निशा नटराजन: फॅशनच्या दुनियेला नवी झळाली देऊ पाहणारी चांदणी.

पुरूषप्रधानतेचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात गाठीशी अनुभव नसलेल्या एका धाडशी तरूणीची ही कथा आहे. ही तरूणी म्हणजे निशा नटराजन. हातमागाच्या माध्यमातून कापड तयार करण्याच्या उद्योगात स्वत:ला झोकून देत यश संपादन करणा-या निशा नटराजन यांचा प्रवास सोपा नव्हताच. पॅटर्न तयार करणं, शिवणकाम करणं, कापणी, कापूस पिंजणं आणि विणकाम करणं अशा प्रकारची काम शिकून त्यांनी ज्या प्रकारे संपूर्ण प्रक्रियेवर हुकुमत मिळवली ते आश्चर्यकारक असच आहे. याच परिश्रमाच्या आणि प्रतिभेच्या बळावर ‘फार्म टू फॅशन’ ही निशा नटराजन यांची मोहिम आज फॅशनच्या दुनियेत लोकप्रिय ठरली आहे. शेतक-यांचं आय़ुष्य बदलणा-या या तरूण उद्योजिकेची ही कथा.

7th Oct 2015
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

महाराष्ट्रातल्या बुलडाणा जिल्ह्यासारख्या उष्ण आणि घामाघूम करून सोडणा-या भागात दोनशे शेतकरी कापसाची बोंडं खुडण्याचं काम करतात. यंत्राद्वारे सरकी काढून कापूस कातला जातो. कापसाच्या गुंडीपासून गासडी पर्यंत आणि गासडी ते कापड गिरणीपर्यंत अशा प्रकारे पुढे कापसाचा काहीसा कठीण प्रवास असतो. मागणीनुसार कापड तयार करून देण्याच्या क्षेत्रात चांगलं नाव असलेल्या ‘झरिया’च्या संस्थापिका निशा नटराजन म्हणतात, “ जिथं कापूस पिकतो अशा ठिकाणाहून बहुतेक पारंपारिक कापड गिऱणी फारच दूर असतात.” “ मालाची वाहतूक होत असताना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी सूत तयार करण्य़ापूर्वी कापसाचे तंतू मजबूत बनवावे लागतात. असं केलं गेलं नाही, तर पोत बिघडण्याचा धोका असतो.”

इतकी काळजी घेतली म्हणजे सगळं झालं असं होत नाही, कारण भारतातल्या कापूस उत्पादक आणि ग्राहक यांच्यादरम्यान मध्यस्थाची भूमिका वठवणारा एक मोठा उद्योग काम करतो आहे, आणि यामुळे कापड वापरणा-या ग्राहकाच्या हाती जेव्हा हे तयार कापड पडतं तेव्हा छोटीशी शुल्लक रक्कम शेतक-यांच्या हातात पडते. ही समस्या नेमकी हेरून निशा यांनी कन्नन लक्ष्मीनारायणन यांनी स्थापन केलेल्या मायक्रोस्पीनसाठी उद्योग विकासक म्हणून काम करायला सुरू केलं. आपलं पेंटट असलेल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेतक-यांच्या दर्जेदार विणकामाला किंवा सूत कातण्याच्या कामाला मदत व्हावी या उद्देशानं मायक्रोस्पीन शेतक-यांसाठी युनिट स्थापन करून देण्याचं काम करते. परंतु ही सुद्धा ‘झरिया’च्या कामाची सुरूवात नाही. ‘झरिया’च्या कामाबाबत माहिती मिळवण्यासाठी आपल्याला सहा वर्षं मागे जावे लागेल.
तुम्हाला जे आवडतं, ते तुम्ही कसं साध्य करता ?


निशा यांनी मंगळुरूच्या ख्राईस्ट विद्यापीठातून ह़ॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. त्या म्हणतात, “ माझ्या मित्र-मैत्रिणींचं किंवा कुटुंबात एखाद्याचं लग्न असेल तर वधूचा संपूर्ण साज तयार करण्यासाठी मी डिझायनिंगची भरपूर कामं करायची. हा एक प्रकारचा उद्योग होऊ शकेल याचा मी कधीही विचार केलेला नव्हता. बंगळुरूला परतण्यापूर्वी काही वर्षं मी कोचिनमध्ये एका उद्योगासाठी काम केलं. वर्षभरासाठी मी अमेझॉनसाठीही काम केलं, आणि माझ्या हे लक्षात आलं की हा जॉब माझ्यासाठी डेड-एंड जॉब आहे.” असे काहीतरी कर जे तुझ्या आवडीचे आहे असं निशाना सांगण्यात आलं. एखाद्या मित्रानं आपल्या मित्रांना दिलेला हा अत्यंत गुंतागुंतीचा आणि निष्फळ असा सल्ला नाही का ? निशा म्हणतात, “ तुम्ही ते कसं बरं करणार ?”. “ मला भरपूर गोष्टी करायला आवडतात आणि केवळ त्या आवडणा-या गोष्टींपासून मी पैसे कसं काय मिळवू शकते बरं ?”


२०१३ मध्ये निशा लग्नाचे पेहराव तयार करण्याचं काम करायच्या, आणि याच कामानं त्यांना उद्योगाची दिशा दिली. “ जे मी करू शकते असं हे काम आहे. आणि या उद्योगात असलेल्या लोकांनाही मी ओळखते.” एक मास्टर टेलर आणि दुसरा त्याचा मदतनीस टेलर असे फक्त दोन कारागिर निशा यांच्याकडे होते. या दोघांच्या सहकार्यानं दोन वर्षांपूर्वी सुरतमधून त्यांनी हे काम सुरू केलं. त्याच वर्षी ‘झरियानं’ बहुतेक सिल्कमध्ये असलेल्या निशा यांच्या डिझाईन्सची दोन प्रकारची उत्पादनं तयार केली. काहीतरी नवं सुरू करण्याची ती सुरूवात होती आणि ते सामाजिक दृष्ट्या जबाबदार बनवण्याचं काम निशावर सोपवण्यात आलं.


कापसामधून सापडला प्रगतीचा मार्ग


काही महिन्यांपूर्वीच, जेव्हा निशानी मायक्रोस्पीन फॅसिलिटीला भेट दिली, त्यावेळी त्या एका आत्महत्या केलेल्या शेतक-याच्या मुलाला भेटल्या.एकीकडं नष्ट झालेलं पीक आणि दुसरीकडं कर्जाचा वाढत जाणारा बोजा अशा परिस्थितीला कंटाळून त्या शेतक-यानं आपलं जीवन संपवलं होते. “ तो पुण्यात बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. मायक्रोस्पीननं आपलं युनिट सुरू केल्यानंतर या युनिटमध्ये काम करण्यासाठी त्याच्या आईनं त्याला पुण्याहून बोलावून घेतलं. इथं सात महिने काम केल्यानंतर त्यानं कर्ज काढून लुना खरेदी केली. मायक्रोस्पीननं त्यांचं आयुष्य बदलून टाकल्याचं मी पाहिलं. कदाचित लुना बाईक विकत घेणं ही आपल्या दृष्टीनं मोठी गोष्ट नसेल, पण त्याच्यासाठी ती नव्या जीवनाची सुरूवात होती.”

वधूसाठी मी पोशाख तयार करण्याचं काम करते अशी माहिती मी त्याला दिली. त्यावर तो म्हणाला, “ म्हणजेच तुम्ही फॅन्सी गोष्ट करत असणार!” मी त्याला म्हणाले की मी फॅन्सी लोकांसाठी माझे कपडे विकत नाही, तर काही मोजक्याच लोकांसाठी मी लग्नाचे कपडे तयार करते. तो म्हणाला, ‘जर ऐश्वर्या रॉयनं तुमचे कपडे वापरले तर तुम्हाला माहित आहे का आम्हाला किती आनंद होईल ते ? आम्ही तिचे कटआऊट्स आमच्या शेतामध्ये लावू.’ त्य़ावेळी मला ही जाणीव झाली की काहीतरी भुरळ घालणारं, आकर्षक असं आपण केलं पाहिजे.

मायक्रोस्पीनमध्ये धागा तयार होताना

मायक्रोस्पीनमध्ये धागा तयार होतानाबुटीक विरूद्ध बाजार


“ कपड्याचं मोठं उत्पादन करण्यामध्ये काहीही हशील नव्हता. कारण बाजारात मोठे कापड व्यापारी आहेत आणि त्यांचा व्यवसायही चांगला चाललेला आहे. बुलडाण्यात विणलेल्या कापडापासून सणासुदीला वापरता येतील असे कपडे तयार करण्याची कल्पना मग मला सुचली. जेव्हा जेव्हा मी शेतक-यांकडून कापड खरेदी करायची, तेव्हा तेव्हा ‘झरीया’नं केलेल्या विक्रीच्या दहा टक्के इतकी रक्कम मायक्रोस्पीनला परत जायची. मायक्रोस्पीन शेतक-य़ांना मदतही करते आणि त्यांना प्रशिक्षणही देते. याच कारणासाठी आम्ही मायक्रोस्पीनकडून कापड विकत घेतो.”

आणि इथूनच ‘फार्म टू फॅशन’ ही निशा नटराजन यांची मोहिम सुरू होते. “ शेतक-यांनी स्वत: विणलेल्या कापडापासून मी डिझायनर पोशाख तयार करतेय. जर ते सुती असेल तर ते परवडणारे असले पाहिजे ही कल्पना यामागे आहे. पण यातून मला दुसरी ' फॅबइंडिया ' किंवा ' वेस्टसाईट ' तयार करायची नाही. आणि तुम्ही एकदा वापरा आणि फेकून द्या इतके स्वस्त कपडे तयार केले असतील तर मग मध्यस्ताला उत्पादक आणि ग्राहकांमधून दूर करण्यात काही अर्थ नाही.” आणि याच वर्षी बंगळुरू फॅशन वीकमध्ये अधिकृतपणे निशा आपलं ब्रँड लाँच करणार आहेत. एखाद्या तरूण, सर्जनशील उदयोजकाच्या प्रवासातला हा रोमांचक असा काळ असला, तरी यासोबत आव्हानं आणि नव्यानं शिकण्याची प्रक्रिया मात्र टाळता येत नाही.


अनुभव असुरक्षितता दूर करी!


निशा अतिशय उत्साहानं सागतात, “ जेव्हा मी हॉटेलमध्ये काम करत होते, तेव्हा मला याची जाणीव झाली की कॉलेजमध्ये मी जे काही शिकले ते मुर्खपणाचं होतं, मला वाटतं की हे अनेक उद्योगांबाबत सारखच लागू असेल. मला वाटलं की माझ्याकडे फॅशन डिझायनिंगची पदवी नाही, किंवा मग मी व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षणही घेतलेलं नाही. मग ज्यांच्याकडे पदव्या आहेत, अनेक वर्षांचा अनुभव आहे, अशा लोकांसोबत मी स्पर्धा कशी बरं करू शकेन? हळूहळू, मी जेव्हा माझं काम सुरू केलं, तेव्हा पॅटर्न तयार करणं, शिवणकाम करणं, कापणी, कापूस पिंजणं आणि विणकाम करणं अशा प्रकारची काम शिकून मी संपूर्ण प्रक्रियेवर हुकुमत मिळवली. लोकांना ही सगळी कामं करताना प्रत्यक्ष पाहून मी ही कामं शिकले आहे. मी एक परिपूर्ण उद्योजिका आहे असा माझा मुळीच दावा नाही. पण मला या कामात अतिशय रस असल्यानं सारं काही शिकून मी आता या कामात अनुभवी बनले आहे.”

आता अखेरीस एक वेबसाईट सुरू करण्याची त्यांची योजना आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून त्या आपल्या कलेक्शनची ऑनलाईन विक्री करणार आहेत. विक्रीसाठी त्या इतर ई-कॉमर्सचे मार्ग देखील चोखाळणार आहेत. य़ा माध्यमातून कदाचित त्या किरकोळ विक्रीसुद्धा करतील. नजिकच्या काळात, जिथून व्यवसाय केला जाईल असा कारखाना वजा दुकान असलले ‘ब्रिक्स अँड मॉर्टर’ शॉप सुरू करण्याचीही त्यांची योजना आहे. त्या म्हणतात, “ हा माझ्या स्वप्नाचा एक हिस्सा आहे. पण पुढच्या काही वर्षांमध्ये मला अधिक व्यावहारिक बनावं लागणार आहे. ब्रँड लाँच करण्याच्या माझ्या कामाला आता मी प्राथमिकता देणार आहे. दर तीन महिन्यांनी ३० ते ४० डिझाईन्स असलेली कलेक्शन्स माझ्याकडे कशी येतील असा प्रयत्न मी करणार आहे. मला गुंतवणूकदारांची गरज आहे, पण या क्षेत्रात शंकाकुशंका घेणारेच लोक जास्त आहेत. ते म्हणतात की हे कॉटन आहे. मी त्याची किंमत खूपच जास्त लावते. एकूणच काय, तर शारीरिक श्रमाला काही किंमतच उरणार नाही” शेती करणारे हे शेतकरी आज विणकाम करत आहेत. हे अत्यंत कठीण काम आहे, आणि अशा श्रमातून तयार होणारे कापड मौल्यवान आहे. म्हणूनच सर्वच कॉटन स्वस्त असावं या कल्पनेतून आपण सर्वांनी बाहेर यायला हवं.

मायक्रोस्पीनची महिला कामगार

मायक्रोस्पीनची महिला कामगार


त्यांनी कॉटनमध्ये तयार केलेली कलाकुसरींचा हा नवा नजराणा महागही आहे आणि महत्त्वाकांक्षी सुद्धा. जेव्हा तुम्हाला १० हजार मिटरची मोठी ऑर्डर मिळते, तेव्हा तुम्ही छोट्या रकमेसाठी शेतक-याला हातमागावर दसपटीनं जास्त कठीण मेहनत करायला लावण्यात काही अर्थ नाही. अशावेळी यंत्रमागावर काम करणं अधिक चांगलं ठरतं.” यामुळं निशा ज्या प्रकारचं दर्जेदार उत्पादन हातमागापासून तयार करतात, तशा प्रकारे प्रीमियम उत्पादन तयार करण्याचा वाव मिळतो. “ यंत्रमाग आणि हातमागाच्या कापडातला फरक तुम्ही जाणू शकता. हातमागाववर तयार झालेल्या कापडाच्या छोट्या उणीवांवर काम करायला मला प्रचंड आवडतं. हे कापड खरबरीत पोत असलेलं आणि भरडं असतं. हातानं विणकाम केलेल्या कापडापासून फॅशनेबल कपडे खरेदी करणारे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत.


अनुभवांनी शिकविले बारकावे


निशा यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान जर कोणतं असेल तर ते म्हणजे कारागिरांना हाताळणं हे. हा त्यांना मिळालेला सर्वात मोठा अनुभव होता. कदाचित हे अनुभवातून मिळालेलं शिक्षण घेण्यासाठी इतर उद्योजकांना फार मोठा काळ खर्च करावा लागला असता. आणि कदाचित काहींना तो कधी मिळवताही आला नसता. निशाही हे मान्य करतात, आणि म्हणतात, “ एखाद्या कारागिराच्या खेड्यातल्या घरात कुणाचा जन्म झाला असेल तर ते आपलं काम सुरू करणारच नाहीत, किंवा मग एखादा सण किंवा साधी पूजाही त्यांना काम थांबवायला पुरेशी असू शकते. “ माझी प्राथमिकता काय आहे हे समजणं त्यांच्यासाठी कठीण आहे. ते म्हणतात, ‘ हे आमचं जीवन आहे. या आहेत आमच्या प्राथमिकता.’”

निशा यांच्या पहिल्या मास्टर टेलरला काम सोडून म्हैसूरला परत जायचं होतं. त्य़ासाठी त्यानं बंगळुरू सोडलं. त्यानंतर त्याचा संपर्कच होत नव्हता. मग जेव्हा त्याला मूल झालं तेव्हा कुठे त्याचा संपर्कच होऊ शकला. निशाना हा सोडून गेलेला कारागिर हवा होता. “ मी म्हणाले तुझी पत्नी आणि मुलासाठी काहीतरी चांगली तरतुद आपण करू या.” मी माझ्या पत्नीला आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाला नव्या शहरात कायमस्वरूपी आणू शकत नाही असं म्हणत त्यानं निशांचा प्रस्ताव धुडकावला. त्यानं उचललेलं ते एक अव्यावहारिक पाऊल होतं.

या सगळ्या गोष्टी मला समजून घ्याव्या लागल्या- मला संवेदनशील व्हावं लागेल. त्यांची पार्श्वभूमी काय आहे; कोणत्या परिस्थितीतून ते आले आहेत याचा मला विचार करावा लागला. ज्यांच्या सोबत मी काम करू शकेन अशी टीम तयार करून त्या टीम सोबत मग मी काम सुरू केलं. परंतु अजुनही मला अडचणी येतातच. येत्या जुलै महिन्यात काही तरी मोठं होणार आहे याची त्यांना जाणीव आहे, म्हणून मग आता त्यांची बांधिलकी निर्माण झाली आहे.” या कारागिरांनी संघटीत क्षेत्रात कधीही काम केलेलं नाही. शिवाय ते मागास खेडेगावातले आहेत आणि ते शिकलेले देखील नाहीत. या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर निशांना जाणीव झाली की अशा लोकांकडून आपण उभारणी करत असलेल्या उद्योगासाठी पाहिजे त्या सेवेची अपेक्षा करणे हा त्यांच्यावर अन्याय केल्यासारखा होईल. “ त्यांच्या गरजांशी जुळवून घेणं हे तुलनेनं सोपं आहे. मला त्याची जाणीव झालेली आहे.”

आजही महिला कारागिरांनी आपल्याला कामाच्या सूचना दिलेल्या पुरूष कारागिरांना आवडत नाही. इतर कोणत्याही हस्तकला व्यवसायाप्रमाणे हा व्यवसाय सुद्धा कमालीचा पुरूषप्रधान आहे. “ कामावर येणा-या त्यांच्या स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात सहकार्याची भावना नसते.” काहीशा चेह-यावर स्मित आणत निशा बोलतात. “ जेव्हा त्यांच्या सोबत इतर महिला एकत्र येतात तेही त्यांना मुळीच आवडत नाही. माझ्या स्वत:च्या कारागिरांबाबतही काहीसं असंच आहे, मी केलेल्या सूचना त्यांना आवडत नाहीत. काहीवेळा मला काय हवंय ते सांगतानाही मला अडचणी येतात. ते सरळ म्हणतील की हे काम ते वर्षानुवर्षे करत आले आहेत; लोकांना आमचं काम आवडतं; लोक विकत घेतात.”

त्यांच्या पद्धतीनं ते या कामाशी रूळलेले असल्यानं काही बदल करायचा म्हटलं की त्यांचा विरोध असतो. शिवाय त्यांच्या हातात अत्याधुनिक साहित्य नसल्यामुळं नव्या व्यवसायाच्या पद्धतीनुसार काम करणं त्यांच्यासाठी कठीण जातं. त्यांनी स्वत: पारखलेल्या आणि चाचणी केलेल्या जुन्या पद्धतीला चिकटून राहण्याच्या त्यांच्या सवयीला बदलण्यासाठी व्यवहारचातुर्य, संयम आणि समजूतदारपणाची गरज आहे. “ मी तरूण आहे. मी एक मुलगी आहे. मी माझ्या कामाच्या पद्धतीनुसार त्यांच्या कामाची पद्धत बदलण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून काहीवेळा ते मला गंभीरपणे घेत नाहीत. काहीवेळा तुम्हाला कठोर व्हावं लागतं. नेमकी कुठे मर्यादा रेषा आखावी आणि त्या प्रमाणं पाऊल उचलावं हे शिकण्याची मला गरज भासते आहे.”

आणि तुमचा व्यवसाय सुरू करण्याच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना निशा हसतात आणि म्हणतात, “ आळस ” “ आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी सहजपणे घेण्याची प्रवृत्ती असते, कारण सगळं काही आपण जबाबदारी स्वीकारून चालवत असतो, पण अचानकपणे तुम्हाला जाणीव होते, की तुम्हाला डेडलाईन पाळावी लागते, आणि ग्राहकांना उत्तरं द्यावी लागतात. स्वत:साठी काम करणं ही अत्यंत कठीण गोष्ट असते, विशेषत: तेव्हा, जेव्हा लोकांच्या उपजीविकेचं साधन तुमच्यावर अवलंबून असतं!” पण हे असं काम आहे जे करायला निशांना खूप आवडतं, आणि जे लोक आपल्या ग्राहकांना कपडे पुरवण्यात मदत करतात त्या लोकांना त्यांचा मोबदला देण्याचं कामही निशानां खूप खूप आवडतं.

Want to make your startup journey smooth? YS Education brings a comprehensive Funding Course, where you also get a chance to pitch your business plan to top investors. Click here to know more.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

Our Partner Events

Hustle across India