मित्रांचे मित्र शोधून देणारं दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांचं नवीन अॅप 'व्हेअरअबाउट'
तंत्रज्ञान आणि इंटरनेटमुळे आज जग जवळ आलं आहे. 'सिक्स डिग्रीज सेपरेशन' हा सिध्दांत मागे पडत जाऊन त्याची जागा आता 'थ्री एन्ड हाफ डिग्रीज' ने घेतली आहे. (सिक्स डिग्रीज सेपरेशन ही फ्रीजस करिन्थीची थियरी, ज्याचा अर्थ होतो जग हे एकमेकांशी एका साखळीने बांधलं गेलं आहे आणि या साखळीत एखाद्या व्यक्तीपासून फार-फार तर सहा व्यक्ती इतकं अंतर दुसऱ्या व्यक्तीपर्यंत असतं. जगाच्या दोन ध्रुवांवर असलेल्या माणसांमध्ये सुद्धा निव्वळ सहा किंवा त्यापेक्षा कमी अंतर असू शकतं. हेच अंतर आता कमी होत जाऊन ते तीन ते साडे तीन व्यक्ती इतकं राहील आहे असा दावा संशोधक करत आहेत.) आणि हे अंतर कमी झालंय ते सोशल मीडियामुळे.
म्हणजेच आपल्याला भेटणारी आणि आपल्यासोबत मिसळणारी प्रत्येक तिसरी व्यक्ती ही आपल्याशी कोणत्या न कोणत्या तरी कारणाने जोडलेली असते. वेगाच्या या युगात योग्य वेळी योग्य माणसाशी योग्य तऱ्हेने संपर्क साधला जाणं, हे संभाव्यरित्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्ट्या सुयोग्य ठरतं.
'व्हेअरअबाउट' हे मित्रांचे मित्र शोधून देणारं एक मोबाइल अॅप आहे. या अॅपद्वारे वापरकर्त्यांना नेटवर्कच्या माध्यमातून थेट दुसऱ्या किंवा तिसऱ्या मित्रांपर्यंत त्यांची कोणतीही वैयक्तिक माहिती न दाखवता पोहचता येतं.
कसं काम करत हे अॅप ?
व्हेअरअबाउट मुळे तुम्हाला शोधता येतं, छाननी करता येते आणि विश्वासू मित्रांच्या मित्रांपर्यंत पोचता येतं, त्यांचे दार (अॅपद्वारे) अक्षरश: ठोठावता येते. आता हे मित्र तुमचं प्रोफ़ाइल पडताळू शकतात, तुमचे संपर्क पाहून तुमच्या प्रतिसादाला उत्तर द्यायचं की नाही ते ठरवू शकतात आणि अर्थात त्यांनी तुमचं आमंत्रण स्वीकारलं तर गप्पा मारण्याचं दालन उघडतं आणि तुम्ही मनमुराद गप्पा मारू शकता.
वापरकर्त्यांचं आपल्या गुप्ततेवर पूर्ण नियंत्रण असतं ज्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणी पोहचायचं हे वापरकर्तेच ठरवू शकतात. त्यांच्या या माध्यमातून नोकरी मिळणं, व्यावसायिक संबंध बनवणे, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी भेटणं, गप्पा, आयुष्याचा जोडीदार मिळणं असे अनेक प्रकार घडू शकतात, अशी कल्पना व्हेअरअबाउटच्या संस्थापकांनी केली होती.
व्हेअरअबाउटला व्यत्यय आणणाऱ्या आणि त्रासदायक मित्रांच्या विनंत्या टाळायच्या आहेत. ज्या अन्य सोशल नेट्वर्किंग साईटवर आढळतात, वापरकर्त्यांच्या विस्तारित नेटवर्क द्वारे त्यांना एक सुरक्षित आणि साधा रस्ता निवडायचा आहे.
आत्तापर्यंतची कहाणी
२०१६ या वर्षाच्या सुरुवातीला हर्ष स्नेहान्षु आणि आशिष सिंघ या आयआयटी दिल्लीमधल्या पदवीधारकांनी व्हेअरअबाउटची सुरुवात केली. पदवी मिळाल्यानंतर हर्ष यांनी विटक्राफ्ट ((thewittyshit.com) याची सुरुवात केली होती. पण हा प्रकल्प फसला आणि पुढील दोन वर्ष त्यांनी रेण्डम हाउस या प्रकाशन संस्थेबरोबर पूर्णवेळ लेखक म्हणून काम केलं आणि वृत्तपत्र आणि कारवान, द हिंदू , फोर्ब्स आणि तेहलका सारख्या मासिकात विशेष लिखाण केलं. त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण भारत अत्यंत काटकसर करीत पिंजून काढला.
हर्ष यांनी त्यानंतर आणखीन दोन कल्पनांवर काम सुरु केलंं. फ़्लॅटअबाउट हे घर भाड्याने देण्याबाबातीतल पोर्टल होतं तर माय फुटप्रिंट हे दुसरं अॅप होतं. या दोन्हीला यश तर मिळालं पण हर्ष यांना वेळीच लक्षात आलं की या अॅप्सना फार उंची गाठता येणार नाही. हर्ष त्यांच्या भारतभरातल्या प्रवासाविषयी सांगताना ते म्हणतात की रात्री राहण्याची सोय करण्यासाठी त्यांनी परिचितांच्या माध्यमातून स्वस्त निवारा शोधला आणि काटकसर करून राहिले.
सोशल नेटवर्कवर सतत आपल्याला माहित नसणाऱ्या लोकांना सामील करून घेत राहिल्याने आपल्या न्यूजफ़ीडमधील महत्त्वाच्या संदर्भाची किंमत कमी होते. पण त्याचवेळी महत्त्वाचे असणारया मित्रांचे मित्र आणि त्यांचे मित्र किंवा परिचित व्यक्ती आपल्या संपर्कात असणे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. व्यवसाय नेटवर्किंग, करार आणि विक्री या गोष्टी या नेहमी दुसऱ्या टप्प्यातील जो दुवा असतो त्यांच्या माध्यमातून होतो. त्यामुळे या बोधतत्वावर आधारित हर्ष यांनी त्यांचे मित्र आशिष (जे त्याआधी झॉपरचे कर्मचारी होते) यांच्यासमवेत हे धाडस करायचं ठरवलं.
सध्या आशिष व्हेअरअबाउटचे सीईओ आहेत. तत्पूर्वी त्यांनी झॉपरचं संपूर्ण कर्मचारी पाठबळ उभारण्यात मोठी भूमिका बजावली त्याचबरोबर पायथन या संगणकीय भाषेचं ज्ञान मिळवलं आणि तब्बल ४ वर्ष त्यांनी २० पेक्षा अधिक अभियंत्यांच्या पथकाचं नेतृत्व केलं. या स्टार्ट-अप ला ते कित्येक महिने अर्ध वेळ मदत करत होते आणि अखेर फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांनी हर्ष बरोबर अशोक विद्यापीठात व्हेअरअबाउटची स्थापना केली. या ठिकाणी हर्ष हे विद्यार्थी होते. व्हेअरअबाउटचा विकास केल्यानंतर आणि सुरुवात केल्यानंतर ते सतत त्याचा मागोवा घेत राहिले आणि अॅपला अधिक आकर्षक बनवण्यासाठी सतत नवनवीन वैशिट्य त्यात जोडत गेले. हर्ष म्हणाले की “ते सध्या गुंतवणूकदारांच्या शोधात आहेत आणि हा निधी आयओएस आवृत्तीसाठी आणि नवीन वैशिष्ट तसेच छाननी प्रक्रिया मजबूत करण्यासाठी वापरण्याचा त्यांचा मानस आहे”.
सध्या हे अॅप निशुल्क डाऊनलोड करता येतं आणि वापरता येतं. हर्ष म्हणाले की त्यांना प्रिमियम प्रारूप (ज्यामध्ये साॅफ़्टवेयर निशुल्क असतं) म्हणजे सुरुवातीला वापरायचं आहे आणि जेव्हा वापरकर्ते एका विशिष्ट स्तरापर्यंत पोचल्यावर त्यांना शुल्क लागू होईल. तर दुसरीकडे ते विशिष्ट प्रोफ़ाइल बनवण्यासाठी (व्यक्तिगत किंवा व्यवसायासाठी) आणि सार्वजनिक प्रदर्शन आणि अन्य काही महत्त्वाच्या वैशिष्टयांना शुल्क आकारणी करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. आजपर्यंत त्यांच्या अॅपला सुमारे साडे तीन हजाराहून अधिक लोकांनी आपल्या मोबाइल मध्ये डाऊनलोड केलं आहे. हर्ष यांच्या म्हणण्यानुसार तब्बल ३० अधिक संदेशांचं वहन या अॅपद्वारे झालं आहे आणि ४,८२० लोकांनी अॅपवर आपल्या मित्रांचे दरवाजे ठोठावले आहे तर १,६०० जोडण्या या अॅपवर झाल्या आहेत. आता हर्ष आणि आशिष याचं ध्येय आहे ते म्हणजे लोकांमधील अंतर कमी करणं आणि दुरत्वाची पायरी कमी करणं. सहा पायऱ्यापासून तीन ते साडे तीन किंवा दोन पायऱ्यापर्यंत !
या क्षेत्राचा सारांश
आपण आपल्या स्मार्टफोन मधून स्थान शोधू शकतो किंवा वाहनाची नोंदणी करू शकतो, जेवण मागवू शकतो, मात्र अनेक जण आपल्या मित्रमंडळीसह किंवा नातेवाईकांशी सम्पर्कही करू शकत नाहीत. २०१४ मध्ये फेसबुकनं एक 'नियरबाय फ्रेंड्स' हे दालन उघडलं होतं ज्यामध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या ठिकाणाची माहिती टाकता येत असे आणि त्यांच्या परिसरातील मित्रमंडळींच्या स्थानाची माहिती सुद्धा मिळू शकत होती आणि त्यांना भेटता येऊ शकत होतं. पण फेसबुकनं हे वैशिष्ट्य निव्वळ वापरकर्त्यांच्या जवळपासच्या मित्रवर्गासाठी मर्यादित ठेवलं होतं. त्यामुळे या वैशिष्ट्याचा हवा तेवढा प्रसार झाला नाही.
त्यानंतर फ्रेंड्सटुनाइट या अॅप मध्ये तुम्ही आणि तुमचा मित्र परिवार एखादा कार्यक्रम आयोजित करू शकता आणि परिसरातील कोणाला तुमच्या या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे का याची चाचपणी करू शकता. स्क्वाड डॉट को या बिटा प्रोग्राम मध्ये सुद्धा याच पद्दतीचं वैशिष्ट्य तुम्हाला आढळतं.
आम्हाला यात काय आवडलं ?
व्हेअरअबाउट ची रचना अत्यंत साधी आणि सोपी आहे. तीन महत्त्वाच्या टॅबसह अॅपची वैशिष्ट्य ही अत्यंत सोपी आहेत आणि स्वत:च प्रोफाईल पुनर्गठीत करण्यासाठी आणि जवळपासची मित्रमंडळी शोधण्यासाठी यामध्ये अत्यंत सुलभ प्रक्रिया आहे.
यामध्ये शोध आणि शोधकार्याची व्याप्ती ही सर्वसमावेशक आहे आणि यामध्ये वापरकर्ते आपलं वय लपवू शकतात, तसंच मित्रांचे मित्र आपल्याला बोलावू शकतील की सार्वजनिक व्यासपीठ आपण निवडायचे ही संधी या अॅपमध्ये मिळते. 'द नॉक' (the knock)फिचर मध्ये तर अगदी खऱ्या जगात आपण जाऊन लक्ष वेधण्यासाठी दुसऱ्यांच्या दारावर टकटक केल्यासारखं वाटत. मित्रांना दररोज १०० वेळा नॉक, तर मित्रांच्या जवळपासच्या मित्रांना सुमारे ५ वेळा नॉक, यामुळे व्हेअरअबाउट अॅपनं त्यांच्या मुळ सामाजिक उद्देश्याची पूर्तता हळूहळू केलीय असं लक्षात येत आहे.
काय बदलता येईल ?
सध्या या अॅपवरची शोध मोहीम ही फक्त नावावर अवलंबून आहे. अधिक फिल्टर्स आणि पूर्वीच्या शालेय संस्थांच्या नावावरून सध्याचं रहातं स्थान आणि तुमच्या आवडी निवडी यावरून सुद्धा ही शोध मोहीम करता येणार आहे ज्यामुळे हे फिचर अधिक वैशिष्ट्यपूर्ण झालं आहे. हर्ष म्हणाले की यावर आता त्यांचं काम सुरु आहे.
व्हेअरअबाउट वापरकर्ते त्यांचं स्थान सुरुवातीलाच प्रवेश करताना संचित करून ठेवू शकतात. यामध्ये विविध शहरांमध्ये घरे असणाऱ्या लोकांसाठी अधिकाधिक स्थानांचा समावेश करता येऊ शकतो तो त्यांच्या मल्टिपल 'होम लोकेशन' या वैशिष्ट्यामुळे.
नॉक हे फिचर सर्वात रोचक आहे. यामध्ये विविधता आहे म्हणजे जसे की- बँग्स ऑन डोअर (दारावर धडका ), थ्रोज स्टोन एट विंडो (खिडकीवर दगड मारणे ) इत्यादी . ज्यामध्ये अधिक संदर्भ, निकड आणि लज्जत सामील आहे.
युवरस्टोरीच्या मते
व्हेअरअबाउट मध्ये अत्यंत रोचक परिणाम साधणारे सिद्धांत आहेत आणि वापरकर्त्यांवर अनावश्यक फिचर्सचा मारा न करता ज्यासाठी हे अॅप आहे ती किमया साधते. अधिकाधिक मिळकतीच्या संधी आणि वापरकर्त्यांची वाढती संख्या यामुळे या दोन प्रयोगकर्त्या शिलेदाराचा चढता आलेख बघणं अत्यंत रोचक ठरणार आहे. त्याचबरोबर संवादासाठी ते कोणतं नवीन वैशिष्ट्य आणतील, हे पाहणं सुद्धा तितकंच मनोरंजक असणार आहे.
अनुभवी तज्ञ मंडळींची साथ मिळाल्याने , व्हेअरअबाउट हे फिचर म्हणजे या तज्ञांच्या सर्व अनुभवाचा परिपाक आहे असं म्हटल्यास अतीशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे त्यांच्या संघात सर्वोत्कृष्ट खेळाडू असल्याने त्यांना आता बाजारात त्याचं हे अॅप कशा पद्दतीने सज्ज होईल ते बघायचं आहे आणि वापरकर्ते , गुंतवणूकदार यांच्याशी योग्य संवाद कसा साधता येईल यावर भर द्यायचा आहे.
हे अॅप इथे डाउनलोड करा
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा :
ताशी ११४ किमी चालणारी सायकल बनवून सायकलला नवसंजीवनी देणारे पाच मित्र
एका विरामानंतर नव्याने कारकीर्दीस सुरुवात करणाऱ्या महिलांना मदत करण्याचे लक्ष्य...
‘अर्बन क्लायंबर्स’च्या माध्यमातून साहसी खेळांना दारोदारी पोहचविणारी आस्था
लेखक: हर्शीथ मल्ल्या
अनुवाद : प्रेरणा भराडे