व्यवसाय वृद्धीसाठी मागणीनुसार वेबसाईट आणि मोबाईल अॅप सेवा ‘ClickExcel.com’

18th Jun 2016
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात उपग्रहाच्या मदतीने दळणवळणाच्या सुविधा विकसित झाल्या आहेत. रोजच्या दैनंदिन व्यवहारात, व्यापारात देखील या सेवेचा आता सरार्स आणि सहज वापर शक्य आहे. याचा अनुभव तुम्हाला ‘क्लिकएक्सेलडॉटकॉम’ (ClickExcel.com)यांच्या सेवा घेतल्यावर नक्कीच येईल. लहान आणि मध्यम स्वरुपाच्या व्यवसाय वृद्धीसाठी आता एकाच छताखाली तुमच्या मागणीनुसार वेबसाईट आणि मोबाईल अॅप संबंधित सेवा देणारे ‘क्लिकएक्सेलडॉटकॉम’ (ClickExcel.com) हे स्टार्टअप पुण्यात आहे. तुमच्या नव्या व्यवसायाला हव्या असलेल्या गोष्टी अत्याधुनिक तंत्राच्या मदतीने मिळविणे ही संकल्पनाच तुम्हाला तुमच्या उद्योगाच्या भविष्याबद्दल खात्री देते. राज्याची सायबर नगरी पुण्यात अशी सेवा देणारे हे संकेतस्थळ २०१५मध्ये सुरु करण्यात आले. पंडित कदम या मराठमोळ्या तरुणाने ही सेवादेण्याबद्दल केलेल्या प्रयत्नांची आणि त्यांच्या स्टार्टअप ची माहिती घेण्यासाटी युअर स्टोरी ने त्यांच्याशी संवाद साधला. क्लिक एक्सेल डॉट कॉम च्या सेवेची माहिती देताना कदम म्हणाले की , "डोमेन रजिस्ट्रेशन, वेब होस्टिंग, वेब डेव्हलपमेंट, मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, आणि एकाच छताखाली डीजीटल मार्केटिंग या सर्व सेवा आता एका छताखाली उपलब्ध करण्यात आल्या आहे." २०१५ मध्ये पंडित कदम यांनी ‘क्लिकएक्सेलडॉटकॉम’ ची स्थापना केल्यापासून गेल्या वर्षाभरात त्यांच्याकडे १५० पेक्षा जास्त फ्रीलान्स वेब डेव्हलपर्स आणि डीजीटल एजन्सीज जोडल्या गेल्या आहे.

“क्लिकएक्सेलडॉटकॉम तर्फे क्लायंटच्या मागण्या त्यांना हव्या त्यावेळी त्वरित ऑनलाईन पुरवल्या जातात. वेब डेव्हलपमेंट संबंधित ऑर्डरही ऑनलाईन पूर्ण केल्या जातात. जर क्लायंटला आमच्या फ्रीलान्सरची किवा एजेंटची सेवा प्रत्यक्षात त्याच्याकडे ऑफिसमध्ये किवा घरगुती हवी असेल तर ही सेवा ऑन डिमांड ऑन द स्पॉट दिली जाते, यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. विशेष म्हणजे ही सेवा क्लायंटने आॅर्डर दिल्यानंतर २४ तासात पुरवली जाते. सध्या कंपनी ही सेवा त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून पुरवत आहे. कंपनीचे अॅन्ड्राईड अॅप आणि आयओएस (iOS app) लवकरच सुरु करण्यात येणार आहे ” कंपनीचे संस्थापक पंडित कदम यांनी युवर स्टोरीशी बोलताना सांगितले. सध्या कंपनीचा अधिकाधिक विस्तार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतात खूप मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. सध्या नवनवीन संकल्पना राबवण्याकडे बाजाराचा कल आहे. क्लिकएक्सेलडॉटकॉम या ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या स्टार्टअपचे सध्याचे बाजारातले प्रतिस्पर्धी अर्बनक्लॅप, लोकलओए आणि झिंबर हे आहे.अश्या प्रकारच्या सेवा देणारे बाजारात अनेक ब्रान्ड उपलब्ध असल्याने स्पर्धात्मक वातावरणात तुमच्या सेवांचा दर्जा राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणुकीची गरज असते. अशी संधी कदम यांच्या स्टार्टअप मध्येही उपलब्ध आहे . त्याचबरोबर इतरही स्पर्धक आहे ज्यांना त्यांच्या अनोख्या सेवेसाठी बाजारातून अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. विस्तारवाढीच्या संधीचा शोध घेताना कदम यांनी आपल्या सेवाना अधिक ग्राहकोपयोगी करण्यासाठी नव्या संकल्पना राबविल्या आहेत.अर्बनक्लॅप या स्टार्टअपला बेसेमर, सैफ आणि एस्सेल पार्टनर्स या त्यांच्या भागीदारांकडून दुसऱ्या श्रेणीतील २५ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक लाभली आहे. झिंबरला आयडीजी वेन्चर्स आणि ओमडीयर नेटवर्क्स या कंपन्यांकडून दोन मिलियन डॉलरची गुंतवणूक लाभली आहे.

लोकलओए सारख्या याच क्षेत्रात विस्तार करू पाहणाऱ्या खेळाडूला टायगर ग्लोबलकडून पाच दशलक्ष डॉलरचा निधी आणि लाईटस्पीड वेंचर पार्टनर्स, हाऊसजॉय या कंपन्यांकडून चार दशलक्ष डॉलरचा प्रथम श्रेणीतील निधी उपलब्ध झाला आहे. मॅट्रिक्स पार्टनर्स आणि अर्बनक्लॅप या स्टार्टअप्सला दहा दशलक्ष डॉलरचा निधी सैफ पार्टनर्स आणि एस्सेल पार्टनर्सकडून प्राप्त झाला आहे. या स्टार्टअपचे वेगळेपण म्हणजे ते फक्त वेबसाईट आणि मोबाईल अॅप सेवा पुरवतात, तर अर्बनक्लॅप आणि झिंबर सर्वच सेवा चांगल्या पद्धतीने पुरवत असल्याचे पंडित कदम सांगतात.

क्लिकएक्सेलडॉटकॉम : निधी आणि विस्तार योजना 

या स्टार्टअपचा सध्या स्वबळावर विस्तार सुरु आहे. बाजारातून अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी अद्याप प्रयत्न केलेले नाही. मात्र पुढील दोन ते तीन महिन्यात कंपनीचा अधिक विस्तार करण्यासाठी भांडवलदारांकडून आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सध्या उत्तम दर्जाची सेवा देण्यास आणि बाजारात आपली पत निर्माण करण्यास कंपनी प्रयत्नशील आहे. त्यानंतर अधिक निधी उभारण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे. सध्या ही सेवा फक्त भारतात उपलब्ध आहे. पुढील एक वर्षाच्या काळात दिवसाला शंभर ऑर्डर मिळवण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे. या मराठमोळ्या तरुणाच्या स्टार्टअप साठी आता प्रतीक्षा आहे आपल्या सारख्यांच्या सहकार्याची आणि नव्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांची. अत्याधुनिक व्यवसायाच्या या क्षेत्रात पंडित कदम यांच्यासारख्या स्टार्टअप तरुणांना युवर स्टोरीच्या माध्यमातून मदत मिळावी ही शुभेच्छा देताना वाचकांना देखील अशा प्रकारच्या तंत्रज्ञानातील उद्योगांसाठी प्रेरणा मिळेल आणि क्लिकएक्सेलडॉटकॉम मध्ये गुंतवणुकीसाठी ते प्रेरित होतील हीच सदिच्छा !

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

मित्रांचे मित्र शोधून देणारं दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांचं नवीन अॅप 'व्हेअरअबाउट'

'बुक माय अॅक्टिविटी'च्या मदतीनं शोधा आपल्या छंदासाठीचं योग्य ठिकाण 

गुंतवणूक स्वत:ची तरीही फायदेशीर, कोटामधल्या स्टार्टअपच ध्येय आहे वर्षाची तब्बल २८ कोटींची उलाढाल

Want to make your startup journey smooth? YS Education brings a comprehensive Funding Course, where you also get a chance to pitch your business plan to top investors. Click here to know more.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

Our Partner Events

Hustle across India