्पादनं उपलब्ध करून देणं आणि त्यांचा विश्वास प्राप्त करणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं पण ते आम्ही शक्य करून दाखवलं. नकुल सांगतो की आम्ही प्रत्येक वस्तूची खात्री दिली होती पण समजा चुकून त्यात काही चूक झाली तर आम्ही पैसे परत करण्याची व्यवस्था केली होती.


image


" आम्ही फक्त मोठ्या बुटिक कडूनच माल घेतो, ते पण A + दर्जा असलेली बुटिक ती पण पाच वर्ष या व्यवसायात आहेत अशीच बुटिक आम्ही बघत होतो. प्रत्येक वस्तूच्या विक्रीनंतर दार्वेयस प्रत्येक बुटिक कडून माल खरेदीची पावती घेतं. यामुळे मोठ्या उत्पादकांकडूनच माल खरेदी केला आहे याचा तो पुरावा असतो. ही कागदपत्र आणि खरेदी केलेली वस्तू हे एकच असल्याची खात्री झाल्यावरच संबंधित वस्तू बुटिक मधून ग्राहकाला पोचती केली जाते." असं नकुल सांगतो.

संधीच्या शोधात

युरोमाॅनिटरच्या पाहणीनुसार येत्या पाच वर्षात भारतातील ऐशो आरामाच्या वस्तूंची बाजारपेठेतील उलाढाल १३२ बिलियन रुपयांवरून २३६ बिलियन रुपये इतकी होणार आहे. ऑनलाईन बाजारपेठेत बरेच बदल होणार आहेत.

२०१४ मध्ये किरकोळ बाजारात होणाऱ्या खरेदीपैकी ४० टक्के खरेदी आता ऑनलाईन होत आहे. २०२० पर्यंत ऑनलाईन खरेदी ७० टक्क्यांपर्यंत जाईल. बाजारपेठेतील या बदलत्या परिस्थितीचा फायदा घेत येत्या तीन वर्षात दार्वेयसच वर्षात १०० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल वाढवायची आहे. हे लक्ष्य त्यांनी ठेवलं आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीत असलेल्या शहरांमध्येही व्यवसाय वाढवण्याचा दार्वेयसचा विचार आहे.

" भविष्यात आम्हाला आमच्या बरोबर काम करणारे डिझायनर्स आणि बुटिक ची संख्या वाढवायची आहे. ज्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना विविध प्रकारची उत्पादनं सहज उपलब्ध करून देऊ. आमच्या बरोबर काम करणाऱ्या बुटिकची संख्या वाढवणं आणि नवनवीन डिझाईनर्सनी तयार केलेल्या वस्तू ग्राहकांना किफायतशीर किंमतीत उपलब्ध करून देणं ही आमची योजना आहे." असं नकुल सांगतो.

दार्वेयस हे एकच नाव या क्षेत्रात नाही तर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धक या क्षेत्रात आहेत. त्यामुळे कमालीची स्पर्धा या क्षेत्रात आहे. अ पोर्टर, गिल्ट, शोपबोब आणि इतर अशी अनेक पोर्टल या व्यवसायात आहेत, आणि ते भारतातही व्यवसाय करतात. क्लोसार होम, तसंच रॉकएन शॉप, ओबस्टोर, स्टाईलस्टा, एलीट्फी, पॉप अप शॉप, फॅशन एंड यु यासारखे अनेक पोर्टल अंतरराष्ट्रीय बाजारात व्यवसाय करतात.

लेखक : तौसीफ आलम

अनुवाद :श्रद्धा वार्डे

 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags