लिंकमायस्पोर्टः बंगलोर-स्थित स्टार्टअपची फिटनेस क्षेत्रात उठावदार कामगिरी

25th Feb 2016
  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close

आजच्या धकाधकीच्या जीवनात बहुतेकांना शारीरिक तंदुरुस्ती अर्थात फिटनेसचे महत्व निश्चितच पटलेले दिसते आणि त्यासाठी ते विशेष प्रयत्नही करताना दिसतात. जिम, योगा, यांसारखे व्यायामाचे विविध प्रकार उपलब्ध असल्याने या क्षेत्राचा विस्तारही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. पण एकूणच हा फिटनेस उद्योग आपण विचार करु शकतो, त्यापेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात अधीन असतो तो विविध ट्रेंडस् आणि लहरींवर... सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी जीमची सदस्यता घेण्याच्या जुन्या बिझनेस मॉडेलमध्ये सध्या बदल होत असून, व्यक्ती केंद्रीत आणि वैयक्तिकपणे लक्ष देणाऱ्या सत्रांच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु आहे. सेवा देण्यावरच या मॉडेलचा सर्व भर असल्यामुळे ग्राहक आणि प्रशिक्षक अशा दोघांनाही या बाजारपेठेत प्रवेश मिळविणे खूपच सोपे झाले आहे.

माणिक मेहता हे इंग्लंडमध्ये मॅंचेस्टर युनायटेड एफसीसाठी सेल्स असिस्टंट म्हणून काम करत होते आणि स्काय टीव्हीची घरोघर जाऊन विक्री करत होते, त्यावेळीच त्यांना फिटनेस क्षेत्रातील या ट्रेंडस् ची जाणीव होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे फिटनेस आणि स्पोर्टस् क्षेत्रातील जागतिक स्तरावरील चार मिलियन सेवा पुरवठादारांमध्ये कशा पद्धतीने वाढ करता येऊ शकेल, यावर विचारमंथनास सुरुवात केली. एका सास प्लॅटफॉर्मची (SaaS – Software as a Service platform) ची निर्मिती करुन या क्षेत्रातील प्रवेश सुकर करणे, ही त्यावेळी त्यांना लाख मोलाची कल्पना वाटली.

image


पहिला डाव

आणि पुढे लवकरच लिंकमायस्पोर्ट (LinkMySport) प्रत्यक्षात आली. त्यांच्या या उपक्रमाबाबत विस्ताराने सांगताना माणिक म्हणतात, “ लिंकमायस्पोर्ट हा एक सास अर्थात सॉफ्टवेअर ऍज ए सर्विस प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे फिटनेस आणि स्पोर्टस् सेवा पुरवठदार, जसे की प्रशिक्षक, योगा आणि हेल्थ स्टुडिओ आणि स्पोर्ट सेंटर यांच्यासाठी एक असे परिपूर्ण सॉफ्टवेअर उपलब्ध करुन देण्यात येते, ज्यामाध्यमातून वेब आणि मोबाईलवरील कस्टमर फेसिंग ऍप्सचे कार्य आणि विपणन यांचे व्यवस्थापन करता येईल.”

लिंकमायस्पोर्ट हे फिटनेस स्टुडिओ आणि प्रशिक्षकांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रितपणे उत्पादनांचा एक संच देऊ करते आणि त्यांना वेळापत्रक, एकूण काम आणि ग्राहक यांचे वेब किंवा मोबाईलच्या माध्यमातून व्यवस्थापन करण्यास मदत करते.

हे सॉफ्टवेअर डीआयवाय प्रॉडक्ट आहे आणि ग्राहक त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक त्या संपूर्ण तंत्रज्ञानाचा सेटअप पंधरा मिनिटांपेक्षा कमी वेळातच करु शकतात.

त्यांचे पालक हेच त्यांच्या व्यवसायाचे पहिले एंजल गुंतवणूकदार बनले. तर ऑपरेशन्स आणि मार्केटींगची जबाबदारी सांभाळणाऱ्या त्यांच्या सह-संस्थापिका काबंदी सैकीया, यांनी अडीच वर्षांपूर्वी त्यांच्याबरोबर कामाला सुरुवात केली, जेंव्हा माणिक यांचे त्यांच्या पहिल्या उत्पादनावर काम सुरु होते. त्यापूर्वी त्यांनी रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंड आणि स्टॅनले डेव्हिड ऍन्ड असोसिएशनबरोबर काम केले होते.

दुसरा डाव

एका खूपच विस्कळीत स्वरूपाच्या मार्केटमध्ये असल्याची जाणीव असल्यामुळेच, प्रभावी डिजिटल मार्केटींगद्वारे यामध्ये यशस्वी होण्याचे धोरण या दुकलीने आखले होते. “ आमचे स्पर्धक त्यांच्या ग्राहकांना देत असलेल्या अनुभवापेक्षा दसपट चांगला अनुभव देण्याकडे आम्ही आमचे पूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. जरी बहुतेक कंपन्यांच्या दृष्टीने ग्राहकांबाबतचे यश हे त्यांनी ऍपवर खर्च केलेल्या वेळेशी निगडीत असते, अर्थात या कंपन्यांसाठी ग्राहकांनी अधिक वेळ ऍपवर घालविणे गरजेचे असते तर आमच्यासाठी मात्र हे यश ग्राहकांना ऍपवर घालवावा लागणारा वेळ कमी करण्यात आणि त्यांना अधिक चांगला परिणाम देण्याशी निगडीत आहे,” माणिक सांगतात.

त्यांनी दोन उत्पादनांद्वारे सुरुवात केली - टुर्नामेंट मॅनेजमेंट आणि ऐंगेजमेंट प्लॅटफॉर्म आणि इव्हेंट ऍन्ड ऍक्टीव्हिटी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. ग्राहकांना आदर्श अनुभव देण्यासाठी टीमचे संशोधन आणि विचारमंथन सातत्याने सुरु रहाते.

image


तिसरा डाव

एम्प्रोव्हायझेशन अर्थात आयत्या वेळी रचनेत बदल करणे, हे या व्यवसायाच्या केंद्रस्थानी असल्याने, दोन वर्षांपूर्वी माणिक आणि काबंदीने यामध्ये संपूर्ण बदल केला, जेंव्हा तत्कालिन उत्पादनांची विक्री करणे कठीण असल्याची जाणीव त्यांना झाली. नेमके त्याचवेळी जागतिक स्तरावरील संधीही त्यांना जाणवली, “ आम्ही तोपर्यंत उभारलेले सर्व काही संपविण्याचा आणि जागतिक स्तरावरील फिटनेस, प्रशिक्षण आणि स्पोर्टस् क्षेत्रातील लघु आणि मध्यम व्यावसायिकांसाठी पुन्हा शून्यातून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी केलेले सर्व काम थांबविणे आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याच्या या अनुभवानंतर आमची टीम भयमुक्त झाली. आम्हाला आमच्या चुकांवर पुन्हा एकदा विचार करण्याची संधी मिळाली आणि नवीन काही तरी देऊ करण्यास आम्ही सज्ज झालो.”

यामध्ये टीमने क्लाऊड बेस्ड सॉफ्टेवेअरचा समावेश केला, ज्यामध्ये इंटीग्रेटेड पेमेंटस्, प्रशिक्षकांना त्यांच्या वर्गांचे व्यवस्थापन सहजपणे करण्यासाठी खास वैशिष्ट्यांचा समावेश असलेले ट्रेनर ऍप, स्टुडीओसाठी ‘लिंकमायस्पोर्ट व्हाईट लेबल ऍप’ या आयओएस आणि ऍंड्रॉईडवर उपलब्ध ऍप्सचा समावेश आहे तर व्यवसायांसाठी वेब ऍप विथ कस्टमायझेबल वेबसाईटस् याचाही समावेश करण्यात आला आहे.

लिंकमायस्पोर्टच्या जागतिक प्लॅटफॉर्मची स्थापना एप्रिल, २०१५ मध्ये झाली आणि लवकरच त्यांना यश मिळू लागले. विपणनावर कोणताही खर्च न करताही १८ देशांतील २५० हून जास्त व्यवसायिकांनी हे बीटा सॉफ्टेवेअर वापरले आहे. दर महा चाळीस टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यांची सर्वात मोठी बाजारपेठ अमेरिका ही आहे. बाजारपेठेचा असलेला आकार हे यामागचे प्राथमिक कारण आहे. न्यू एज फिटनेस आणि स्पोर्टस् स्टुडिओ आणि प्रशिक्षक हे या स्टार्टअपचे लक्ष्य आहे.

image


यासाठी दरमहा सदस्यता शुल्क हे २५ डॉलर्स ते २०० डॉलर्स च्या घरात असून, ऑनलाईन पेमेंटसाठी अल्पसे व्यवहार शुल्कही आकारले जाते. आतापर्यंत स्वतःच्याच भांडवलावर काम केले असले तरी आता स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी म्हणून ऐंजल राऊंड मार्फत निधी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. माईंडबॉडी आयएनसी या त्यांच्या स्पर्धक कंपनीने गेल्या वर्षी ५०० मिलियन डॉलर्स मार्केट कॅप सह आपला आयपीओ बाजारात आणला आहे. “ २०१८ पर्यंत २०,००० व्यवसायांना आमच्या प्लॅटफॉर्मवर आणण्याचे आमचे लक्ष्य आहे,” माणिक सांगतात. सध्या लिंकमायस्पोर्ट ही नॅसकॉमच्या १०,००० स्टार्टअप प्रोग्रॅमचा एक भाग आहे आणि इनोट्रेक, २०१५ आणि पीएन ग्रोथ २०१६ बॅचचा ती एक भाग होती.

हेल्थ, स्पोर्ट आणि फिटनेस उद्योग हा वेगाने वाढत असून त्यात सतत बदल होत आहे. तसेच यामध्ये विविध विचारधारांसाठी जागा असल्याने, दर वेळी काही मालाची किंवा उपकरणांची गरज लागतेच असेही नाही, कारण यातील काही शाखा या केवळ कौशल्यावर आधारीत आहेत. त्यामुळे ब्रॅंड आणि त्याचे गुडविल हेच बहुतेक वेळा महत्वाचे ठरते. सासचे महत्व सिद्ध झाल्यानंतर, जेथे अधिकाधिक खेळाडू येत आहेत, अशा या क्षेत्रात ग्राहकांना मिळणारा अनुभव हाच सर्वाधिक महत्वाचा ठरणार आहे.

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

बेंगळुरूतलं ‘कल्ट’ भारतातलं फिटनेस विश्व बदलण्याच्या प्रयत्नात

दिल्ली आयआयटी स्कॉलर्सचा… सायकलिंग, रनिंगद्वारे फिटनेस मंत्र

मज्जातंतूंच्या आजारावर उपचारासाठी सायक्लॉप्स कंपनीने तयार केलं नवं तंत्रज्ञान

लेखक – बिंजल शाह

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन 

Want to make your startup journey smooth? YS Education brings a comprehensive Funding and Startup Course. Learn from India's top investors and entrepreneurs. Click here to know more.

  • +0
Share on
close
  • +0
Share on
close
Share on
close