‘सेव्हऑनमेडीकल्स’- वैद्यकीय खर्चातील बचतीसाठी मदत करणारे विशेष माध्यम

18th Apr 2016
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

शारिरीक व्याधी कधी एकट्यानेच येत नाही, तर येताना संकटांची एक मालिकाच बरोबर घेऊन येते.... आरोग्याबरोबरच आर्थिक प्रश्नही तेवढेच गंभीर रुप धारण करु शकतात. अजय गंडोत्रा यांनाही असाच काहीसा अनुभव आला. आईला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आणि पाठोपाठ त्यावरील औषधाबाबत मिळालेल्या माहितीने तर त्यांची झोपच उडाली. हे पेटंट औषध होते ‘हरसेप्टीन’(Herceptin)... केमोथेरपीमध्ये या औषधाचा वापर केला जातो आणि वर्षभरातील केमोथेरपी सत्रांसाठी लागणाऱ्या या औषधाची किंमत तेंव्हा होती चाळीस ते पन्नास लाख रुपये...

गुगल सर्चच्या मदतीने त्यांना हा खर्च कमी करण्याचा एक मार्ग मिळाला. ज्याद्वारे ते औषधाची खरेदी थेट वितरकांकडूनच सवलतीच्या दरात करु शकणार होते आणि त्यामुळे त्यांचा एकूण खर्चात चाळीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकत होता. एकूणच या परिस्थितीचा सामना केल्यानंतर त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली, ती म्हणजे अशा वेळी इतर लोकांनाही अशाच प्रकारच्या प्रचंड वैद्यकीय खर्चाची समस्या भेडसावू शकते आणि त्यातूनच अजय आणि त्यांची पत्नी निशी गंडोत्रा यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात ‘सेव्हऑनमेडीकल्स’ (SaveOnMedicals) ला सुरुवात केली. ग्राहकांचा वैद्यकीय खर्च कमी करण्याच्या इच्छेनेच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

image


व्हिडीओच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला देऊ करण्याच्या दृष्टीने सेव्हऑनमेडीकल्सने मॅक्स हॉस्पिटल्स, पार्क हॉस्पिटल्स, बीएलके हॉस्पिटल्स, एससीआय हॉस्पिटल्स आणि त्याशिवाय स्वतंत्र अशा डिसेलेक्सिया असोसिएशन ऑफ इंडीया आणि अनत्ता ह्युमन वर्सिटी यांच्याबरोबर भागीदारी केली आहे. याद्वारे रुग्णालयांकडून त्यांच्या येथील डॉक्टरांच्या सल्ला शुल्कात पंचवीस ते पन्नास टक्क्यांची सूट दिली जाते. “ आम्ही उपयोगात आणत असलेल्या मॉडेल अंतर्गत ऑपरेशन कॉस्ट कमी असल्यामुळेच ग्राहकांना औषधे, इतर पूरक गोष्टी आणि साधनांच्या खरेदीवर पंचवीस टक्के सूट देणे आम्हाला शक्य आहे. त्याशिवाय आमच्याकडील रुग्णालयांच्या जाळ्यामुळे, आम्ही ग्राहकांचा शस्त्रक्रियेवरील खर्च तर पन्नास टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी मदत करु शकतो,” अजय सविस्तरपणे सांगतात.

सेव्हऑनमेडीकल्स औषधांचा वापर आणि त्याच्या दुष्परिणामांची माहिती तर देऊ करतेच पण त्याचबरोबर इतर उपलब्ध पर्यायांची यादी त्यांच्या किंमतीसह देण्यात येते. ही सर्व औषधे ही अधिकृत वितरकांकडूनच खरेदी करण्यात येत असल्यामुळे, ग्राहकांपर्यंत ही भरीव सवलतही पोहचवली जाते. “ एकदा का आमच्याकडे मागणी नोंदविण्यात आली की आमचे प्रशिक्षित फार्मसिस्ट हे औषधयोजनेच्या वैधतेसह सर्व गोष्टींची खात्री पटवून घेतात, आणि त्यानंतर ग्राहकांकडून हे निश्चित करुन घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधतात. त्यानंतरच ती मागणी पुढे आमच्या पुरवठादारांपर्यंत पोहचविण्यात येते. आम्हाला औषधे मिळाल्यानंतर आम्ही त्यांचे पॅकेज करतो आणि ती आमच्या लॉजिस्टीक्स भागीदाराकडे सुपूर्त करतो, जे ही औषधे ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचवितात,” निशी सांगतात.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांना पहिल्यांदा सेव्हऑनमेडीकल्सडॉटकॉमवर नोंदणी करावी लागते आणि त्यानंतर डॉक्टरची निवड करावी लागते, त्यांची वेळ घ्यावी लागते आणि पैसे भरावे लागतात. एकदा का डॉक्टरांची वेळ निश्चित झाली की रुग्ण आणि डॉक्टर अशा दोघांनाही व्हिडीओ लिंकसह याबाबतची माहिती देणारा एसएमएस/ ईमेल पाठविली जाते.

भारत वापसी

सेव्हऑनमेडीकल्सला सुरुवात करण्यापूर्वी अजय हे स्टॅंडर्ड चार्टर्ड, व्होडाफोन, मशरिक बॅंक आणि अरब नॅशनल बॅंक यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करत होते आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील स्पर्धेत व्यस्त होते. जेंव्हा त्यांची आई आजारी पडली, तेंव्हा मात्र त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि अखेरीस सेव्हऑनमेडीकल्स सुरु करण्याच्या कल्पनेपर्यंत येऊन पोहचले. तर निशी ओऍन्डएम आणि आरके स्वामी यांसारख्या जाहिरात संस्थांमध्ये काम करत होत्या. बेचाळीस वर्षीय अजय यांनी भोपाळमधील एनआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि गुजरातमधील आयआरएमएमधून एमबीएची पदवी मिळविली तर त्रेचाळीस वर्षीय निशी यांनी आयआरएमए मधूनच एमबीएची पदवी मिळविली आहे.

यशाचे सूत्र

गुरगाव स्थित सेव्हऑनमेडीकल्ससाठी अजय आणि निशी यांच्यासह आठ जणांची टीम काम करते. या आठ जणांपैकी तीन जणांवर संकेतस्थळ आणि एंड्रोईड ऍपच्या डिजाईन आणि विकासाची जबाबदारी आहे. हे व्हिडीओ माध्यम हे कोडेक्स तंत्रज्ञानावर आधारीत आहे.

image


एक लाख सत्र, पाचशे डॉक्टर्स, पन्नास हजार व्हिजिटर्स आणि एक हजार मागण्यांसह, सेव्हऑनमेडीकल्सची वाढ दर महा तीस टक्के या गतीने होत आहे. औषध खरेदीतील तफावत, व्हिडीओ सल्ला आणि इन पेशंट शस्त्रक्रियांमधून त्यांना उत्पन्न मिळत आहे. फेडएक्स, देलीव्हरी(Delhivery) आणि इंडीयापोस्टशी भागीदारी केली असल्यामुळे, सेव्हऑनमेडीकल्स भारतातील बावीस हजार पिन कोड्सपर्यंत औषधांचे वितरण करत आहे. जानेवारीमध्ये ऍंड्रोईड ऍपला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत पाच हजार डाऊनलोडस् झाली आहेत.

पस्तीस लाख रुपयांच्या भांडवलासह सुरुवात केलेल्या सेव्हऑनमेडीकल्सने पन्नास लाख रुपयांचे उत्पन्न मिळविण्यात यश मिळविले आहे. या वर्षी त्यांचे लक्ष्य २.५ कोटी रुपयांचे असून, २०१७-१८ साठी त्यांनी पंधरा कोटी रुपयांचे लक्ष्य समोर ठेवले आहे. आयबीईएफच्या अहवालानुसार भारतातील आरोग्य सेवांची बाजारपेठ ही २०१५ मध्ये सुमारे १०० बिलियन डॉलर्सची असून २०२० पर्यंत ती २८० बिलियन डॉलर्सपर्यंत जाऊन पोहचणे अपेक्षित आहे. एकूण बाजारपेठेपैकी आरोग्य सेवांच्या वितरणाचा उपविभाग ६५ टक्के एवढा आहे. नेटमेडस्, 1एमजी, एमकेमिस्ट आणि डेलिमेडी हे ऑनलाईन फार्मसी बाजारपेठ चालवत आहेत, तर प्रॅक्टो, लायब्रेट आणि पोर्टीआ यांचे डॉक्टरांच्या सल्ला क्षेत्रात वर्चस्व आहे. या दोन्हीही बाजारपेठात एकाचवेळी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा आणि त्याचवेळी फायद्यातही रहाण्याचा सेव्हऑनमेडीकल्सचा प्रयत्न आहे.

टीयर २ आणि टीयर ३ शहरांमध्ये स्थानिक डॉक्टरांशी भागीदारी करुन आणि शाखा उघडण्याच्या मार्गाचा वापर करत, शंभर सेव्हऑनमेडीकल्स केंद्र उभारण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. या केंद्रांचा वापर वितरीत औषधे एकत्र करण्यासाठी आणि व्हिडीओच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला देऊ करण्यासाठी करण्यात येईल.

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित :

गरीबांना स्वस्तात औषधं पुरवण्याचा ध्यास

'केअर अॅट माय होम' : पुन्हा दवाखान्याची पायरी नको

चिकित्सासेवा घरोघर पोहोचवणारे ‘हेल्प मी डॉक्टर’!

लेखिका – अपराजिता चौधरी

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन  

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close
Report an issue
Authors

Related Tags

Latest

Updates from around the world

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा

Our Partner Events

Hustle across India