जगातील दहा विद्यापिठात आता 'आयआयएससी' ची गणऩा होत आहे

17th Mar 2017
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

बंगळुरू मधील प्रतिष्ठीत इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सेस ने आता जगातील दहा विद्यापिठांच्या रांगेत प्रवेश मिळवला आहे. दि टाइम्स हायर एज्यूकेशन (टीएचइ) यांनी टाइम्स समूहाव्दारे नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे, आयआयएस ची गणना २०१७मध्ये जगातील सर्वोत्तम लहान विद्यापिठात आठव्या क्रमांकावर करण्यात आली आहे.


Image source: Glassdoor

Image source: Glassdoor


या विद्यापिठांमध्ये अशा विद्यापिठांचा समावेश होते ज्यामध्ये पाच हजारांपेक्षा कमी विद्यार्थी शिक्षण घेतात. एखाद्या भारतीय विद्यापिठाला प्रथमच हा बहुमान मिळाला आहे. केवळ मागिल वर्षी दोन भारतीय शिक्षण संस्थांचा समावेश पहिल्या वीस मध्ये होवू शकला होता मात्र पहिल्या दहा मध्ये नाही.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ गुवाहाटी, (आयआयटी), आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ यांचा अनुक्रमे १४वा आणि १८वा क्रमांक मागील वर्षी आला होता, ज्यांना त्यांचे स्थान राखण्यात यंदा अपयश आले. कॅलटेक, यूएसए हे जगातील पहिल्या क्रमांकाचे तर पोहांग विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापिठ, दक्षिण कोरिया यांचा तिसरा क्रमांक लागला. असे असले तरी या दोन्ही विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांच्या संख्या तीन हजारपेक्षा कमीच राहिल्या आहेत. अगदी गेल्या वर्षी देखील आयआयसी ने ब्रिक्स आणि उभरत्या अर्थव्यवस्था विद्यापिठांच्या क्रमवारी २०१७ मध्ये पहिल्या पंधरा विद्यापिठांमध्ये स्थान मिळवले होते असे अहवालात म्हटले आहे. 

याबाबतच्या वृत्तानुसार, विद्यार्थी संपादक टाइम्स उच्च शिक्षण , सिता भारव्दाज म्हणाल्या की, “ जगातील २०१७ मधील सर्वोत्तम लहान विद्यापिठानी हे सिध्द केले आहे की, या संस्था विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण समाधान देवू शकतात आणि विद्यार्थी आणि त्यांचा व्यवसाय यांच्यात चांगला ताळमेळ घालू शकतात. ” ( थिंक चेंज इंडिया)

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close
Report an issue
Authors

Related Tags

Our Partner Events

Hustle across India